Gun Culture In America: अमेरिकेत बंदुक संस्कृतीची सामाजिक दहशत

अमेरिकेत 20 जानेवारी 2021 पासून गोळीबारांच्या 1468 घटना घडल्या ज्या मध्ये प्रत्येक घटनेत सरासरी चार पेक्षा अधिक लोक दिवसाकाठी ठार होत आहेत.
Gun Culture In America
Gun Culture In AmericaSakal
Updated on

Gun Culture In The America: 28 मार्च रोजी अमेरिकेत आल्यापासून दोन गोष्टींची मला तीव्र जाणीव होत आहे. बंदुक संस्कृतीमुळे निष्पाप बालकांवर शाळातून होणारे माथेफिरूंचे हल्ले तसेच मॉल्स व अन्य सार्वजनिक ठिकाणी होणारे त्यांचे हल्ले यातून एका वेगळ्यात दहशतीच्या मानसात अडकलेले अमेरिकेचे समाजमन प्रत्ययास येत आहे.

काही वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध नियतकालिकातील एका लेखात म्हटले होते, अमेरिकेला दहशतवाद्यांची काही गरज नाही, कारण त्यापेक्षाही अधिक दहशत आहे, ती हवामान बदलामुळे वारंवार येणाऱ्या नैसर्गिक संकटाची व त्यात होणाऱ्या मानवी व सार्वजनिक संपत्तीच्या नुकसानाची. तीव्र जाणीव होणारी ही दुसरी गोष्ट.

अमेरिकेसाऱख्या अत्यंत प्रगत देशाने सर्व क्षेत्रात प्रगती करूनही हवामान बदलामुळे होणारे पूर, बर्फाची वादळं, शहरांजवळील जंगलातून पेटणारे वणवे, मड स्लाइड्स, जीवघेणी बर्फवृष्टी, शहरे व उपनगरे जमीनदोस्त करणाऱ्या वावटळी, कधी न पाहिलेली थंडी व उन्हाळा यामुळे केव्हा व किती वाताहात होईल, याचा अंदाज बांधणे व त्यापूर्वी काही प्रतिबंधक उपाय योजणे कठीण झाले आहे. तरीही कमीत कमी मनुष्यहानि व्हावी, यासाठी प्रयत्न चाललेले असतात.

2021 मध्ये अमेरिकेत आलेल्या शीत लहरींमुळे 230 लोक मृत्यूमुखी पडले व अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे 770 लोक ठार झाले. `गॅपमाइंडर डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळानुसार, ``1907 ते 1916 दरम्यान नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण प्रतिवर्ष तब्बल 3 लाख 25 हजार होते.

पण, शंभर वर्षांनंतर 2007 ते 2016 मध्ये हे प्रमाण घसरून प्रतिवर्ष 80,386 इतके खाली आले.’’ याचा अर्थ, नैसर्गिक संकटांचा सामना करताना कोणत्या दक्षता घ्याव्या, याची माहिती सामान्य जनतेपर्यंत बऱ्यापैकी पोहोचू लागली.

अमेरिकेत केलेल्या पाहाणीनुसार, ``1980 पासून आलेल्या 348 नैसर्गिक संकटांमुळे राष्ट्रीय संपत्तीचे 2.510 महापद्म (ट्रिलियन) डॉलर्स एवढे प्रचंड नुकसान झाले.’’

पण खऱ्या अर्थाने मनाला सुन्न करणारी बाब म्हणजे, जो बायडन यांनी राष्ट्रपती पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून (जानेवारी 20, 2021) बंदुकीच्या हिंसाचारामुळे तब्बल 50 हजार लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.

20 जानेवारी 2021 पासून गोळीबारांच्या 1468 घटना घडल्या ज्या मध्ये प्रत्येक घटनेत सरासरी चार पेक्षा अधिक लोक दिवसाकाठी ठार होत आहेत. अमेरिकेच्या या समस्येवर अद्याप कोणताही रामबाण उपाय लागू करण्यात आलेला नाही.

विशेष म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष असताना त्यांनी व अमेरिकेतील गन लॉबीने नागरिकांना बंदुक, पिस्तुल आदी वापरण्यापासून परावृत्त तर केले नाही, उलट ``अमेरिकन नागरिकांच्या हक्कांवर अशी बंधने घालून गदा आणली जात आहे,’’ असा प्रचार केला.

ढोबळ मानाने, अमेरिकेतील डेमॉक्रॅटिक पक्ष त्यावर बंधने घालण्याच्या बाजूने आहे, तर रिपब्लिकन पक्ष त्याला विरोध करीत आहे. त्यामुळे अमेरिकन संसद कोणतेही ठाम पाऊल टाकू शकलेली नाही.

अमेरिकेच्या राज्यघटनेतील दुसऱ्या कलमाच्या दुरुस्तीनुसार, ``स्वतंत्र राष्ट्राच्या सुरक्षेसाठी उत्तम नागरीसेनेची गरज असल्याने शस्त्र बाळगण्याच्या नागरिकांच्या अधिकाराचे उल्लंघन करता येणार नाही. पर्यायाने स्वसंरक्षणासाठी हत्यार (बंदुक आदी) बाळगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.’’

