Breakup : 'सोडूयात म्हणून सुटणार नाही पण..' ब्रेकअप नंतरची गोष्ट!

अनेकदा आपण एखाद्यावर खूप मनापासून प्रेम करतो ती व्यक्तीही आपल्यावर जीव उधळते, पण...
Breakup Special Story
Breakup Special Storyesakal
Updated on

Breakup Special Story : अनेकदा आपण एखाद्यावर खूप मनापासून प्रेम करतो ती व्यक्तीही आपल्यावर जीव उधळते, पण काहीतरी बिनसतं आणि नातं तुटतं. रेवा आणि समीर असेच एकमेकांच्या प्रेमात पडले पण पुढे गोष्टी बिनसल्या आणि हे लोकं वेगळे झाले. रेवा आणि समीरचा कॉलेजचा ग्रुप होता पण समीरला आपलं आयुष्य प्रायवेट ठेवणं आवडतं त्यामुळे ते दोघे instagram आणि whastapp वरच बोलायचे, भेटायचं म्हटलं तरी खूप एकांत असलेल्याच ठिकाणी.

Breakup Special Story
Valentine Day: नातं समुद्राच्या लाटेचं किनाऱ्याशी...

अर्थात मित्रांच्या घोळक्यात या गोष्टी लपून राहणाऱ्या नव्हत्या आणि त्यांच्याबद्दल सगळ्यांना माहिती होतं.. ग्रुप मधल एक खूप सेट कपल होतं हे; जेव्हा त्यांचं तुटलं तेव्हा सगळ्यांना वाईट वाटलं.. समीरने रेवाला whatsapp वरतीच मेसेज करून सांगितलं की आपण मित्र म्हणूनच छान आहोत. नको हे नातं.

Breakup Special Story
Hug Day: अन् फायनली मला तिची मिठी मिळाली...

अर्थात रेवानेही त्याला अडवल नाही.. बहुदा दोघेही एकेक पाऊल मागे येऊ शकले असते पण आले नाही. आज जवळजवळ दीड वर्षानंतर सगळा ग्रुप टेकडीवर फिरायला गेला आणि दोघांनाही बळजबरी घेऊन आलेले. रेवा समोरच्या कॉर्नच्या स्टॉलवरून कॉर्न आणायला निघाली तसा समीर सुद्धा तिच्या मागे जाऊ लागला.

Breakup Special Story
Breakup Day Love Rashifal : आज ब्रेकअप डे, प्रेम जिंकणार की होणार ब्रेकअप; जाणून घ्या राशी भविष्य

"रेवा ऐक ना.. एक मिनिट.. थांब ना.."

(रेवाच्या भोवती समीर रुंजी घालत होता; त्याला तिला खूप मनापासून काहीतरी सांगायचं होत; पण रेवाला ऐकणं नकोस होत... पण तरीही ती थांबली)

"बोल", रेवा म्हणाली...

Breakup Special Story
Breakup Day : ब्रेकअप, नैराश्य आणि मितवा!

"रेवा, खूप दिवस झाले काहीतरी सांगायचं होत.. पण कसं तेच कळत नव्हत मुळात तुला फोन केला तर तू उचलशील का? इथूनच सुरुवात होत होती; पण आज तू आलीस इकडे छान वाटलं.. म्हणजे किती दिवसांनी आपला सगळा ग्रुप असा एकत्र आला आहे ना.. कॉलेज झालं आपण जॉब्सला लागलो आणि मग कनेक्शनच तुटलं."

"समीर जे बोलायचं आहे ते बोल..." रेवा खूप शांतपणे विचार करून चार शब्द बोलली.. बोलण्यात आपल्या आवाजाने आपल्याला या माणसासमोर उभच रहायचं नाहीये हे न दिसू देता नम्रपणे...

Breakup Special Story
Breakup Day : ब्रेकअप सर्वात जास्त कोण करतं, मुलं की मुली?

"रेवा.. माझ्या आयुष्यात दुसरी मुलगी आली आहे; आपले मित्र म्हणतात तसं हो, एक मुलगी आवडली आहे मला आणि आम्ही रेलेशनशिपमध्ये आहोत.."

खरतर हे रेवाला माहिती होतं पण कधीतरी त्याच्याच तोंडून असं काही ऐकायला मिळेल असं वाटलं सुद्धा नव्हतं.. चेहऱ्यावर कोणताच भाव न ठेवता रेवा उत्तरली..

"बरं मग?"

"तुझ काहीतरी म्हणणं असेल ना यावर?"

Breakup Special Story
Breakup Day : बाबांनो प्रेमात दुखावलाय म्हणून नव्हे तर 'या' कारणासाठी सेलिब्रेट करा ब्रेकअप डे

"समीर तू तुझ्या ex गर्लफ्रेंड कडून अपेक्षा ठेवतो आहेस की तिने तुझा current रिलेशनशीप स्टेटस वर भाष्य करावं? seriously?"

