Amitabh Bachchan Birthday: अमिताभ यांच्या बरोबरीचे सगळे थकले, बिग बी तेवढे 'चालले'!

तरुणांना अद्याप आपल्यातील अखंड उत्साहानं आश्चर्यचकित करणाऱ्या बिग बी यांनी आजवर केलेला संघर्ष प्रचंड प्रेरणादायी असाच आहे.
Amitabh Bachchan Big B Happy Birthday Success story
Amitabh Bachchan Big B Happy Birthday Success storyesakal
Updated on

Amitabh Bachchan Big B Happy Birthday Success story : बॉलीवूडचे बादशाह बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्टला उधाण आले आहे. शहेनशहा अमिताभ यांचा जीवनप्रवास वेगवेगळ्या माध्यमातून उलगडून दाखवण्याचा प्रयत्नही केला जात आहे.

एवढी मोठी उंची असलेला कुणी अभिनेता होतो का असं म्हणून हिणवण्यात आलेल्या बिग बी यांनी अभिनयाच्या, मनोरंजनच्या आणि प्रेक्षकांचे, चाहत्यांचे प्रेम मिळवण्यात एवढी मोठी उंची गाठली की तिथपर्यत पोहचणे निव्वळ अशक्य आहे. तरुणांना अद्याप आपल्यातील अखंड उत्साहानं आश्चर्यचकित करणाऱ्या बिग बी यांनी आजवर केलेला संघर्ष प्रचंड प्रेरणादायी असाच आहे.

Also Read - केवळ स्त्री म्हणून कामाचा मोबदला कमी मिळतो..?

७० च्या दशकांत बॉलीवूडमध्ये आलेल्या अमिताभ यांना तरी कुठे ठाऊक होते की, नंतर जहा हम खडे होते है लाईन वहा से शुरु होती है....हे आपल्याच विषयी बोलले जाणार होते ते. अमिताभ यांचे वागणे, बोलणे, त्यांचे व्यक्तिमत्व नेहमीच नवोदितांना प्रेरणादायी ठरले आहे. या सगळ्यात नेहमीच एक मुद्दा समोर येत राहिला तो म्हणजे अमिताभ यांच्या सोबतचे सगळे अभिनेते रिटायर झाले पण ते अजूनही कमालीच्या उर्जेनं धावत आहेत.

अमिताभ यांच्या बरोबरीचे अभिनेते मागे राहिले अन् बिग बी...

सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या नावावर असलेले ते रेकॉर्ड इतक्या वर्षांनी देखील कायम आहे. ते म्हणजे त्यांच्या चित्रपटांचा ब्लॉकबस्टर होण्याचा विक्रम. बिग बी अमिताभ बच्चन यांना देखील तो मोडणे काही जमला नाही. अर्थात दोन्ही अभिनेत्यांची जातकुळी वेगळी होती. त्यांची स्टाईल, संवादफेक, देहबोली यात फरक होता. पण प्रत्येकवेळी राजेश खन्ना आणि अमिताभ यांची तुलना होतच राहिली.

अमिताभ बच्चन यांचा हिंदी चित्रपट विश्वात प्रवेश झाला तेव्हा इंडस्ट्रीमध्ये धर्मेंद्र, विनोद खन्ना, संजीव कपूर, राजेश खन्ना, जितेंद्र, शशी कपूर, ऋषी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, अमजद खान, ओम पूरी, नसिरुद्दीन शहा, प्राण, शक्ती कपूर, कादर खान यासारख्या इतर अभिनेत्यांचा दबदबा होता. या प्रत्येक अभिनेत्याचा वेगळा फॅनबेस होता. त्यामुळे तो ब्रेक करुन स्वताच्या नावाची ओळख तयार करणे हे अमिताभ यांच्यापुढे मोठे आव्हान होते. आणि ते त्यांनी पेलले.

अमिताभ यांचे रुल बूक काय होते?

अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे कवी होते. त्यांचा मधुशाला नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्या कविता अमिताभ यांच्या जीवनपटाला आणखी वेगळ्या उंचीवर नेतात. कधीकाळी कर्जाच्या डोंगराखाली दबल्या गेलेल्या अमिताभ यांनी ज्याप्रकारे स्वताला पुन्हा उभे केले ते खूपच प्रेरणादायी असेच होते. वेळ अटीतटीची होती तेव्हा त्यांनी जे चित्रपट केले त्यावरुन त्यांना चाहत्यांच्या मोठ्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं.

अमिताभ यांनी आपल्या पडत्या काळात जे काही केलं त्यामागे त्यांची भूमिका खंबीर होती. काहीही झालं तरी कष्टाला कधी नाही म्हणायचे नाही आणि प्रामाणिकपणा सोडायचा नाही. वेळेचा आदर करत नम्रपणे पुढे चालत राहायचे हे अमिताभ यांना जमले म्हणून त्यांच्या बरोबरीचे सगळे कलाकार हे यश साजरं करत राहणं, मुलाखती देणं आणि इतर कलाकारांवर टीका करण्यात व्यस्त असताना अमिताभ मात्र शांतपणे त्यांच्या आगामी आयुष्याचे प्लॅनिंग करत होते.

भूमिका कोणतीही का असेना अमिताभ यांनी त्याला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला. आजच्या जमान्यात दोन कलाकार एकमेकांविषयी फारसं चांगलं बोलल्याचे दिसत नाही. केवळ प्रमोशनच्या उद्देशानं एकमेकांचे कौतुक करण्याचे दिवस असताना अमिताभ यांनी नेहमीच आपल्या बरोबरीच्या कलाकारांना प्रेरित करण्याचे काम केले. यात सध्याच्या काळातील आयुषमान खुराणा, विकी कौशल, राजकुमार राव, रणबीर कपूर, पंकज त्रिपाठी, नवाझुद्दीन सिद्धिकी, यांच्या नावाचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल.

Amitabh Bachchan Big B Happy Birthday Success story
Amitabh Bachchan: बिग बींचा ८१ वा वाढदिवस खास, या खास वस्तूंचा होणार लिलाव

आज अमिताभ यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण करुन ८१ व्या वर्षात पदार्पण केलं असताना दुसरीकडे अजूनही ते टीव्ही मनोरंजन विश्वातील कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून अखंडपणे चर्चेत असल्याचे दिसून येते. टीव्ही मनोरंजन विश्वात एवढ्या प्रमाणावर कार्यरत असणारा बॉलीवूडचा दुसरा कोणता अभिनेता नाही हे तितक्याच ठामपणे म्हणावे लागेल. या मागील कारण म्हणजे अमिताभ यांचे कामातील सातत्य, उत्साह आणि सतत नवीन शिकण्याची तयारी हे आहे. या सगळ्या गुणांमुळे अमिताभ हे सगळ्यांपेक्षा वेगळे ठरतात.

Amitabh Bachchan Big B Happy Birthday Success story
Nana Patekar : नाना पाटेकरांच्या घरी ऋषी कपूर दारुची बाटली घेऊन गेले होते तेव्हा....! काय होता तो भन्नाट किस्सा?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.