प्रश्न वयाचा नाही...हिंदुत्वाचा आहे! Gofan

gofan blog sakal
gofan blog sakalesakal
Updated on

(दोघांमधील हा पत्रव्यवहात निव्वळ काल्पनिक असून त्याचा विद्यमान राजकीय परिस्थितीशी संबंध नाही)

प्रति,

छत्रभूज पुरोगामे,

मंत्री- बिनखात्याचे

विचारविश्व निवास, नाशिक-४२०

विषयः हिंदुत्वाच्या वाटेवर स्वागत असो...

आदरणीय साहेब,

आपण पुरोगामी क्षेत्रातली एक बडी आसामी होता. आपला अभ्यास, आपला व्यासंग, आपली बुध्दीमत्ता अपार. एकवेळ मुंगी मेरुपर्वत गिळेल पण आपण कधी अशी वाट वाकडी करुन वा उलट्या दिशेने प्रवास कराल, असे जन्मात वाटले नव्हते. असंतसं नाही.. तुम्ही थेट प्रतिगामी झालात. असो. उशिरा का होईना पण आपणास सद्बुद्धी मिळाली त्याचा आनंदच आहे. मोदीमार्गाची आस हीच खरी हिंदुत्वाची वाहिवाट आहे..

भाकरी फिरली नाही म्हणून आपण आलात असे कळले. पण काळजी नसावी! आम्ही तुम्हांला उपाशी राहू देणार नाही. आमच्यातली कोर-अर्धाकोर तुम्हांस देऊ. पण तुमचंही वय झालंय.. त्याचाही करावा लागेल. सूत्र तशी आमच्या गोतावळ्याकडेच आहेत ना! काहीही झालं तरी शेवटी नमोभाईच्या मनात काय आहे, कुणाला कधी कळलंय का? परंतु खरं सांगतो, तुम्ही कधी या वाटेवर याल असे वाटले नव्हते... म्हणजे अजूनही स्वप्न वाटतंय हे.

आपले साहेब मोठे धोरणी. बोलतील एक अन् करतील भलतंच... पुतण्या पन्नाशीच्या पुढे गेला, तारुण्य गेलं पण गडी शब्दाबाहेर गेला नाही. तरी आज ही वेळ यावी, विश्वास बसत नाही. आपण आणि आपल्यासारखे दिग्गज इकडे आलाय, त्यामागे नेमकं काय ते कळलं नाही? साहेबांच्या मनात काय ते तुम्ही जाणता.. तेव्हा आम्हांलाही अवगत करावे, ही विनंती.

आपला

अब्दुलपंत हिंदुळे

प्रति,

अब्दुलपंत हिंदुळे,

मंत्री- स्वयंविकास

सच्ची निष्ठा निवास, सिल्लोड-३६० (अंश)

विषयः प्रश्न वयाचा नाही, हिंदुत्वाचा आहे

महोदय,

आपले पत्र मिळाले बरे वाटले. पूर्वी आपण कसे फर्डे गडी होता.. कुणाविषयी काय आणि कसं बोलावं, तुम्हाला कळायचं नाही. पण आज तुमची सुधारलेली भाषा अन् नम्रता बघून मनस्वी आनंद वाटला. शेवटी हीच खरी हिंदुत्वाची वाट, हे मला आज उमजले. आमचं पुरोगामीत्व तुम्ही काढलं, उलट्या दिशेचा प्रवास वगैरे म्हणालात. पण मी म्हणतो, तुम्हांला खरं पुरोमीत्व कळलंय का?

हिंदुत्वाच्या हातात हात घालून, गुण्यागोविंदाने नांदणारं पुरोगामीत्व आज आपल्याला हवंय. देशाला त्याचीच गरज आहे. नाहीतरी देवाभाऊ म्हणालेच आहेत, पुरोगामी सरकार चालवू म्हणून. तुम्हांस हे ऐकू आले नसेलच म्हणा. सद्बुद्धी नेमकी कुणाला प्राप्त झालीय, हे अद्याप तुम्हांस कळणार नाही. खरं हिंदुत्व केवळ आम्हांस कळलं, असं आम्ही म्हणणार नाही. ते आमच्यापेक्षा तुम्हांस जास्त कळलं, असं आम्ही म्हणू.

आमच्या वयाबद्दल बोललात. पण आम्हांला ८२ वर्षांच्या धोरणी साहेबांचा सत्संग आहे.. नव्हे नव्हे होता. म्हणून तुम्ही आमचं वय काढू नये. प्रश्न वयाचा नाहीच मूळी...हिंदुत्वाचा आहे. हिंदुत्व तळपत राहो, बहरत राहो, उजागर होत राहो... याच मनोकामनेपोटी आम्ही ही वाट धरली आहे. आम्हांला अर्धी-कोर हवीय की पूर्ण हवीय, ते कळेल काही दिवसात. अजिबात काळजी नसावी.. साहेबांच्या मनात काय, हे आताच कळणार नाही, ते जाणण्यचा प्रयत्न आम्ही कधी केला नाही, तुम्हीही तो करु नये. एवढंच!

आपला

छत्रभूज पुरोगामे

gofan blog sakal
गोफण | गुगलीने घेतली विकेट!
gofan blog sakal
गोफण | मम्मी मेरी शादी कर दो Gofan
gofan blog sakal
गोफण| थू..थूS..थूSS...!
gofan blog sakal
गोफण | पराभव जिव्हारी लागला अन् मोटाभाई दिल्लीकडे निघाले...
gofan blog sakal
गोफण| फडतूस नहीं काडतूस!
gofan blog sakal
गोफण | 'काळा चष्मा घातल्यावर पित्त वाढत नस्तंय'
gofan blog sakal
गोफण| तुमची 'केरळ स्टोरी' वेगळी आमची वेगळी...
gofan blog sakal
गोफण | एका दगडात पक्षी तरी किती मारावेत
gofan blog sakal
Gofan | बोलभांडे रौतांची 'ती' खेळी उधार राजेंना कळली तेव्हा...
gofan blog sakal
गोफण| ऐका हो ऐकाSS.. कोण जास्त लोकप्रिय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.