सोशल चावडीत मज्जाच उरली नाही

social-Media.jpg
social-Media.jpg

काळ बदललाय, मोबाईल टिव्हीच्या नादात माणूस माणूसपण हरवून बसलाय. आता पहिल्यासारखी चावडी आता उरली नाही, अशी जुनी जाणती माणसं सांगतात, ''गावच्या चावडीवर रोज सकाळ व संध्याकाळ हजेरी लावल्याबिगर गावातील लोकांना राहवत नाही.'' गावांतील जुनी कितीही कामात असली तरी, चावडीत एक तरी चक्कर मरणारच, कारण राजकारणातील गप्पांचा फड, एखाद्याची टिंगलटवाळी, अखंड हरिनाम सप्ताह, यात्रा-जत्रातील तमाशाच्या गप्पा, पीकपाण्याविषयी आचारविचार की, गावातील एखादं प्रेमप्रकरण असे एक ना अनेक गप्पांचे फड चावडीवर रात्र-रात्र रंगायचे. थोरामोठ्या राजकीय पुढाऱ्यांची लपडी, चटणी-मीठ लावून त्याचं पार चवीने चर्चा व्हायच्या, चावडीवर रंगलेल्या पत्त्यांच्या डावावर, चहा, गायछापच्या उग्र वासाबरोबरच विड्यांचे धूर उठायचे, अशी ही चावडी.

मोबाईल हॅक करुन फायनान्स कंपनीच्या मालकाला 50 लाखांचा गंडा 

गावातील शहाणी माणसं, राजकीय पुढारी, मोठी माणसं, म्हातारी-कोतारी ते नव्यानंच मिसरूड फुटलेली तरुण पोरं गप्पात रंगून जायची. निवडणूक जाहीर झाल्यानंतर ते निकालपर्यंत चावडीवर माणसांचा प्रचंड राबता असायचा. पण सध्या सगळं वातावरण ढवळुन निघालंय. खुप बद्दल झाला आहे गावांत. ग्रामीण भागात अर्थकारण, समाजकारण यांचा सगळा अभ्यास येत होतं असतो. थोर मोठया राजकीय पुढाऱ्यांला शिव्या ही इथंच दिल्या जातात, त्यांच्या गल्लीपासून दिल्लीपर्यत असणाऱ्या घोळांची चर्चा होत असते. कोणाचं कोणाबरोबर लपडं हाय हे अगदी पटवून सांगणारे महाकाय नमुनेदार माणसं बघायला मिळतात. मात्र, आता माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे शहरांसह खेडीही झपाट्याने बदलू लागली. चावडी उतरती कळा लागली. इंटरनेट, मोबाईलच्या उदयानं संपूर्ण जग छोट्या खेड्यासारखं भासू लागलं. सोशल मीडियाच्या उदयानं तर सर्वांच्या जगण्याचे आयामच बदलले. नेट नसेल तर माणूस आजकाल अस्वस्थ होताना दिसतातचं नाही तर अनुभवलंय. एका क्षणात मानवी जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या सोशल मीडियामुळे मानवाचं आयुष्यच बदलून गेलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकमुळे गावाच्या सतत संपर्कात आली. त्यावरून सकाळ-संध्याकाळ संवाद साधला जाऊ लागला. गावातील चावडी व पार ओस पडू लागले, आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील मेसेजचे ढिगारे वाढू लागले. ग्रामसंस्कृतीतील चावडीची जागा आता सोशल मीडियाने घेतली आहे. समोरून आला तरी बोलतं नाहीत. नवीन पिढी पूर्णतः सोशल मिडीया आधीन गेली आहे. 

 कागदपत्रांद्वारे नागरिकांचे अस्तित्व सिद्ध करणे मूर्खपणा

जेष्ठ पत्रकार रविशकुमार म्हणतात, ''व्हॅटअँप युनिव्हर्सिटीच्या तुटपुंज्या माहितीवर अक्कल पाजळणारे कमी नाहीत. थोर महापुरुषा वर हि टिका करायला कमी करत नाहीत. समाजामध्ये तेढ पसरून गावागावात सोशल मीडिया भरभरून वाहत असल्याचं अन् चावड्या ओस पडत चालल्याचं विदारक चित्र दिसतंय. परिणामी ग्रामसंस्कृतील चावड्या नष्ट होत चालल्या आहेत. खेड्यातल्या माणसांचं आयुष्य या चावड्यांनी व्यापून टाकलं होतं. हे वैभव आता लयाला, विस्मरणात जात आहे. आता सोशल मीडिया चावडीवर सगळ्या चर्चा होतात, माणसा माणसा मधील सवांद लोप पावत चालला आहे.  येणाऱ्या नव्या पिढीला ‘चावडी’हा प्रकार कदाचित चित्र काढूनच दाखवावा लागतो की काय! अशी जुनी म्हातारी माणसं बोलून दाखवत आहेत. नवीन काळात सगळं नष्ट होत आहे एवढं मात्र नक्की.

Video : 'तो' दोन्ही पायांनी अपंग; पण, पाहा कशी करतोय चोरी !

पूर्वीच्या काळी खेडेगावांमध्ये शिक्षण व मनोरंजनांची फारशी साधनं नव्हती. या चावड्यांचं गावाच्या व्यक्तिमत्त्व विकासात फार मोठं योगदान होते. गावातील प्रत्येकाचं या चावडीशी अतूट नातं होतं. निवडणुका जवळ आल्या की, गावात रणधुमाळी सुरू व्हायची पार, चावडी माणसांच्या गर्दीने पार फुलून जायची. मग रात्र-रात्र राजकीय गप्पांचा फड रंगायचा आता अख्खा गाव सुना सुना वाटतोय,  म्हतारी माणसं सुद्दा कीर्तन, पोथीला जात नाहीत. टीव्हीसमोर तुकाराम, बाळूमामा यासारखं मालिका दररोज बघतानाचे चित्र आहे. तरुण पिढी तर, फेसबुक, व्हॉट्अप यांमध्ये गुंग असतंय या सगळ्यामध्ये चावडी अनाथ होत आहे एवढं मात्र नक्की.


               
      

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.