दिवाळी पाडव्याला सगळेच गावात जमले होते. लहान-थोर, डावीकडून उजवीकडे गेलेले, डावीकडे असून कधीकधी उजवीकडे जाऊ पाहणारे, अबालवृद्ध, महिला, पाव्हणेरावळे.. सगळा गोतावळा जमला होता. आजपर्यंत गावात हसवण्याच्या किंवा फसवण्याच्या स्पर्धा व्हायच्या. पण यंदाचं वर्ष जरा धोक्याचं होतं, म्हणून रडवण्याची स्पर्धा भरली होती. कुठल्याही गटावर रडण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे हा सगळा प्रपंच सुरु होता.
समोर बसलेल्या श्रोत्यांना जो रडवेल त्यालाच 'पाडवा पहाट खिताब' मिळणार होता. एक गट होता बारामतीकर काकांचा तर दुसरा गट होता दादाराव दणगटेंचा. दोन्ही गट कितीही पट्टीचे असले तरी समोरच्यांना रडवणं तसं सोपं काम नव्हतं. दादारावांची तर आधीच कंबर गळाली. आता काय करावं त्यांना कळेचना. ते ताडकन् उठले अन् बोलायला लागले. ''हे बघा ही असली रडारड मला मान्य नाही.. आपलं नाणं खणखणीत-''