गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

तिकडे गावातल्या दुसऱ्या कोपऱ्यात उशिराने सकाळ झाली होती. अलिकडेच बांधलेला असला तरी डागडुजीऐवजी मोडकळीला आलेल्या त्या महाकाय वाड्यात निरव शांतता होती. वाड्याच्या मालकाला अशीच शांतता आणि अंधार हवा असतो. आपल्याकडे कुणी येऊ नये अन् आपण कुठे जाऊ नये, असा त्यांना शिरस्ता होता. पण कधीकधी गावच्या उत्सवात त्यांना जावं वाटे.
Gofan Article
Gofan Articleesakal
Updated on

गावातले रस्ते चकचकीत झाले होते, भिंती रंगवल्या होत्या, त्यावर कुठे कमळाचं फुल तर कुठे भगव्या रंगाचे पट्टे ओढले होते, अनावश्यक वाढलेल्या झाडांच्या फांद्या कापल्या होत्या, सरकारी इमारतींवर देशाचे गोडवे गाणाऱ्या कविता लिहिल्या होत्या, मंदिरामध्ये भजनी मंडळींनी दिवसाच हरिपाठ सुरु केला होता, दवाखान्यात कधी नव्हे ते डॉक्टर येऊन बसला होता, तलाठी-ग्रामसेवक इमानेइतबारे खर्डेघाशी करीत होते...

गावातल्या प्रत्येक कोन्यावर, चौकात, वीजेच्या खांबांवर अन् झाडांच्या बुंध्यांवर रंगीत फलक लागले होते. त्यावर मुख्य अतिथींचा हात हलवतानाचा फोटो होता आणि 'और एक बार...' असं लिहिलं होतं. गावातल्या सर्वांनी स्वच्छ धुतलेले, इस्त्री केलेले अंगरखे नेसावेत, असा दंडक केला होता. बाया-बापुड्यांनी नऊवारीतच असलं पाहिजे, असं फर्मान निघालं होतं.

सगळी तयारी झाली होती. आता फक्त मुख्य अतिथींचे पाय गावाला लागावेत, यासाठी सगळे डोळ्यात प्राण आणून वाट बघत होते. स्वागत समारंभात कुठेच काही कमी पडू नये, यासाठी गावातलं तरुण तुर्क नेतृत्व देवाभाऊ फडफडे काळजी घेत होते. त्यांनी सर्वत्र नजर टाकली, झेंडे, गमचे, हारतुरे, फटाकड्या.. सगळं होतं. ''अरेच्चा!!'' असं म्हणून देवाभाऊ जागेवरच उडाले. एक नामी गोष्ट विसरली होती.

देवाभाऊंनी तातडीने गावचे कर्तेधर्ते आशिषपंतांना फोन फिरवला. तिकडून त्यांनी ''येस्सS लगेच!'' असं म्हणून फोन ठेवला आणि ते मोहिमेवर निघाले. आशिषपंतांनी गाडीवर टांग टाकली अन् गावात शोध सुरु केला. त्यांना एक झाड हवं होतं.. सुपारीचं! झाडं अनेक होती पण त्यांना सुपाऱ्या लागल्या नव्हत्या.

नदीकाठावर आशिषपंतांना उंच सुपारीचं झाड दिसलं, त्याला बऱ्याच सुपाऱ्या लगडलेल्या होत्या. पंतांनी कसलाच मागचा-पुढचा विचार केला नाही. भराभर झाडावर चढले आणि एक घड तोडून खाली सोडला. सर्रर्रकन् खाली उतरुन दोन-चार सुपाऱ्या खिशात कोंबल्या आणि निघाले, अखेरच्या मोहिमेवर...

तिकडे गावातल्या दुसऱ्या कोपऱ्यात उशिराने सकाळ झाली होती. अलिकडेच बांधलेला असला तरी डागडुजीऐवजी मोडकळीला आलेल्या त्या महाकाय वाड्यात निरव शांतता होती. वाड्याच्या मालकाला अशीच शांतता आणि अंधार हवा असतो. आपल्याकडे कुणी येऊ नये अन् आपण कुठे जाऊ नये, असा त्यांना शिरस्ता होता. पण कधीकधी गावच्या उत्सवात त्यांना जावं वाटे.