परंतु, गेल्या वर्षी 24 मे 2022 रोजी टेक्सासमधील उव्हाल्डे येथील शाळेत झालेल्या गोळीबारात 19 मुलांची झालेली निर्घृण हत्या व 27 मार्च 2023 रोजी नॅशव्हिले (टेनेसी) येथील ग्रीन व्हील्स उपनगरातील शाळेत झालेल्या गोळीबारात तीन विद्यार्थी व तीन शिक्षकांच्या झालेल्या हत्येने वरील घटनादुरूस्तीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

तिन्ही विद्यार्थी सहाव्या वर्गातील होते. त्यांच्यावर गोळीबार करणारा आयडेन हेल हा त्याच शाळेचा माजी व तृतीयपंथी विद्यार्थी होता. पोलिसांच्या चकमकीत तो ही ठार झाला. त्याने वापरलेल्या हत्यारात केलटेक सब 2000, एआर 15 व हँन्ड गन या दोन बंदुका व एक पिस्तुल यांचा समावेश होता.

उव्हाल्डे येथे झालेल्या गोळीबारातही एआर 15 या बंदुकीचा वापर केला गेला. एआर 15 या रायफलचा वापर प्रामुख्याने युद्धकाळात सैनिक करतात, परंतु, आता मारेकरी तिचा वापर शाळेवर हल्ला करण्यासाठी करीत आहेत, ही अत्यंत गंभीर बाब असून ``या व अन्य हत्यारांवर त्वरित बंदी घालण्यात यावी,’’ असे आवाहन बायडेन यांनी 27 मे रोजी व्हाईट हाऊसमध्ये बोलताना केले.

या प्रकारच्या गोळीबारात दोन एके 47 रायफल्सचा वापर झाल्या चे ते म्हणाले. विशेष म्हणजे, एआर 15 मधून होणाऱ्या गोळीबारातून चिलखत घातलेली व्यक्तीही वाचू शकत नाही.

अमेरिकेत होणाऱ्या या हल्ल्यातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे, की घटनेतील दुसऱ्या कलमातील स्वसंरक्षणाचे उद्दिष्ट केव्हाच बाजूला पडले असून, या हत्यारांचा वापर आता थेट निष्पाप जनता व शाळेतील विद्यार्थ्याना ठार करण्यासाठी केला जात आहे.

Gun Culture In America
Blog : 'काँग्रेसमुक्त भारत'ला यश? अपात्र राहुल गांधी अन् संसदेचे तीन तेरा

मॉन्टेरे बे येथे बोलताना अध्यक्ष जो बायडन यांनी निर्धार व्यक्त केला, ``आय अयाम डिटरमाइमन्ड वन्स अगेन टु बॅन एसॉल्ट वेपन्स अँड हाय कपॅसिटी मॅगॅझीन्स. आय डिड इट वन्स एज सिनेटर. वि आर गोइंग टु डू इट अगेन.’’

1994 मध्ये सम्मत करण्यात आलेल्या `क्राईम बिल (विधेयक)’ ने दहा वर्षांसाठी या प्रकारच्या हत्यारांवर बंदी घातली होती. परंतु , 2004 मध्ये ती चालू ठेवण्यासाठी आवश्यक असलेले बहुमत मिळाले नाही. रिपब्लिकन सिनेटर्सनी त्याला पाठिंबा दिला नाही.

बायडन यांच्या मते, ``अमेरिकेत होणाऱ्या बंदुक हिंसाचाराला साथीचे स्वरूप आले असून, आंतरराष्ट्रीय दृष्टीने ही अत्यंत मानहानिची, लाजिरवाणी (एम्बरॅसमेन्ट) बाब होय.’’

एप्रिल 10 ते 17 दरम्यान प्रसिद्ध झालेल्या `टाइम’ या नियतकालिकातील लेखानुसार, ``या प्रकारच्या हत्यारांवर बंदी हवी, असे अमेरिकेतील 63 टक्के लोकांचे मत आहे. तथापि, अमेरिकेतील 45 टक्के घरातून किमान एक हत्यार अस्तित्वात असून, 56 टक्के मतदारांना अशा हत्यारांवर कठोर निर्बंध हवेत.

Gun Culture In America
What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

त्यासाठी 76 टक्के डेमॉक्रॅट्स अनुकूल, तर 88 टक्के रिपब्लिकन्स प्रतिकूल, असे विषम चित्र आहे.’’ त्यामुळे, बायडन यांचा निर्धार राजकीय कचाट्यात सापडलाय. दरम्यान, भीती आहे, ती या प्रकारचे हल्ले थांबविणार कोण याची.

शाळेतील विद्यार्थ्यांवर उठसूट हल्ले होत असताना अमेरिकेतील पोलिस यंत्रणा निष्प्रभ ठरत आहे, असेच सातत्याने दिसून येत आहे. अमेरिकेसारख्या अत्यंत प्रगत देशात ही सामाजिक चिंतेची बाब बनली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()