Bollywood Vs Tollywood : 'का बरं बॉलीवूडवाले टॉलीवूडच्या अभिनेत्यांना चित्रपटात घेऊ लागले'?

यापूर्वी बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि किंग खान शाहरुख खान यांनी टॉलीवूडच्या चित्रपटाच्या प्रमोशनला जाणीवपूर्वक हजेरी लावल्याचे दिसून आलेले नाही.
Bollywod vs Tollywood
Bollywod vs Tollywoodesakal
Updated on

Bollywood vs Tollywood Salman Khan to Aamir Khan : कोरोनापासून मनोरंजन क्षेत्रातील वेगवेगळ्या बदलांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी ओटीटीनं प्रेक्षकांना मोठा आधार दिला होता. याशिवाय नवनवीन कलाकार यानिमित्तान समोर आले होते. मराठीतील कित्येक कलाकारांना या ओटीटीनं संधी दिली होती. त्यातून मिळालेलं मानधनही मोठं होतं. बॉलीवूडनं नेहमीप्रमाणे सावध पावलं टाकून प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असलेले चित्रपट मागे घेतले होते. त्यांना भीती होती प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळालाच नाहीतर आणि झालं वेगळचं.

कोणी काही का म्हणेना पण गेल्या बऱ्याच दिवसांपासून बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद सुरु आहे. त्यात दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुष्पापासून जी टॉलीवूडची जी जोरदार लढाई सुरु झाली त्याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. पुष्पानं बॉलीवूडच्या चित्रपटांना जी टक्कर दिली त्याचा परिणाम बाकीच्या चित्रपटांवर झाल्याचे दिसून आले. यात अल्लु अर्जुनचा पुष्पा, त्यानंतर आलेला थलापती विजयचा मास्टर, मग राजामौली यांचा आरआऱआऱ, पाठोपाठ केजीएफ, वल्लीमाई, असुरन, जय भीम आणि आताचा कांतारा या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल.

यापूर्वी बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि किंग खान शाहरुख खान यांनी टॉलीवूडच्या चित्रपटाच्या प्रमोशनला जाणीवपूर्वक हजेरी लावल्याचे दिसून आलेले नाही. मात्र आरआरआरच्या प्रमोशनच्या वेळी सलमान खानपासून आमिर खानपर्यत अनेक सेलिब्रेटींनी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर व्हायरल झालेल्या कमेंटस भन्नाट होत्या. प्रेक्षकांना देखील ती गोष्ट पाहताना नवल वाटली होती. कारण बॉलीवूडचे अभिनेते दाक्षिणात्य अभिनेत्यांच्या कार्यक्रमात अगत्यानं सहभागी होत असल्याचे चित्र दुर्मिळ होते.

Also Read - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

राजामौलींच्या चित्रपटानं सगळ्यांना एकत्र आणले असे म्हणता येईल. त्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळेस सलमाननं देखील बॉलीवूडमध्ये ८० आणि ९० च्या दशकांमध्ये जो हिरोइझम होता तो आता दिसून येत नाही. टॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये मात्र तो आहे. आणि बॉलीवूड जे आपल्याकडे होते ते पडद्यावर साकारण्यास कमी पडत असल्याचे मत नोंदवले होते. त्यावर शाहरुखनं देखील थोड्याफार फरकानं सलमानचीच री ओढली होती. त्यानं देखील आपल्याला कथेवर काम करावे लागेल असे म्हटले होते.

प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीनं देखील बॉलीवूड किंवा टॉलीवूड असा भेद न करता ज्यांच्याकडे चांगले विषय आणि आशय आहे त्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे म्हटले होते. दरम्यान बॉलीवूडला देखील प्रेक्षक आपल्यापासून दूरावत असल्याचे दिसून आले. प्रेक्षकांचा बॉलीवूडच्या हिरोंपेक्षा टॉलीवूडच्या हिरोंकडे वाढत चाललेला ओढा पाहून त्यांनी एक वेगळी आयडिया लढवली आणि ती प्रत्यक्षातही आणली. ती म्हणजे दोन्हीकडच्या कलाकारांना आपल्या चित्रपटांमध्ये सहभागी करुन घ्यायचे.

गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांकडे नजर टाकल्यास आपल्याला बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये असणाऱ्या दाक्षिणात्य कलाकारांच्या सहभागाबाबत कळून जाईल. पहिल्यांदा आरआऱआरमधून राजामौली यांनी अजय देवगण, आलिया भट्ट यांना संधी दिली. प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी यांनी सलमानला त्यांच्या गॉडफादरमध्ये घेतले. आता सलमानच्या किसी का भाई किसी की जानमध्ये चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण, पूजा हेगडे, यांची इंट्री दिसून आली आहे.

Bollywod vs Tollywood
Salman Khan: सलमानला गोल्डी ब्रारनेच दिलीय मारण्याची धमकी? प्रकरणात ब्रिटन कनेक्शन समोर!

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं देखील त्याच्या लाल सिंग चढ्ढामध्ये नागार्जुनच्या मुलाला नागा चैतन्यला संधी दिली होती. यापूर्वी त्याची पूर्वाश्रमीची पत्नी समंथाला द फॅमिली मॅन नावाच्या सीरिजमध्ये घेतली होती. पुष्पामध्ये रश्मिकानं जी भूमिका साकारली त्यामुळे ती लोकप्रिय झाली त्यानंतर तिला बॉलीवूडच्या बिग बीं सोबत गुडबॉयमधून संधी मिळाली. येत्या काळात रश्मिका रणबीर कपूर सोबत दिसणार आहे. तसेच वरुण धवन आणि समंथाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bollywod vs Tollywood
Mouni Roy : समुद्रांच्या लाटांवर स्वार झाली मौनी!

प्रभास आणि श्रद्धा कपूर साहो मध्ये दिसले होते. भलेही तो चित्रपट फारसा चालला नाही. मात्र बाहुबली फेम प्रभास आणि श्रद्धाची मोठी चर्चा रंगली होती. येत्या काळात एकत्रिपणे काम केले तर बॉक्स ऑफिसवरचे आकडे समाधानकारक असतील ही गोष्ट कदाचित बॉलीवूडच्या निर्मात्यांना कळलेली दिसते. म्हणून तर त्यांनी आता टॉलीवूडचे हिंदी रिमेक तयार करताना त्यांचेच कलाकार घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आहे.

Bollywod vs Tollywood
Priyanka Chahar : 'मेरी आशिकी तुम ही हो'!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()