लाल दिव्याचे व्याव.. व्याव.. विकासाचे म्याव.. म्याव..!

Maharashtra Politics
Maharashtra Politicsesakal
Updated on

एखाद्या भागात मंत्री पद मिळाल्यानंतर त्या भागात जल्लोष साजरा होतो, कार्यकर्ते नवस फेडतात, मिरवणुका निघतात. यामागे फक्त एकच कारण ते म्हणजे विकास. पायाभूत सुविधांची पेरणी होऊन उद्योग येतील, उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्माण होईल. रोजगार मिळाल्यानंतर आर्थिक उन्नती होईल. हे साधं आणि सरळ गणित या मागचे आहे. मात्र लाल दिव्याची हवा डोक्यात गेल्यास विकासाचा चक्काचूर होतो. उत्तर महाराष्ट्राच्या बाबतीत आतापर्यंत तेच झाले आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळा मध्ये नाशिक सह जळगाव व नंदुरबारला कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने विकासाच्या आशा बळवल्या आहेत. आपल्या मतदार संघापुरता विचार संकुचित ठेवल्यास विकास दूर राहील. त्याचा दूरगामी परिणाम त्या भागातील नागरिकांसह आमदारांना देखील भोगावा लागेल.

Maharashtra Politics
ठाकरे कुटुंबाला दृष्ट लागू नये हाच प्रयत्न; बंडखोर आमदाराचं विधान

सध्या राज्याच्या राजकारणात कुठल्या विभागाला मंत्रिपद व महत्वाचे खाते मिळते हा चर्चेचा विषय आहे. 50 दिवसांनी का होईना शिंदे सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला. आता लवकरच खाते वाटप केले जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये नाशिकला अपेक्षेप्रमाणे एक मंत्रिपद दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या रूपाने देण्यात आले. तर जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन (Girish Mahajan) व शिंदे गटाचे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना तर नंदुरबार जिल्ह्याचे डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijayakumar Gavit) यांना मंत्रिपद देण्यात आले. ज्या आमदारांना मंत्रिपद देण्यात आले, ते त्या-त्या भागातील मातब्बर आहे. अनेक वर्षांपासून विजयाचा रथ त्यांच्या बंगल्या भोवतीच फिरतोय. यावेळी देखील उत्तर महाराष्ट्रात तब्बल पाच मंत्रिपदे मिळालीय ज्यावेळी एखाद्या भागात मंत्रिपद येथे त्यावेळी त्या भागाचा विकास होईल. शासनाचे निधीची गंगा त्या भागात खळाळेल अशी अपेक्षा असते. हीच अपेक्षा उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना पाचही मंत्र्यांकडून राहील.

Maharashtra Politics
Eknath Shinde यांचा प्रति शिवसेना भवनासोबतच प्रति शिवसेना उभारण्याचा प्रयत्न सफल होणार?

उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राचा विचार केल्यास पश्चिम महाराष्ट्राचा वेगाने विकास झाला आहे. त्या तुलनेत उत्तर महाराष्ट्रात झालेला नाही. भाजपच्या काळात मराठवाडा व विदर्भाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. विभागनिहाय विकासाचा विचार केल्यास त्या दृष्टीने उत्तर महाराष्ट्र मागासलेला आहे. त्याला कारण म्हणजे येथील उत्तर महाराष्ट्र म्हणून जी काही एकी दाखवायला हवी ती दाखविली जात नाही. आता राजकारणाच्या बदलत्या वाऱ्याचा विचार करून उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांनी एकजुट दाखवून मोठ्या प्रमाणात निधी आणला पाहिजे. नाशिक व जळगाव हे महसुली दृष्ट्या दोन मोठे जिल्हे आहेत. पाणी व जमीन उद्योगांसाठी लागणारे या दोन महत्त्वाच्या बाबी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आहे. नंदुरबार व धुळे जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती आहे. या जिल्ह्यांमध्ये उद्योग कसे आणता येईल याचा विचार मंत्र्यांनी करणे गरजेचे आहे. उद्योगांसाठी निरंतर विमान सेवा गरजेची आहे. विमान सेवा सुरू करून देश विदेशातील उद्योजकांना उत्तर महाराष्ट्राच्या भूमीत आणता येईल.

Maharashtra Politics
मंत्री म्हणून घेतलेला स्वतःचाच निर्णय मुख्यमंत्री झाल्यानंतर का बदलला? - अजित पवार विचारणार जाब

उत्तर महाराष्ट्रात रेल्वेचा विकास होणे गरजेचे आहे. देशाच्या चारही भागाला जोडणारी रेल्वे सेवा आवश्यक आहे. उत्तर महाराष्ट्रात नगदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. फुले व फळभाज्या येथील महत्त्वाचे शेती उत्पादन आहे. त्यामुळे अन्न प्रक्रिया उद्योगांना मोठी संधी आहे. नाशिक ते जळगावच्या पट्ट्यापर्यंत अन्य प्रक्रिया उद्योगांची साखळी निर्माण झाल्यास संपूर्ण देशाला खाद्य पुरविण्याची क्षमता आहे. महामार्ग विस्तारीकरण असो किंवा उद्योगांसाठी जागा उपलब्ध करून देणे असो चारही मंत्र्यांनी उत्तर महाराष्ट्र म्हणून विकासाचे सूत्र अवलंबिल्यास पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ प्रमाणे उत्तर महाराष्ट्राला देखील विकासाची नवीन दिशा मिळेल. येथील युवकांना रोजगार मिळेल. बाहेर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. या बाबीचा विचार करून आता तरी विकासाची गंगा येणे आवश्यक आहे.

Maharashtra Politics
शिवसेनाप्रमुखांनी दिली विधानसभेची उमेदवारी - संजय राठोड

गिरीश महाजन, दादा भुसे, डॉ. विजय कुमार गावित व गुलाबराव पाटील हे चारही मंत्री कर्तबगार आहेत. परंतु त्यांची कर्तबगारी फक्त त्यांच्या मतदारसंघापूर्तीचं दिसून येते. भुसे यांना कसमादे पट्टात वर्चस्व हवे असल्याने त्या भागाकडे ते अधिक लक्ष देतील. गिरीश महाजन यांना जामनेर मतदारसंघावरची पकड दिली नाही. त्यामुळेच जवळपास 300 कोटी रुपयांचा निधी त्यांनी त्या भागाकडे वळविला. जळगाव म्हणून विचार केला असता तर आज जळगावच्या नागरिकांना रस्त्यांच्या खड्ड्यांचा जो त्रास होत आहे तो झाला नसता. डॉ. विजयकुमार गावित यांनी देखील नंदुरबार वरचे वर्चस्व कमी होऊ दिले नाही. गुलाबराव पाटील यांनी देखील मतदार संघाच्या पलीकडे नजर फेकली नाही.

Maharashtra Politics
गरिबांना लुटा अन श्रीमंतांना वाटा, हेच भाजपचे धोरण : नाना पटोले

एकंदरीत विचार करायचा झाल्यास उत्तर महाराष्ट्र म्हणून या चारही मंत्र्यांनी विचार केल्यास एकत्रित ताकद मंत्री मंडळात दिसून येईल व त्या माध्यमातून विकासाची गंगा आणता येणे शक्य आहे. मंत्रीपद हे जादूप्रमाणे असते. कधी राहील, कधी जाईल सांगता येत नाही. उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने विकासाची मोठी संधी निर्माण झाली आहे. लाल दिवा व मतदार संघाचा विचार झाला तर ठिक अन्यथा उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने पहिले पाढे पंचावन्न ठरू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.