भारताचा स्वातंत्र्यदिन अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलाय. त्याचवेळी पूर्वसीमेवरील बांग्लादेश वर अचानकपणे सत्तापालटाचे कोसळलेले संकट हा भारतासाठी गंभीर इशारा ठरणार आहे.
बांग्लादेशात गेल्या दोन महिन्यात जनक्षोभामुळे व युवकांच्या प्रक्षुब्ध आंदोलनात तीनशे लोकांच्या झालेल्या मृत्यूमुळे घाबरून तब्बल 15 वर्ष सत्तेत राहिलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांना साऱ्या परिवारासह पलायन करून भारतात आश्रय घ्यावा लागला, ही उपखंडाच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक घटना आहे. `आयर्न लेडी’ असे शेख हसीना यांचे वर्णन केले जाई.