सर्वधर्मसमभाव हाच माझा धर्म!

गरीब असो वा श्रीमंत, कोणत्याही जातीतील असो वा कोणत्याही धर्माचा असो, नाना पटोले सर्वांना एकसमान वागणूक देतात, आपल्या कुटुंबाचा भाग समजतात. कोणावर जर संकट ओढवले, तर ते कोणताही विचार न करता त्वरित मदतीसाठी धावून जातात.
nana patole
nana patolesakal
Updated on

समानतेचा दृष्टिकोनातून समृद्ध महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न पाहणारे 'नाना पटोले.' कोणत्याच जातीधर्मात भेदभाव करत नाहीत. सर्वांशी आपुलकीने व प्रेमाने वागतात. पूर्व विदर्भात असं कोणीही नाही जे नाना पटोलेंना ओळखत नाहीत.

गरीब असो वा श्रीमंत, कोणत्याही जातीतील असो वा कोणत्याही धर्माचा असो, नाना पटोले सर्वांना एकसमान वागणूक देतात, आपल्या कुटुंबाचा भाग समजतात. कोणावर जर संकट ओढवले, तर ते कोणताही विचार न करता त्वरित मदतीसाठी धावून जातात.

"मागील काही वर्षांपासून धर्मनिरपेक्ष म्हणून प्रसिद्ध असलेल्या आपल्या देशाला बदनाम केले जाते आहे. विविध जाती-धर्माच्या लोकांमध्ये द्वेष पसरवून त्यांच्यात फूट पाडण्याचे काम इथले काही लोक करत आहेत आणि त्याची झळ आपल्या महाराष्ट्रालाही लागत आहे," असे नाना पटोले म्हणतात.

अशा परिस्थितीतही सर्वधर्मसमभावाचा संदेश देत सर्व जातीधर्मातील लोकांचा हात धरून प्रगतीकडे त्याचा प्रवास सुरूच आहे. या प्रवासात ते कुणाचाही हात निसटू देत नाहीत. या सर्वांसमवेत ते विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पावले टाकत आहेत. 

नाना पटोलेंचा सर्वसामान्य घरात जन्म झाला. मूळचे शेतकरी असल्याने शेतकाऱ्यांना होणारा त्रास, त्यांची समाजात होणारी अवहेलना ते जाणतात. समाजातील श्रीमंत-गरीब वर्ग, श्रीमंतांचे  समाजातील वर्चस्व, त्यामुळे गरीबांची होणारी गळचेपी, त्यांना सगळ्याच बाबतीत मिळणारे दुय्यम स्थान या सर्व गोष्टी त्यांनी जवळून पहिल्या आहेत.

त्यामुळे लोककल्याणासाठी ते कायम तत्पर असतात. समाजकार्यात त्यांनी स्वतःला व्यस्त करून घेतले आहे. त्यांच्या दारात आलेल्या प्रत्येक व्यक्त्तीला त्यांनी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. “गोर-गरिबांना न्याय मिळवून देण्याची शक्ती देव मला प्रदान करो.” असे ते कायम म्हणतात.

जातीधर्मातील भेद मिटवण्यासाठी 'पलास' गावात त्यांनी सामूहिक विवाहाचे आयोजन केले व बऱ्याच लग्नगाठी बांधून दिल्या. ही सामूहिक विवाहाची प्रथा पुढे पंधरा वर्ष सुरु राहिली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने अर्जुनी मोरगाव येथील प्रतापगडावर शंकराच्या मंदिरात दर वर्षी ते खूप मोठा कार्यक्रम करतात.

त्यात ते लोकांसोबत स्वतः सामील होऊन जमलेल्या भक्तांची निःस्वार्थी सेवा करतात. त्यांनी निधी मंजूर करून गावातील अनेक मंदिरांचा पुनर्विकास केला आहे. परमात्मा समाज, माळी समाज व इतर अनेक समाजातील लोकांना मदतीचा हात पुढे करत त्यांच्या हक्काच्या जागा मिळवून दिल्या व तिथे त्यांच्या समाजाचे सभागृह उभारण्याचे काम सुद्धा त्यांनी केले आहे.