आजही त्यांना गावात जावं लागणार होतं. भविष्यातल्या गोष्टी अगोदरच जाणून घ्यायची त्यांच्यात कला होती. कुणीतरी येणार अन् आपल्याला इच्छा नसताना जावं लागणार, हे ते जाणून होते. म्हणूनच भल्या 'दुपारी' ते शुर्चिभूत झाले.. पांढरा शुभ्र कुर्ता, पायजमा आणि पेढ्याच्या रंगाची भलीमोठी शॉल खांद्यावरुन पाठीवर सोडली होती. डोळ्यांवर चौकोनी चष्मा अन् डाव्या हाताच्या मनगटावर आतल्या बाजूने कातडी पट्ट्याचं घड्याळ आवळलं होतं.. एका पायावर दुसरा पाय टाकून साहेब रुबाबदारपणे सोफ्यात बसले होते.

''राजाबाबू.. राजाबाबूSS'' असं म्हणत आशिषपंत पळतच वाड्यात शिरले. राजाबाबू जराही बिचकले नाहीत, ते सगळं जाणून होते. आशिषपंत मटकन् राजाबाबूंच्या गुडघ्याजवळ बसले.. शब्दही न काढता एक घाबरी-घुबरी नजर वाड्यात इकडे-तिकडे टाकली आणि हळून खिशातून सुपारी काढली.. राजाबाबूंचा हात हातात घेऊन तशीच ती सुपारी त्यांच्या मुठीत सोडली आणि आपल्या हाताने राजाबाबूंची मूठ आवळली..

तशाच अवस्थेत राजाबाबूंच्या डोळ्यात डोळे घालून आशिषपंत बोलते झाले-

''राजाबाबू, घ्या ही सुपारी अन् चला वाजवायला... विश्वगुरु गावात यायलेत, तुमच्याबिगर कसली मजा?''

राजाबाबूंना ती सुपारी घ्यावीच लागणार होती. पण त्यांना त्याआधी स्वतःचा रुबाब दाखवून द्यायचा होता.

''छे.छे.. असल्या सुपऱ्या मी घेत नस्तो. तुम्हाला काही मानमरातब कळतो का? उठलेन् आले सुपारी घेऊन.'' असं म्हणून त्यांनी ती सुपारी झटकून लावली.

आशिषपंतांनाही सगळं ठाऊक होतं.. मनधरणी करावी लागणार होतीच, पण आज वेळ कमी होता. त्यामुळे पंतांनी राजाबाबूंच्या पायाला बिलगून 'राजाबाबूSS' असं भोकाड पसरलं. 'चुप चुप के' सिनेमातल्या बांडियाचा 'मालिकS..मालिकSS' हा सीन तयार झाला होता. राजाबाबू तसे कलाप्रेमी होते. त्यामुळे त्यांना ह्या अभिनयासाठी लागणाऱ्या कष्टाची जाण होतीच. त्यामुळे ठरल्याप्रमाणे ते वितळले.. खेकसत बोलले, ''घे ती सुपारी इकडे!''

आशिषपंतांनीही अभिनयाची चुणूक दाखवत, रांगतच जावून सुपारी आणली अन् राजाबाबूंच्या हातात दिली. राजाबाबूंचं बँडपथक तयारच होतं. काही क्षण डोळं बंद करुन त्यांनी कसं वाजवायचं, काय वाजवायचं अन् किती वेळ वाजवायचं.. याचा अंदाज बांधला... वाजवतो पण आपला आब राखला पाहिजे, एवढी साधी अट त्यांची होती.. तेवढ्या एका अटीवर त्यांनी त्या दिवशीही 'बिनशर्त'पणे सुपारी वाजवली होती.

समाप्त

Santosh Kanade

Email: santosh.kanade@esakal.com

मागील 'गोफण' वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Gofan Article
गोफण | भटकती आत्मा.. ऑफर नव्हे सल्ला! प्रकरण कोर्टात
Gofan Article
Dhule Crime News : दगडांसह गोफण, गिलोरचा सर्रास वापर; कॉपर केबल चोरीच्या उद्योगाने साक्रीही बदनाम
Gofan Article
गोफण | 'लाव रे तो व्हिडीओ'चा नवीन सीझन...
Gofan Article
गोफण | कोण म्हणतं मॅनेज उमेदवार दिलाय?
Gofan Article
गोफण | गोविंद नट रामराज्यात परतला
Gofan Article
गोफण | येडी कोठडीत 'अन्नाजी' प्रगटले
Gofan Article
गोफण | एकीकडे आम्हांस गुरुवर्य म्हणता अन् दुसरीकडे...
Gofan Article
गोफण | अण्णा गळकेंनी खरंच धमकी दिली का?
Gofan Article
गोफण | बारामतीकर काकांचं निमंत्रण अन् पाहुणे भुकेने व्याकूळ
Gofan Article
गोफण | दादारावांचा आदर्शवादी अशोकचंदांना सल्ला
Gofan Article
गोफण | गावात कुणी विरोधक आहे का याचा शोध घ्या!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.