गोफण | मी पुन्हा येईन... मग यांनी काय करायचं?

gofan article
gofan articleesakal
Updated on

दादाराव दणगटेंची तब्येत बिघडण्याच्या मार्गावर होती.. खिन्न मनाने ते दुनियादारीची रिल्स बघत होते-

''कसं झालं? का झालं? माझ्या मर्जीने झालं की बळजबरीने? हे आता महत्त्वाचं नाहीये.. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. आता फक्त एकच विनंतीय.. ते सगळं विसरुन जा.. स्वतःला त्रास करुन घेऊन नकोस.. माझं ऐकशिल ना?''

''साला एका भेटीत किती अटी घातल्या तिने.. केलेलं प्रेम विसरायचं, त्रास नाही द्यायचा.. हिने लिहिलेली पत्रं.. हिच्या सगळ्या आठवणी पुसून टाकायच्या... का तर हिला भिती मी हिच्या संसारात विष कालवेल.. दिघ्या सिगारेट ओढतो, दारु पितो, राडा करतो, मारामाऱ्या करतो. दिघ्या कसाही असेल पण दिघ्या नीच नाहीये रे.. ओळखलं नाही हिने मला.. टिक् टिक् वाजते डोक्यात... धड धड वाढते ठोक्यात...''

रिल्स बघून दादारावांच्या डोळ्यात टचकन् पाणी आलं. असाच काहीसा प्रसंग त्यांच्या बाबतीत घडला होता. जेव्हापासून 'मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन' हा व्हिडीओ त्यांनी बघितला होता, तेव्हापासून त्यांना असेच सॅड रिल्स दिसायला लागले होते. दादांचं डोकं गरगरायला लागलं. एकच आवाज डोक्यात घुमत होता- नवराज्याच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन.. दुष्काळ-बेरोजगारी-शहरांचा चेहरा बदलण्यासाठी...मी पुन्हा येईन.

दादाराव मोठ्याने ओरडले. ''गप् रे.. काय मजाक लावलाय काय आमचा? आम्हाला काही महत्त्वाकांक्षा आहेत की नाही? काकाचं बोट सोडून यांच्यासोबत बस्तान बांधलं ते कशासाठी? हे असलं कायबाय ऐकण्यासाठी? काय ते स्पष्टीकरण द्या नाहीतर मी पुन्हा आजारी पडेन.. पुन्हा आजारी पडेन'' दादाराव स्वतःशीच पुटपुटत होते.

यावेळी दादारांना खरोखरच ताप भरला होता. परंतु 'लांडगा आला रे आला' या समजुतीप्रमाणे त्यांच्या दुखण्याकडे फारकाही कुणी लक्ष देईना. ''माझं खरंच दुखतंय रे.. डोकं गरगरायला लागलंय, ताप भरलाय अंगात'' हे ऐकून सहकारी लगबगीनं धावत आले. दादारावांनी औषध घेतलं अन् राज्याचे जहागीरदार नाथाभाई दाढीवाले यांना फोन फिरवला.

नाथाभाई : आणि म्हणोन.. हॅलोS

दादाराव : (भाषणाच्या स्टाईलमध्ये) राजकारण करत असताना-समाजकारण करत असताना अनेक अडचणींचा आपल्याला सामाना करावा लागतो. परंतु आजची अडचण ही मोठी अडचणंय. आम्ही आमच्या काकाचं बोट सोडून विकासासाठी-केवळ विकासासाठी-लोकांच्या भल्यासाठी-हिंदुत्वासाठी-शेतकऱ्यांसाठी-बेरोजगारांसाठी-आरक्षणासाठी इकडे आलो.

नाथाभाई : (शांतपणे दाढीवरुन हात फिरवत) आणि म्हणोन काय झाले?

दादाराव : (जरासं चिडून) काय झाले काय काय झाले? तो व्हिडीओ बघितला नाही काय? देवाभाऊंचा.. पुन्हा येईन म्हणतायत. आश्वासन तर मला दिलं होतं ना? त्याचं काय झालं? म्हणजे आम्ही येडे..!