कुठलाही माणूस नाना पटोलेंसाठी परका नाही, मग तो कोणत्याही जाती, धर्म, वर्गाचा असो. "कर्म आणि धर्म या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, यांची सरमिसळ होता कामा नये. असल्यास ते स्वार्थी राजकारण आहे," असे ते म्हणतात. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा नानाभाऊ पुढे चालवत आहेत. सर्व जातीधर्मातील लोक त्यांना सारखेच असून त्यांच्यामध्ये कधीच द्वेषाची दरी निर्माण होऊ दिली नाही.

त्यांनी साकोली तालुक्यातील मौज येथे कुणबी समाजासाठी सभागृह बांधून दिले, परमात्मा एक सेवक मंडळ सांस्कृतिक भवनांचे बांधकाम करून घेतले, सुकळी येथे तीर्थक्षेत्र विकासनिधी सभागृहाचे बांधकाम केले, मागासवर्गीय मुलींसाठी साकोली येथे वसतिगृह बांधून दिले,

लाखांदूर येथे अखिल खेडुले कुणबी समाजाच्या जागेवर सभागृहाचे काम करून घेतले व मौजा येथे कब्रस्थानाच्या सौंदर्यीकरणाचे काम करून घेतले. ते निःस्वार्थपणे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सर्व जाती धर्मासाठी समाजकार्य करत असतात. त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला अतूट अशा समतेच्या धाग्याने जोडलेले आहे.

पण मागील दहा वर्षा पासून धर्मनिरपेक्ष  जातय. इथल्या  ज्यात आपला महाराष्ट्रसुद्धा गुरफटून निघतोय.  अश्या परिस्थितीत सुद्धा महाराष्ट्रातला एक नेता असा आहे जो ह्या सगळ्या विरुद्ध आवाज उठवून सर्वांना एकत्र घेऊन प्रगतिपथावर, मानवधर्मावर चालण्याचा प्रयत्न करतोय, तो नेता म्हणजे नाना पटोले.

नाना पटोले हे विदर्भातील लाडके नेते व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कामिटीचे अध्यक्ष आहेत. नाना पटोले हे स्वत: शेतकरी आहेत. त्यामुळेच नानाभाऊ कधीच कुठल्याच बाबतित भेद करत नाही. नानाभाऊ सर्वांना समान नजरेतून बघतात आणि हे त्यांच्या कृतीतून दिसून येते.

  नानाभाऊ समजकार्यात व्यस्त असलेला माणूस आहे. त्यांच्या दारी आलेल्या प्रत्येक माणसाला त्यांनी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ते स्वतः सुद्धा खूप धार्मिक स्वभावाचे आहेत, त्यांचा देवावर प्रचंड विश्वास आहे.  जातीजमातीतील भेद मिटवण्यासाठी, नानाभाऊ यांनी पलास या गावात सामूहिक विवाहाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले, त्यांच्या हस्ते विविध आंतरजातीय विवाह पार पडले.

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारे नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेतच परंतु ओबीसी समाजाचा चेहरा, गोरगरिबांचे कैवारी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी मागासवर्गीय जाती-जमातीतील लोकांचा समावेश ओबसी प्रवर्गात करून घेऊन त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले आहेत.

गोंड-गोवारी समाजाला त्यांचे हक्क मिळावे यासाठी सुद्धा नानांनी कायम त्यांना भेटून त्यांचे प्रश्न समजून घेऊन, त्यांच्यासाठी अहवाल तयार करून त्यांचे प्रश्न माजी मुख्यमंत्री मा. विलसराव देशमुख यांच्या समोर मांडले आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

कुठलाही माणूस नानाभाऊंसाथी परका नाही, मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा वा पक्षाचा असो. ते प्रत्येकाशी मानवधर्मानेच वागत आले आहेत. अश्याच एका सक्षम समानतावादी विचाऱ्याच्या नेत्याची गरज आजच्या समाजाला आहे. ज्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकजण अभिमानाने एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू शकू आणि पुन्हा आपलं देश हा धर्मनिरपेक्ष आहे हे सिद्ध करू शकू.

 Facebook link Nana Patole 

https://www.facebook.com/nanapatoleinc?mibextid=ZbWKwL

 Instagram link Nana Patole

https://www.instagram.com/nanapatoleinc?igsh=MTJiYm56c21veTV5NA==

 Twitter link Nana Patole

https://x.com/NANA_PATOLE?t=N2H_xQP8h6AMQVFp-bsD3Q&s=09

 YouTube link Nana Patole

https://www.youtube.com/@nanapatoleinc

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.