BLOG : 'अटलशक्ती महासंपर्क'...अभियानाच्या माध्यमातून मतदारसंपर्क!

पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा भाग
AtalShakti
AtalShakti
Updated on

पुण्यात भारतीय जनता पक्षाने (Pune BJP) दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihar Vajpayee) यांच्या जयंतीनिमित्त आज 'अटलशक्ती महासंपर्क अभियान (Maha Sampark Abhiyan) राबवले आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. हे अभियान या निवडणूक प्रचाराचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे. एकाच दिवशी सहा लाख नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा भारतीय जनता पक्षाचा हा प्रयत्न म्हणजे आगामी निवडणुकीसाठी आपल्या ताकदीची तपासणी करण्याचाच एक भाग आहे.

AtalShakti
Punjab Election : बळीराजाला हवीय सत्ता, 22 संघटनांनी बांधली मोट

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात आले होते. त्यावेळी 'मेरा बूथ, सबसे मजबूत,'चा नारा त्यांनी दिला. या नाऱ्यातच आजच्या अभियानाची बीजं रोवली गेली आहेत. पुण्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता पालिकेत आहे. पुणे महापालिकेच्या महत्त्वाच्या प्रकल्पांची थोडक्यात गेल्या चार वर्षांत महापालिकेच्या माध्यमातून पक्षाने काय केले याची माहिती नागरीकांना देणे, केंद्राच्या योजनांची माहिती देणे याच बरोबर निवडणुकीपूर्वी आपला जनसंपर्क भक्कम करणे हा या अभियानामागचा उद्देश आहे हे उघडच आहे.

निवडणूक प्रचारांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष माहिर आहेत. निवडणूक व्यवस्थापन हा विषय गांभिर्यानं घेणं हे भाजपाच्या यशाचं एक महत्वाचं अंग आहे हे दुर्लक्षून चालणार नाही. त्यांच्याकडे मतदार यादीच्या प्रत्येक पानाला 'पन्ना प्रमुख' असतो आणि तो आपल्या मतदारांच्या संपर्कात वर्षभर असतो. पन्ना प्रमुख, हजारी प्रमुख अशा माध्यमातून भाजपचे कार्यकर्ते जास्तीत जास्त मतदान पारड्यात टाकून घेण्याचा प्रयत्न करतात.

AtalShakti
"मोदी सरकारपेक्षा महाराजा हरि सिंह यांची हुकुमशाही चांगली होती"

आताची अत्यंत सूत्रबद्धरीतीने भाजपने या मतदार संपर्काला म्हणजेच अटलशक्ती अभियानाला सुरुवात केल्याचे दिसते. ६ डिसेंबरपासून पक्षाच्या वतीने या कार्यक्रमाची आखणी सुरू झाली. ६ डिसेंबरला या संपर्क अभियानाची संकल्पना पुस्तिका प्रकाशित झाली, तसेच ‘अटलशक्ती महासंपर्क अभियाना’च्या लोगोचे अनावरण विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. ८ डिसेंबर रोजी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक झाली. त्यानंतर मंडलनिहाय, प्रभागनिहाय, शक्तिकेंद्रनिहाय, बूथनिहाय आणि बूथ समिती नियोजन बैठका झाल्या. शहरातील ८ मंडल, ६० प्रभागप्रमुख, ६०० शक्तिकेंद्रप्रमुख, ३ हजार बूथप्रमुख आणि ३० हजार बूथसंपर्क कार्यकर्ते दीड लाख घरांना भेट देऊन सहा लाख मतदारांपर्यंत संपर्क साधण्याचे नियोजन भाजपने केले.

आज सकाळी पुण्यात या अभियानाचा प्रारंभ झाला. वर दिलेल्या आकड्यांनुसार प्रत्येक कार्यकर्त्याने पाच घरांना भेटी देण्याचे उद्दीष्ठ पक्षानं ठेवलं आहे. अभियानाची पुस्तिका भेट देणे, भेट दिलेल्या घरात केंद्र सरकारच्या अभियानाचे लाभार्थी असल्यास त्यांच्याकडून अभिप्राय घेणे, पक्षाचे कॉल सेंटर, मतदार नोंदणी, युट्यूब चॅनेल यांची माहिती नागरिकांना, थोडक्यात मतदारांना देणे व या माध्यमातून दीड लाख घरांतल्या सहा लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा भाजप प्रयत्न करेल. या प्रत्येक भेटीचा तपशील मोबाईल अॅपमध्ये नोंदवला जाणार आहे. थोडक्यात यातून आपल्या 'व्होट बँक'चा आढावा भाजप घेईल हे निश्चित.

AtalShakti
राज्यातील लॉकडाऊनबाबत आरोग्य मंत्र्यांचे महत्त्वाचे विधान

कोथरुडचे आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीष बापट, सभागृह नेते गणेश बीडकर तसेच शहरातले सर्व आमदार, नगरसेवकांना पक्षानं या कामाला लावलं आहे. फेब्रुवारीमध्ये महापालिका निवडणूका झाल्यातर जानेवारी महिन्याच्या मध्यावर उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह अन्य पदाधिकारीही मतदारांच्या भेटी घेणार असल्याने विद्यमान नगरसेवकांच्या कामगिरीचे मुल्यमापनही अशा अभियानाच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं.

घरभेटींच्या नोंदी अॅपमध्ये होणार असल्याने आजच्या दिवसात कुणी नक्की किती काम केले, याचाही आयता 'डाटा'पक्षाकडे जमा होऊ शकतो. निवडणुका समोर आल्या असल्याने पदाधिदारी कार्यकर्त्यांनी गांभीर्याने कामाला लागावे, यासाठी भाजपचा हा प्रयत्न आहे, असे बोलले तर वावगे ठरु नये. थोडक्यात, एका अभियानाच्या माध्यमातून एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा भारतीय जनता पक्षाचा हा प्रयत्न आहे, असेच म्हणावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.