नाथाभाई : (तोच शांतपणा) सध्या तर मी आहेच.. माझ्यानंतर कोण, हे मला माहिती नाही. माझ्याशी तसं काही बोलणंच झालेलं नाही. तुमच्यामुळे मला निर्माण झालेला धोका टळला अन् मी कुटुंबासह दिल्लीधाम करुन आलो.. त्यामुळे सध्या फक्त आत्मशांती आणि अध्यात्मिक बैठक पक्की करण्याच्या प्रयत्न करतोय. कारण पुढे काहीही होऊ शकतं... आणि म्हणोन-

दादाराव : (नाथाभाईंना मध्येच थांबवत खेकसले) तुमचं जाऊ ना राव! मिळाली ना मुदतवाढ.. मग घ्या ना मजा.. पण पुढचं काय? पुढं आमालाच पाह्यजेल.. तसंच ठरलेलं. हे आता मध्येच 'मी पुन्हा येईन.. पुन्हा येईन' म्हणायलेत.

नाथाभाई : (दादारावांनी तोडलेलं वाक्य पूर्ण करण्याचा अट्टहास) आणि म्हणनो हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे.. इथं कुणीही मोठा नाही की छोटा नाही... ज्यांनी हिंदुत्वाचे विचार सोडून हिंदुविरोधी विचार अंगिकारले आहेत, त्यांचं हे सरकार नाही.

दादाराव : (चिरडीला येऊन) अहो पण माझं काय? मी तर हिंदुत्वाच्या विचारांसाठी इकडे आलो ना? देवाभाऊंनी शब्द दिला होता, तुम्हालाच जहागिरी देतो म्हणून.. मग आता? माझ्यासारख्या सर्वसामान्य हिंदूवर तुम्ही अन्याय नाही करु शकत...

नाथाभाई : (डोळे बंद करुन) न्याय-अन्याय हे तुम्ही-आम्ही नाही ठरवू शकत. सगळं तो ठरवतो.. वरचा-दिल्लीचा. त्याच्याकडं सगळ्या नोंदी आहेत. एक दिवस येईल अन् तुम्हाला न्याय मिळेल. फक्त भक्तीमध्ये कसूर होऊ देऊ नका.. शांती-शांती-शांतीही. ठेऊ? बरं ठेवतो.

असं म्हणून नाथाभाईंनी फोन ठेवला. दादाराव तडफडत होते. त्यांना वाटलं देवाभाऊंना फोन करुन झाप-झाप-झापावं. पण धीर होईना. शेवटी त्यांची कितीही दादागिरी असली तरी आजकाल काही गोष्टींमध्ये ते जरा दबकूनच असत.

ज्याच्यासाठी एवढा अट्टहास केला, ती संधी हातची जावू नये नाहीतर सगळं मुसळ केरात जाईल, याची त्यांना भीती होती. धड दुखणंही काढता येईना अन् कुणाला झापताही येईना.. अशा विचित्र अवस्थेत दादाराव दणगटे अडकले होते.

gofan article
गोफण | टोलधाडीला फोडून काढण्यासाठी राजासाब सज्ज
gofan article
गोफण | पुण्य नगरीची जहागिरी पाटीलबुवांना सुटेना...
gofan article
गोफण | देवाभाऊंकडेच जाणार सत्तेची सूत्र
gofan article
गोफण | पत्रकारांवर बहिष्कार घालणाऱ्यांनी परिषदेत येऊ नये!
gofan article
गोफण | दख्खनच्या मऱ्हाठ्यांचा विद्रोह अन् दिल्लीकर बेचैन!
gofan article
गोफण | काका बारामतीकरांची कुजबुज अन् संभ्रम
gofan article
गोफण | पॉवरफुल काका देतील मुक्तीचा मार्ग...
gofan article
गोफण | त्यागमूर्ती... वैराग्यमूर्ती प्रतोदशेठ
gofan article
गोफण| काका चिडले पण नमोभाईंपुढे करणार काय?
gofan article
गोफण| नमोभाईंची 'ही' खेळी दादारावांना पटली नाही
gofan article
गोफण| गद्दार, खोके, लाचार, खंजीर... अन् मुलाखत संपली!
gofan article
गोफण | जंगलाचाही एक कायदा असतो, पण इथे...
gofan article
गोफण | बंद दाराआडची गुपितं
gofan article
गोफण | गुगलीने घेतली विकेट!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.