चढणीचं हेलिकॉप्टर उतरणीला लागलं होतं. धड्धड्धड्..धड्SS.. करीत त्याने प्रचंड मोठा धुळाचा लोट जागा केला आणि घटकाभर स्वतःला गडप करुन टाकलं. त्याच धुळीच्या लोटातून एक आकृती पुढे येत होती. फुफुट्याला न जुमानता ती पांढरीशुभ्र आकृती हळूहळू स्पष्ट होत होती. फटाक्यांची आतषबाजी झाली, तोफा धडाडल्या, ढगात आदल्या घुमल्या, कुणीतरी दिवसाढवळ्यात भूईचक्र फिरवलं.. सगळा जंगी कार्यक्रम लागला होता. त्यातच आधीच सांगितल्यामुळे हेलिकॉप्टरच्या पायलटने 'कौन है वो कौन है वो..' हे गाणं वाजवलं. त्या पांढऱ्या काटक आकृतीलाही बाहुबली झाल्याचा फिल आला अन् जराशी चाल बदलली.