अखेर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला. ते तुरूंगात असताना त्यांनी आपल्या `पदाचा राजीनामा द्यावा,’ अशी मागणी भारतीय जनता पक्ष सातत्याने करीत होता. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी तर जाहीर केले होते, की केजरीवाल तुरूंगात गेले, की त्यांना पदावर राहता येणार नाही. पण, दिल्ली उच्च न्यायालय वा सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तसा कोणताही आदेश दिला नव्हता. त्यामुळे, कारावासात असेपर्यंत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणे नाकारले.