प्रतापराव दिघावकर सर आप आगे बढो..!

pratap dighavkar
pratap dighavkaresakal
Updated on

संपूर्ण बागलाणची शान असलेले माजी पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची निवृत्तीनंतर अवघ्या काही दिवसांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी लागलेली वर्णी ही संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी आनंददायी बातमी आहे. प्रदीर्घ पोलिस सेवेत यशस्वी कारकीर्द घालवलेली एखादी व्यक्ती एवढी शालीन, नम्र आणि प्रसंगी तेवढीच कर्तव्य कठोर असू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दिघावकर सर आहेत, याबद्दल कुणाच्याही मनात दुमत नसावे... या नियुक्तीच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्राची पताका दिमाखात फडकत राहणार आहे.

pratap dighavkar
नेते येती शहरा, तोचि दिवाळी-दसरा

पीएच.डी.च्या दोन डिग्री मिळविणारे दिघावकर हे बहुधा एकमेव पोलिस अधिकारी असावेत. उमेदीच्या काळात अनेक ऑपरेशन्स त्यांनी यशस्वीपणे राबविली. देश-परदेशात खडतर ट्रेनिंग पूर्ण केले. पोलिस खात्यात दीर्घकाळ राहूनदेखील प्रामाणिकपणे सेवा देता येऊ शकते, यासाठी त्यांची ख्याती होती. शेतकऱ्यांना सावकारीच्या पाशातून सोडविण्यासाठी जिवाचे रान करणारा हा माणूस पाहिला की समाजकारणात आणि राजकारणात त्यांची अधिक गरज आहे, असे वाटल्याशिवाय राहत नाही. पोलिस खात्यात सर्वोच्च पदावर असतानाही सर्वांत कनिष्ठ कर्मचाऱ्यांनादेखील ते सन्मानाची वागणूक देत, हीदेखील उल्लेख करण्यासारखी बाब आहे.

pratap dighavkar
काश्‍मीरमध्ये काय बदललं?

शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना लगेच समजत. पोलिस खात्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला, सावकारी पाशातून त्यांची मुक्तता केली. पोलिस खात्यात अनुकंपा भरतीची अनेक प्रकरणे अत्यंत कमी वेळात त्यांनी मार्गी लावली. नवी मुंबईत पोलिसांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी त्यांनी सुरू केलेला प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच पोलिस कर्मचारी कुटुंबासह या घरांमध्ये जाऊ शकणार आहेत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी दर्जेदार अकादमी सुरू करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. हे प्रयत्न सुरू असताना एमपीएससीवर सदस्य म्हणून झालेली निवड नक्कीच उत्तर महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी आहे.

https://dai.ly/x838moi

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.