बिहारपुरीचे पलटूचाचा आज जरा जास्तच निवांत होते. कुठेही जाऊ नये, काहीही करु नये, कुणाशी बोलू नये, कुणाशी भांडू नये, उठू नये, बसू नये.. नुसतं पडून राहावं; असा त्यांचा ओरा होता. शेतातल्या आंब्याच्या गर्द सावलीत बाज टाकून ते पहुडले होते. अमाप संपत्ती असली आणि येनकेन प्रकारे खुर्ची मिळवण्याची हातोटी असली तरी आजही ते साधा बटनाचा मोबाईल वापरत असत.. तरीही जगभरातले अपडेट्स त्यांच्यापर्यंत कसे आणि कुठून येतात, हे मात्र अजून कुणाला कळलेलं नव्हतं.
गार हवेच्या झुळकीने पलटूचाचांना डोळा लागला होता. तेवढ्यात तो बटनाचा मोबाईल खनकला.. पलटूचाचांनी आत्यंतिक तिरस्काराने फोन उचलला. तिकडून उत्सवी आणि उत्साही आवाज आला.. ''आईये ना महाराज.. कहाँ रेह गए''
''कौन?'' पलटूचाचांनी निराशेचा सूर आवळला. चाचांचा बेरकीपणा सर्वश्रूत होता. सगळं माहिती असूनही अलिप्त राहाणं आणि काही माहिती नसतानाही सर्वज्ञ असल्याचा आव आणणं, त्यांच्याएवढं कुणालाच जमत नसेल. तिकडून बोलणारे महाबेरकी होते.
''कौन क्या कौन? पैचाने नै.. अरे हम-हम. जहाँ कम वहाँ हम| पैचाने क्या?'' तिकडचे महायश ओळखण्याच्या अपेक्षेने 'हिंट' देत होते.
''अंहं.नाना.. कौन है भाई? तनिक नाम तो बताओ'' पलटूचाचा आज पुरता बदला घेणार, असं दिसत होतं.
''नाम की जरुरत और हमें..हाहा हाहा..हाहा...'' हसण्यातला 'नाईलाज' लपून राहात नव्हता.
''अरे भै हसो मत| आप किससे बात करै पताए... अब नाम बताते हैं या रखें फोन''
तिकडून, ''अरे चाचाजी ऐसा मत करो, जान निकल जाएगी हमारी... हमारे नामही नमो हैं|''
इकडून चाचाजींनी कसनुसं तोंड केलं, ''अॅ.. नमो? ऐसा भी कोई नाम होताय क्या? इतना छोटा..''
''चाचाजी वो शॅटफाम है हमारा, लोग प्यार से बुलाते हैं| हमारे असली नाम नमोभाई विश्वगुरु हैं''
नाव ऐकून चाचाजींना कसलाही झटका बसला नाही, कारण त्यांना ते ठाऊक होतं. पण ढोंगीपणाचा दुसरा अंक त्यांनी सुरु केला. ''अरे..जीजीजी| माफी..माफी जी माफी.. ये हमारे फोनवा ऐसा कुछ पताही नै चलता| बताओ ना महाराज क्या बात हैं''
तिकडून नमोभाई कळकळीने बोलले, ''अरे चाचाजी आप आने वाले थे.. पार्टी दे रहें हैं हम, न्योता भी भिजवाया.. आदमी भी भेजे थे-''
चाचाजी बेगडी आश्चर्याने बोलले, ''अॅSS ऐसा.. हमको तो कोनो पता ही नै| कोई बताया भी नै.. सच्ची; मगर किस खुशी में पार्टी दे रहे हों महाराज?''
नमोभाईला हे ढोंग कळलं होतं, पण नाईलाज होता.. मन जपायचं होतं. ''ऐसे ही.. प्यार बढता हैं, बाते होती हैं.. कुछ जरुरवाली चिजों का लेनदेन होता हैं''
''पैले से इतनो की पार्टीया ले लियो हो.. अब पार्टी दे रहें हो महाराज? ये कुछ समझ में नै आया'' चाचाजींनी कळीच्या मुद्द्याला हात घातला.
नमोभाईंना चिडायचं होतं, पण आज त्यांना सगळं सांभाळून घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. ''चाचाजी छोडीये सब बातें.. हमें सब मंजूर हैं लेकिन आज वो मत निकलो.. आज पार्टी को आपकी जरुरत हैं इसलिए तो पार्टी दे रहें है''
''आप कहें और हम न आए ऐसा नहीं हो सकता.. दे देंगे समर्थन, लेकिन थोडा धीरज रखियेगा'' पलटूचाचांनी विचार करायला वेळ मागितला.
''नै..नै जी इतना समय काहां| आप को हेलिकॉप्टर भिजवाते हैं लेकिन जल्दी किजिऐ.. नै तो एंडीवाले आपको हमारे बारे मैं अनाब-शनाब कहेंगे''
पलटूचाचांनी आता मुद्द्यावर यायचं ठरवलं, ''कौन क्या कहता हैं, वो छोडीए महाराज.. हमारा जो डिमांड हैं वो तो मिलना चाहिए ना| आपका ऑफर तो बताईगा''
नमोभाई तळमळीने बोलत होते, ''चाचाजी आप जो कहेंगे वो ऑफर.. आप जो बोलेंगे वो मिलेगा| लेकिन आप इधर-उधर की बाते सुनिएगा मत''
''महाराज, आप हो तो हम को किसीको कोनो जरुरत नै.. ये लिजिए हमारे वो वाला फोन भी बंद'' असं म्हणून पलटूचाचांनी खिशातून दुसरा एक बटनाचा मोबाईल काढला आणि बंद करुन टाकला. निघण्यासाठी जे हेलिकॉप्टर तयार होतं, त्यात आधीच काही लोक येऊन बसले होते.. ''जमलं तर बघू'' असं म्हणून त्यांनी पलटूचाचांनी गळ घालायची ठरवलं.
समाप्त
Santosh Kanade
Email: santosh.kanade@esakal.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.