प्रतिमा प्रचंड
"चांद सी महबूबा हो मेरी
कब ऐसा मैंने सोचा था
हां तुम बिलकुल वैसी हो
जैसा मैंने सोचा था..."
लग्नानंतर नव - परिणत जोडप्यांच्या सुरुवातीच्या मोरपंखी दिवसातील या तरल भावना असतात. हा प्रेम विवाह असेल तर शोध मोहीम बऱ्यापैकी सुखकर झालेली असते. आणि हा अरेंज मॅरेज अथवा नोंदणी पद्धतीने विवाह झाला असेल तर शोधमोहीम बरीच खडतर झालेली असू शकते. अरेंज मॅरेज ठरविताना जी वळणे, वाटा , वाटेतील अडचणी , येतात त्या मुलांना व पालकांना खूप काही शिकवून जातात .
आपला मुलगा अथवा मुलगी वयात आल्यानंतर नातलग व मित्र मंडळी यांच्या चौकशा सुरू होतात . आत्ताच्या काळात मुले मुली कोणत्या वयात लग्न करायचे हे तेच ठरवीत आहेत. तेव्हा ही चौकशी कधी पालकांना सुसह्य होते कधी असह्य !