गोफण | हे पुतळ्यांनो, आता तुम्हीच सांगा...

Gofan Article: मग एक दिवशी पुतळाच कोसळतो.. कळतंच नाही आम्हाला काय करावं ते. विचार कोसळल्यागत 'रियॅक्ट' होतो आम्ही.. आमच्यातल्याच दुसऱ्यांना नडतो आम्ही
article
articleesakal
Updated on

हे पुतळ्यांनो, आता तुम्हीच सांगा.. आम्ही काय करायचं?

तुम्ही कधी म्हणालात, आम्हाला असं उभं करा म्हणून?

पण आम्ही ते करतोय, कुणासाठी तर आमच्यासाठीच

आमच्यापुरतं आम्हाला बरं वाटावं म्हणून...

आमच्या प्रत्येकात ना नाना तऱ्हेच्या जाणीवा आहेत

कुणाला पुतळा हवाय- विझून जाऊ नये म्हणूनच्या स्वाभिमानासाठी

कुणाला हवाय बेगडी प्रेरणेसाठी.. स्फुर्तीसाठी.. भक्तीसाठी

कुणाला हवाय लुटीपुटीचं लढण्यासाठी, तशाच न्यायासाठी, तसंच उगीउगी पेटून उठण्यासाठी

कुणाला तो हवाय फक्त चौक सजवण्यासाठी..

जाता-येता दिसावा म्हणून बघण्यासाठी.. फार फार तर यंत्रवत मान वाकवून अभिवादनासाठी

खरं सांगू, आम्हाला सवय झालीय जाता-येता तुम्हाला 'हाय-बाय' करण्याची

तुम्ही तिथे आहात की नाही? हे सुद्धा आमच्या गावी नसतं

गाडी बाजूला लावून आम्ही कधीच तुमच्या डोळ्यात डोळे घालत नाही

तुम्हाला नेमकं सांगायचं काय होतं? असा विचार आम्ही कधीच करत नाही

आम्हाला तुम्ही हवेत, पण आमच्यात हस्तक्षेप न करणारे..

म्हणून आम्ही तुमच्याकडे कधीच शिकवणी लावत नाही

मग तुम्हीच सांगा पुतळ्यांनो, कितीशी गरज आहे तुमची आम्हाला?

नाहीच की! तरीही आम्ही सगळं करतो तुमचं

पुतळ्यांच्या जातीचे पुतळे बांधतो..

पुतळ्यांच्या जातीसाठी माणसांच्या जातींना नडतो

पुतळा बांधणाऱ्याचा जयजयकार करायचा की पुतळ्याचा?

हेच आम्हाला उमजलं नाही.. आम्ही नाचतो-गातो धुंद होतो

पुतळ्याचा जयघोष करुन बांधणाऱ्याच्या ताब्यात मेंदू देऊन रिकामे होते

तेच रिकामं डोकं घेऊन पुतळा बांधणाऱ्याची पूजा बांधतो...

मग एक दिवशी पुतळाच कोसळतो

कळतंच नाही आम्हाला.. काय करावं ते

विचार कोसळल्यागत 'रियॅक्ट' होतो आम्ही

आमच्यातल्याच दुसऱ्यांना नडतो आम्ही

कारण मेंदू चोरणारे चोर इकडेही असतात जसे तिकडेही असतात

पुतळा मात्र तसाच असतो 'उभा' धीरगंभीर

अचल, स्थितप्रज्ञ.. सह्याद्रीपेक्षाही उंच.. कणखर

तो कुणाचाच नसतो, खुला असतो सर्वांसाठी

त्याचं कुणीतरी व्हावं या प्रतीक्षेत...

मग तुम्हीच सांगा पुतळ्यांनो, काय करायचं काय आम्ही?

पण तुम्ही बोलणार नाही काहीच. कारण बोलून झालंय तुमचं

आमचंच ऐकायचं राहून गेलंय.. कारण कानासकट मेंदू खेचून नेलाय त्यांनी

डोळे तेवढे ठेवलेत- पेटवण्यासाठी अन् मतदान यंत्रावरील चिन्ह बघण्यासाठी!

समाप्त

Santosh Kanade

Email: santosh.kanade@esakal.com

'गोफण'चे मागील भाग वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा...

article
गोफण | गुलाबी जॅकेटच्या 'त्या' पुढाऱ्याची बिग बॉसमध्ये एन्ट्री
article
गोफण | वेषांतर करुन गेलेल्या गुप्त बैठकीत काय चर्चा झाली?
article
गोफण | निमंत्रितांची बैठक अन् खासदार काकांचा सूचक इशारा
article
गोफण | लाडका भाऊ योजनेची अधिसूचना
article
गोफण | या तुफानाला कुणी तिकीट देतं का? तिकीट?
article
गोफण | पलटू चाचांचा भरोसा येईना...
article
गोफण | गांधी को किसका प्रेरणा था, मालूम है?
article
गोफण | गांधी को किसका प्रेरणा था, मालूम है?
article
गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!
article
गोफण | गोविंद नट रामराज्यात परतला
article
गोफण | 'लाव रे तो व्हिडीओ'चा नवीन सीझन...
article
गोफण | कोण म्हणतं मॅनेज उमेदवार दिलाय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.