Dr Babasaheb Ambedkar : बाबासाहेबांना अखेरच्या काळात व्हायोलिन शिकावसं का वाटलं असेल?

मला नेहमीच एक प्रश्न पडतो की, बाबासाहेब म्हणजे व्यासंगी, तत्त्वज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित. बाबासाहेबांकडे शिक्षणाच्या अनेक पदव्या, पण बाबासाहेबांना आयुष्याच्या शेवटी-शेवटी व्हायोलिन शिकावं असं का वाटलं असेल?
Dr Babasaheb Ambedkar
Dr Babasaheb Ambedkar sakal
Updated on

चेतन झडपे.

बाबासाहेबांची जयंती साजरी झाली. कोणी म्हणत होतं की नाचून नाही वाचून साजरी करा, तर कोणी म्हणायचं, वाचून तर करतोच पण नाचून.. नाकावर टिच्चून जयंती साजरी करणार, असो. या वादात आपल्याला पडायचं नाही. कोणीही कशाही पद्धतीने साजरी करा.

मला नेहमीच एक प्रश्न पडतो की, बाबासाहेब म्हणजे व्यासंगी, तत्त्वज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित. बाबासाहेबांकडे शिक्षणाच्या अनेक पदव्या, पण बाबासाहेबांना आयुष्याच्या शेवटी-शेवटी व्हायोलिन शिकावं असं का वाटलं असेल? अर्थात बाबासाहेबाचं संगीत प्रेम सर्वश्रुत आहेच. पण एखादी कला आपल्या अंगी भिनावी असं बाबासाहेबांना का वाटलं?

Dr Babasaheb Ambedkar
yoga : योगाचा श्रीगणेशा लहानपणीच हवा

कोणीतरी एक लेखक म्हणतो की, 'आयुष्य जेव्हा अखेरच्या प्रहरात जातं, तेव्हा माणूस कलेच्या प्रेमात पडतो. ती जोपासतो, शिकतो, आत्मसात करतो. अन् आयुष्यातील निसटलेल्या क्षणांना कलेतून पुन्हा जिवंत करतो. बाबासाहेबांना आपल्या आदिम दुःखाची उधळण व्हायोलिनच्या तंतुतून उमटवायचे असतील?

बाबासाहेबांचं बालपण हालअपेष्टा अन् टोकाची विषमता सहन करण्यात गेलं. तारूण्य पूर्ण अभ्यासात, अन् अवघं आयुष्य आंदोलन, लढा, संघर्ष करण्यात गेलं. या सर्वात बाबासाहेबांना आपले छंद-आवड जोपासता आले नसतील.

मात्र वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी व्हायोलिन हे संगीत तंतुवाद्य शिकण्याचा निर्धार केला. वयाच्या साठीनंतर बाबासाहेब तब्बल दोन वर्षे व्हायोलिन वादन शिकत होते. बाबासाहेबांना व्हायोलिन वादन शिकवणारे बळवंत साठे यांनी त्यांना 'व्होयोलिन : हाऊ टू मास्टर इट' हे पुस्तक दिलं.

Dr Babasaheb Ambedkar
Mumbai : खोपोलीतील भीषण अपघातामुळे गोरेगावात पसरली शोककळा

वयाच्या साठीत बाबासाहेबांना काही शारीरीक विकार जाणवत होते. त्यांचा मधुमेहाचा त्रास बळावला होता. व्हायोलिन शिकताना बाबासाहेबांना शरीर साथ देत नसत. थोडा वेळ व्हायोलिन वाजल्यानंतर ते बाजूला ठेवून देत, काही वेळाने पुन्हा वाजवायला सुरूवात करत. पण बाबासाहेब शरीराच्या सर्व विकारांवर मात करत, व्हायोलिन शिकलेच.

एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते. बाबासाहेबांना आपल्या लहानपणी संस्कृत शिकता आलं नाही. कारण त्यावेळी एका दलिताने संस्कृत शिकणं म्हणजे फारच मोठी चूक. पण, बाबासाहेबांनी तरूणपणात संस्कृत आत्मसात केलं.

एखादं संगीत वाद्य शिकण्यावर बाबासाहेबांना लहानपणी कोणती सामाजिक बंधने कदाचित नसतीलही, असेलच तर ती परिस्थितीची बंधनं. पण बाबासाहेबांनी शेवटी-शेवटी व्होयोलिन शिकून तंतूंमधून जीवनसूर उमटवलेच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.