"तसं नाही रेवा पण"

"okay, congratulations.. जप तिला..."

"मला माणसं जपता येतात रेवा.."

Breakup Special Story
Breakup मधून कसे बाहेर पडावे? 'या' टिप्स फॉलो कराल तर लगेच Move On व्हाल

"हो येतात ना.. पण त्यांच्या भावनांना नाही जपता येत तुला.." "आरोप करते आहेस?" "छे छे! एक करशील.. please, तिला ना मनातलं सगळ सांग; काहीही वाटलं काही विचार आला तर तो तिला बोलून दाखव; निष्कर्षावर नको पोहोचू.. वागेल ती अल्लड कधीतरी पण ठीके.. समजून घे.. समजूतदार पणाचा आव नको आणुस.. समीर तोडण खूप सोप्पं असत.. धरून ठेवता येतय का बघ.. आणि ना.. मुलींना पैसेच लागतात हे जितकं खोट आहे ना तितकच maturity च्या गप्पांनी मन नाही भरत हेही आहेच रे; कधीतरी छान surprise गिफ्ट दे तिला, म्हणजे अगदी expensive अस नाही काही म्हणत पण भेटायला आल्यावर एक चाफ्याचं फूल किंवा मोगऱ्याचा गजरा, एक छोटीशी इकलियर्स, dairy milk काहीही.. आणि बोल तिच्याशी व्यक्त हो.. ती होत नसेल तर तू हो.. आणि enjoy कर.."

Breakup Special Story
Rose Day Special Story: नातं हे कधीही गुलाबासारखं आकर्षक आणि मोगऱ्यासारखं मोहक असावं!

"आपल्या नात्यात माझ्या एकट्याच्याच चुका नव्हत्या.. असो.. आता आपण दोघंही सुखी आहोत ना.. let it be.. आपल्याला आपल्यासाठी दुसरे हक्काचे लोकं भेटले आहेत ना.. अजून काय हवं?"

"एक एक मिनिट? मी relationship मध्ये नाहीये.. कोण म्हटलं तुला?

"मी तर ऐकलं.. ohh sorry.. मग शोधू का तुझ्यासाठी? नवा कोरा नवीन कोणी.."

Breakup Special Story
Chocolate Day: रोज रोजच्या कॉफीची सर का एकावेळच्या चॉकलेटला येते?

"तू? आणि त्याला माझी ओळख काय करून देशील? ही रेवा माझी ex?.. वेडू.." रेवा अचानक त्याला सवयीप्रमाणे वेडू म्हणून बसली.

"एक चांगली मैत्रीण म्हणूनही ओळख करून देऊ शकतो मी.."

"नको; अजून तरी परत प्रेमात पडण्याची इच्छा नाहीये.. let it be..."

Breakup Special Story
Propose Day: काही भेटी तेव्हा जास्त सुखद वाटतात जेव्हा त्या अपूर्ण राहतात... एक राहून गेलेला प्रपोज

"रेवा.. यार sorry..."

"Don't be.. तुला समजून घेऊ शकते एवढी समजूतदार आहे मी.."

"ते माहिती आहे मला.."

"by the way, ती आहे का एवढी समजूतदार?"

"हम्म आहे तशी, पण तुझ्या इतकी नाही.. चिडते कधीकधी.. पण आता तुझ्यासारखी दुसरी मिळायला ती असायला तर हवी ना.."

Breakup Special Story
Breakup नंतर सर्वाधिक इमोश्नल कोण होतं? मुलं की मुली; वाचा काय सांगतं रिसर्च

"हम्म तेही आहेच म्हणा, पण नको माझ्यासारखी.. परत आपण मित्र म्हणूनच छान होतो असा मेसेज करशील..."

"असो... चल जाऊयात... ए पण अजून ग्रुप मध्ये कोणाला सांगू नकोस.."

"नाही सांगणार.. तुला चर्चा आवडत नाही माहिती आहे.. by the way, तिचं नाव काय आहे रे?"

"रमा..."

Breakup Special Story
Breakup Gainer : ब्रेकअपनंतर तुमचं वजन वाढतंय? सावधान

"Wow... मुलीच्या प्रेमात पडलास की नावाच्या.."

"दोघींच्या..."

"असो.. चला... कॉर्न तयार आहेत"

"रेवा आणखीन एक बोलायचं होत.. please हा अबोला सोड ना.. तू मैत्रीण म्हणून हवी आहेस मला.."

Breakup Special Story
Breakup: ब्रेकअपनंतरही येतीये जोडीदाराची आठवण? फॉलो करा या टिप्स

"नाही रे समीर.. मी ठरवून अबोला नाहीये धरलेला.. त्यामुळे असा सोडूयात म्हणून सुटणार पण नाही.. पण तू कर कॉल मी असेल जेव्हा तुला गरज लागेल तेव्हा.. no worries..."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.