BLOG : महापरिनिर्वाणापर्यंत पोहोचलेला महामानव

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६५ वा महापरिनिर्वाण दिन आहे.
BR Ambedkar
BR Ambedkar
Updated on

निर्वाण, परिनिर्वाण आणि महापरिनिर्वाण हे शब्द आपल्या अनेकदा कानावर पडले असतील, याचा नेमका अर्थ आपण जाणतो का? नसेल जाणत तर जाणून घ्यायला हवा. सामान्यतः मृत्यूसाठी वापरले जाणारे हे तिन्ही शब्द एकअर्थीच वाटत असले तरी तसं नाही. कारण या शब्दांच्या लांबी इतकाचं त्यांच्या अर्थामध्येही सुक्ष्म अन् मुलभूत फरक आहे. हा फरक विचारांचा, समर्पणाचा आणि सत्शील विवेकाचा आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे याचं एक उत्कृष्ट उदाहरण.

BR Ambedkar
Mahaparinirvan Din 2022 Live :उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर दाखल

आज ६ डिसेंबर बाबासाहेबांचा मृत्यूदिन, केवळ आंबेडकरी जनतेसाठीच नव्हे तर राष्ट्रासाठी दुःखाचा दिवस. या दिवसाला आपण पुण्यतिथी म्हणत नाही, महापरिनिर्वाण दिन म्हणतो. कॅलेंडर्स, सरकारी सणावळ्या या सर्वांमध्ये बाबासाहेबांच्या स्मृतीदिनाचा उल्लेख 'महापरिनिर्वाण दिन' म्हणूनच केला जातो. ही काही जगावेगळी चमत्कारिक घटना नव्हे, पण तरीही विशेषच.

BR Ambedkar
Mahaparinirvan Din 2022: राज ठाकरेंनी उलगडले डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे न उलगडलेले पदर...

महापरिनिर्वाण समजून घ्यायचं असेल तर अतिसामान्य मानवापासून महामानव बनलेल्या बाबासाहेबांना समजून घ्यावं लागेल. आधुनिक भारताला नवचेतना देणाऱ्या या महामानवाबद्दल प्रत्येकानं वाचायलाच हवं, व्यक्ती म्हणून समजून घ्यायला हवं. बाबासाहेबांचा विद्रोह, व्हीजन आणि राष्ट्रवाद काय आहे? स्त्रीमुक्तीदाते अशी ओळख, धोरणकर्ते, चळवळींचे आदर्श अन् जागतीक तत्ववेत्ते असा त्यांचा लौकिक का आहे?

BR Ambedkar
निधनापूर्वी बाबासाहेबांनी अखेरच लिखाण कोणतं केलं होतं?

वैचारिक वारसा चालवणं किंवा वैचारिक पुनर्जन्म होणं ही देखील मोठी बाब. तुम्हाला घडवणारा गुरु हा समकालीनच असला पाहिजे असं नाही. बुद्ध-कबीर-फुले अशा गुरुस्थानी असलेल्या व्यक्ती बाबासाहेबांना समकालिन नसल्या तरी त्यांचे विचार मात्र कायमचं समकालीन राहिले आहेत. 'ज्ञानियाने रचिला पाया तुका झालासे कळस' या संत परंपरेच्या विचाराप्रमाणं समतेच्या विचारांची मुल्ये बु्द्धाकडून तुकारामांकडं, तुकारामांकडून शिवरायांकडं, त्यानंतर शिवरायांकडून फुल्यांकडे अन् अखेर आंबेडकरांपर्यंत झिरपली आहेत. बाबासाहेब ही व्यक्ती अशीच घडली ती स्वयंभू किंवा अचानक प्रकटलेली नाही. हाच वारसा अन् विचार पुढे गरीब आणि श्रीमंतांमधल्याही दलितांसाठी, अभिजन आणि बहुजनांमध्ये तसंच प्रस्थापित अन् दुर्लक्षितांसाठी प्रेरणास्त्रोत बनला. जातीपातीच्या भिंती पाडताना मिश्र विवाहाचा प्रभावी पर्यायही त्यांनी दिला.

BR Ambedkar
Mahaparinirvan Din : लोक कलावंताकडून शिवाजी पार्कवर गायनाची मेजवानी

मनुस्मृतीनं नासवलेल्या बाईच्या जन्माला बाबासाहेबांनी नवा जन्म दिला. दलितांना आणि स्त्रीला पशूपेक्षाही हीन वागणूक देणारी मनुस्मृती जाळून आपल्यातला विद्रोह दाखवून दिला. संविधान लिहून नव्या भारताचं व्हिजनही सेट केलं. 'शिका-संघटीत व्हा आणि संघर्ष करा' ही चळवळ निर्माण करणारे, गावकुसाबाहेर राहिलेल्याला व्यक्तीला लाल दिव्याच्या गाडीपर्यंत पोहोचवणारे बाबासाहेब अनेक चळवळींचे आदर्श ठरले. म्हणूनच तत्वज्ञानात जसा हिंदुत्ववाद, समाजवाद, मार्क्सवाद तसा 'आंबेडकरवाद' निपजला.

BR Ambedkar
महिला साक्षरतेकरिता वुमेन्स वर्ल्ड बँकिंगसोबत करार

आंबेडकरवादानं आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अन् अभिव्यक्तीच्या समान संधीचं आत्मभानं दिलं. त्यांच्यासाठी समतेची काटेकोर व्यवस्था निर्माण करणं हाच खऱा धर्म, बंधुत्व अन् राष्ट्रवाद झाला. सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना याच विचारांनं भारतानं अनेक मापदंड स्थापित करत उत्तुंग भरारी घेतली. नव्या पिढीचा राष्ट्रवादही याच वैचारिक वारशानं मार्गक्रमण करणारा राहिला तर आणखी नवे आयाम तयार होतील. महापरिनिर्वाणापर्यंत पोहोचण्यासाठी महामानवाची हीच खरी कसोटी असणार आहे.

-- अमित उजागरे

amit.ujagare@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()