A. P. J. Abdul Kalam: "अटलजी पण कलाम मुसलमान आहेत बरं," इंदिरा गांधींची मिश्किली अन वाजपेयी..

'हा' प्रसंग पाहताच इंदिरा गांधी आपल्या मजेशीर शैलीत हसल्या आणि वाजपेयींनी घेतलेल्या कलामांच्या गळाभेटीवर मिश्किलपणे भाष्य करत म्हणाल्या
A. P. J. Abdul Kalam Muslim said Indira Gandhi Atal Bihari Vajpayee
A. P. J. Abdul Kalam Muslim said Indira Gandhi Atal Bihari Vajpayee Sakal
Updated on

चेतन झडपे.

APJ Abdul kalam News - भारताचे अकरावे राष्ट्रपती 'मिसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यांचा आज स्मृतीदिन. सी व्ही रमण यांच्यानंतर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे एकमेव वैज्ञानिक. कलाम एक लेखक - वैज्ञानिक होतेच यासोबतच ते एक शिक्षक देखील होते.

एका भाषणात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कलाम म्हणाले होते की, "मला आयुष्यात इतर काही होण्यापेक्षा शिक्षक होणे अधिक प्रिय आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी आणि कलाम या तीनही 'भारतरत्नांचा' एक किस्सा फार मजेशीर आहे.

A. P. J. Abdul Kalam Muslim said Indira Gandhi Atal Bihari Vajpayee
APJ Abdul Kalam Punyatithi : 'साधी राहणी अन् उच्च विचारसरणी'; मिसाईल मॅनचे हे किस्से तुम्हाला माहितीयेत का?

अब्दुल कलाम आणि अटलबिहारी वाजपेयी यांची भेट पहिल्यांदा १९८० मध्ये झाली होती. यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एसएलव्ही ३ यानच्या यशस्वी प्रक्षेपणानिमित्त देशातील प्रमुख खासदारांच्या भेटीसाठी कलाम आणि प्राध्यापक सतिश धवन यांना निमंत्रित केले होते. प्रसिद्ध पत्रकार राज चेंगप्पा यांनी आपल्या 'वेपन्स ऑफ पीस' या पुस्तकात या प्रसंगाचा उल्लेख केला आहे.

चेंगप्पा आपल्या पुस्तकात लिहतात, "खासदारांच्या भेटीमध्ये जेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधींनी कलाम यांचा परिचय अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी करून दिला, त्यावेळी कलाम यांच्याशी हस्तांदोलन करण्याऐवजी वाजपेयींनी गळाभेट घेतली.

A. P. J. Abdul Kalam Muslim said Indira Gandhi Atal Bihari Vajpayee
Dr. APJ Abdul Kalam Jayanti : डॉ. कलाम यांचे आयुष्यभर जपावे असे '5' विचार

'हा' प्रसंग पाहताच इंदिरा गांधी आपल्या मजेशीर शैलीत हसल्या आणि वाजपेयींनी घेतलेल्या कलामांच्या गळाभेटीवर मिश्किलपणे भाष्य करत म्हणाल्या, "अटलजी पण कलाम हे मुसलमान आहेत बरं." गांधींच्या या टीपण्णीवर वाजपेयी उत्तर देत म्हणाले, "हो, मला माहिती आहे. पण कलाम हे पहिल्यांदा भारतीय आहेत. त्याचसोबत एक महान वैज्ञानिक आहेत."

कलमांनी नाकारली मंत्रिपदाची ऑफर -

वाजपेयी जेव्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा आपल्या मंत्रिमंडळात कलाम असावेत अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार आपल्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी वाजपेयींनी कलामांना निमंत्रण दिले. कलमांनी या प्रस्तावावर पूर्ण एक दिवस विचार केला. दुसऱ्या दिवशी वाजपेयींची भेट घेऊन कलमांनी मंत्रिपदाची ऑफर तितक्याच विनम्रपणे नाकारली.

A. P. J. Abdul Kalam Muslim said Indira Gandhi Atal Bihari Vajpayee
Dr. APJ Abdul Kalam Jayanti : मिसाईलमॅनच्या साधेपणाचे 'हे' ५ किस्से माहितीये का?

यावेळी कलाम म्हणाले की, संरक्षणातील संशोधन आणि परिमाणु परिक्षण कार्यक्रम आपल्या अंतिम टप्प्यात पोहचले आहे. या वर्तमानातल्या जबाबदारऱ्यांना न्याय देऊन देशाची सेवा करायची आहे. दोन महिन्यांनंतर पोखरण या ठिकाणी परिमाणुच्या स्फोटांतर हे देशाला हे ज्ञात झाले की, कलमांनी मंत्रिपदाची ऑफर का नाकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.