हळू चालणारेच दूरपर्यंत जातात

टोयोटाने निर्धारित केलेली मूल्ये, कामाची पद्धत अजूनही पूर्वीसारखीच आहे
Tortoise And Rabbit
Tortoise And RabbitTortoise And Rabbit
Updated on

पल्याला ससा आणि कासवाची गोष्ट माहीत आहे. सुरवातीला वेगाने पळणारा ससा नंतर झोपतो आणि शांतपणे, सावकाश मात्र अखंड चालत राहणारे कासव अखेर शर्यत जिंकते. आपल्यासारख्या अनेक तरुणांची त्या सशासारखी अवस्था झाली आहे. कोणत्याही क्षेत्रात सुरवातीला आघाडी घेऊन नंतर मात्र आपण एकदम थांबतोय.

देशातील गेल्या काही वर्षांत तरुणांनी निर्माण केलेल्या स्टार्ट-अप सुरवातीला सशासारख्या वेगाने पसरल्या; पण नंतर मात्र सगळे काही जागीच थांबलेय, जवळपास निम्यापेक्षा अधिक "स्टार्ट-अप' बंद झालेत. याउलट जपानमध्ये सन 1891 मध्ये सुरू झालेली छोटीशी स्टार्ट-अप आज जगातील पहिल्या दहा सर्वांत मोठ्या कंपनीमध्ये आहे. ती म्हणजे "टोयोटा.'

टोयोटाने या काळात विश्वासार्ह आणि इंधन कार्यक्षम कार बनविण्यावर लक्ष केंद्रित केले. त्याचा टोयोटाच्या यशामध्ये मोठा हातभार लागला. टोयोटाचा असा विश्वास आहे, की कोणा एकट्याची कार्यक्षमता कधीच यशाची हमी देऊ शकत नाही. शक्‍यतो कोणतीही चूक करू नका. त्याहून वेगळे म्हणजे कंपनीच्या यशाचे आणि अनुभवाचे शहाणपण जमा करणारे ज्ञान या दृष्टीने कंपनी कामगाराकडे पाहते. टोयोटा ही संशोधनावर इतरांच्यापेक्षा दहापट अधिक खर्च करते आणि प्रत्येकाकडून मग तो गॅरेजमधील कामगार असला, तरी त्याच्या सर्वच कल्पनांचे स्वागत करते.

टोयोटा या शब्दाचा जापनीज भाषेतील इथं आहे "सुपीक भाताची जमीन' नावातील अर्थाप्रमाणेच टोयोटा कंपनीचे कार्य आहे. सन 1880 च्या दरम्यान "सकीची टोयोडा' हा शाळकरी मुलगा आपल्या वडिलांना त्यांच्या सुतारकामामध्ये मदत करायचा, त्याची आई कपडे शिवायचे काम करायची. त्या वेळी अत्याधुनिक मशिनरी नसल्याने त्याच्या आईला कपडे शिवताना खूप त्रास व्हायचा. हे सर्व पाहून त्याने सर्वात आधी ठरवले, की मी माझ्या आईचे काम सोपे करणार, अनेक दिवस परिश्रम करून त्याने त्या काळातील शिलाई मशिन तयार केले. त्याच्याही पुढे जाऊन सन 1891 मध्ये कपडे विनायचे मशिन तयार करून त्याचे पेटंट पण घेतले आणि पहिली यंत्रमाग (पॉवर लूम) कंपनी सुरू केली आणि तीच जपानमधील पहिली स्टार्ट-अप. सन 1910 पर्यंत ही यंत्रमाग जपानमधील सर्वात मोठी व्यवसाय करणारी कंपनी होती. अचानक 1910 मध्ये जागतिक मंदी आली आणि ही कंपनी बंद पडायची वेळ आली. स्वतःच्याच कंपनीमधून राजीनामा देऊन बाहेर पडायची नामुष्की आली.

त्यानंतर मात्र सकीची टोयोटाने अमेरिका- युरोपवारी करून वेगळाच व्यवसाय करायचे ठरवले आणि जपानमधील कमी किमतीतील सर्वात पहिली मोटारकार बाजारात आणली. तेव्हापासून 1945 पर्यंत जपानमध्ये टोयोटा या ब्रॅंडने नाव कमावले. पुन्हा दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान टोयोटा कंपनी दिवाळखोरीत गेली. अथक परिश्रम करून 1960 पर्यंत कंपनी पुन्हा उभी करून फक्त जपानमध्येच नाही तर युरोप, अमेरिकेमध्येसुद्धा टोयोटा कंपनीच्या कार रस्त्यावर फिरताना दिसू लागल्या. आजच्या दिवशी जगातील 170 देशांमध्ये टोयोटाच्या कार विकल्या जातात. टोयोटाच्या गुणवत्तेचे कार इंजिन आजपर्यंत जगातील एकाही कार कंपनीला करता आले नाही. एवढे ते गुणवत्ता आणि दर्जाच्या बाबतीत सरस आहेत. कंपनीला मिळालेले यश एका रात्रीत, दिवसात एवढेच नाही तर एका वर्षात पण मिळाले नाही. टोयोटाने संघर्ष केला आणि शीर्षस्थानी पोचली. टोयोटाने इतर वाहन उत्पादकांना मागे टाकण्यासाठी हळूहळू स्वतःला सुधारले. 1980 च्या दशकाच्या सुरुवातीस, अमेरिकेतील फोर्ड आणि जीएमने टोयोटापेक्षा मोठी, चांगली दिसणारी आणि अधिक आकर्षक कार बनविली.

"सकीची टोयोटा' यांची चौथी पिढी आज टोयोटा कंपनी संभाळतेय; पण गुणवत्तेचा दर्जा मात्र आहे तोच आहे. जपानमध्ये फक्त कारच नाही तर इतर अनेक व्यवसायांत टोयोटा कंपनी आहे. जपानमध्ये रोबोटने शिवलेले अतिउच्च दर्जाचे कपडे शिवणारी कंपनी पण टोयोटाच्या मालकीची आहे. लोक एखाद्या व्यवसायत थोडा जरी तोटा व्हायला लागला तरी लगेच दुसरा सुरू करतात. आश्‍चर्य म्हणजे आईला शिलाई मशिन तयार करून देऊन सर्वात प्रथम ज्या उद्योगामध्ये टोयोटाची सुरवात झाली आणि काही वर्षात तो उद्योग तोट्यात गेला आजही जपानमध्ये टोयोटा कंपनी शिलाई मशिन तयार करण्याचे काम करते, कोणताही फायदा आणि तोटा न बघता. आजही टोयोटा इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन अंतर्गत टोयोटा यंत्रमागची कामे चालवते.

आपल्याकडील तरुणांची मात्र अगदी त्याउलट परिस्थिती आहे. वर्ष-चार वर्षाला वेगवेगळे व्यवसाय करणारे, आजच्या आधुनिक भाषेत स्टार्ट-अप काढणारी तरुण पिढी तयार होतेय. व्यवसायातील चढ उतार सहन न होणारी पिढी निर्माण होतेय. देश उभारणीसाठी अशा पिढीचा काहीही उपयोग होत नाही. टोयोटाचे स्वप्न टोयोटा कुटुंबातील अनेक पिढ्यांपर्यंत पोचले आणि आता जगभरात तीन लाख 50 हजार कर्मचाऱ्यांकडून हे स्वप्न साकारले जात आहे. एक मनोरंजक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, की शिलाई मशिन ते फॉर्च्युनर कार निर्माण करणाऱ्या टोयोटाची सुरुवातीच्या काळात निर्धारित केलेली मूल्ये आणि कामाची पद्धत अजूनही पूर्वीसारखीच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()