National Anthem : बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'त्यांनी' गायिलं राष्ट्रगीत अन् जगभरात उमटला कोल्हापुरी ठसा!

मुंबईतील राजकमल स्टुडिओत सलग दिवसभर या चित्रफितीचे शूटिंग झाले होते
Independence Day Amitabh Bachchan
Independence Day Amitabh Bachchanesakal
Updated on
Summary

कोल्हापूरची ही विशेष मुलं केवळ जगभर गेली नाहीत तर जगभरात त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबरीने विशेष मुलांच्या प्रश्नांचा जागर मांडला आहे.

आपले राष्ट्रगीताचे (National Anthem) सूर कानावर पडताच आपण जिथे आहे तिथे थांबतो आणि राष्ट्रगीत म्हणतो. मात्र, कोल्हापुरातील (Kolhapur) विशेष मुलांनी साकारलेल्या सांकेतिक भाषेतील पहिल्याच राष्ट्रगीताच्या माध्यमातून जगभरात विशेष मुलांच्या प्रश्‍नांचा जागरही होतो आहे.

सहा वर्षांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याबरोबरीने या मुलांनी हे राष्ट्रगीत गायिले असून आजअखेर सहा लाखांहून अधिक लोकांनी ते एकट्या ‘यू-ट्यूब’च्या प्लॅटफॉर्मवर पाहिले आहे. वु ई केअर फिल्म फेस्ट व ब्रदरहूड या दिल्ली येथील स्वयंसेवी संस्थेच्या वतीने विकलांग विषयावरील लघुपटांच्या राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा होत असतात.

Independence Day Amitabh Bachchan
जंगलात बेछूट गोळीबार, हल्ल्यात पायांना लागल्या गोळ्या, तरीही दहशतवाद्यांना संपवलं; माजी सैनिकानं सांगितला 1994 चा थरार

सात-आठ वर्षांपूर्वी असाच महोत्सव भरला होता. त्यावेळी सर्व विकलांग मुलांबरोबर अमिताभ बच्चन यांच्या बरोबरीने सांकेतिक भाषेत राष्ट्रगीताच्या चित्रफितीची संकल्पना पुढे आली आणि दोन वर्षांनी ती कल्पना सत्यात उतरली. या चित्रफितीला आदेश श्रीवास्तव यांचे संगीत असून गोविंद निहलानी यांचे दिग्दर्शन आहे.

येथील चेतना विकास मंदिरच्या सुशांत कुंदे, वन्या करकरे, निखिल डाफळे, अनिशा सुतार, विशाल मोरे, आम्रपाली कांबळे, विनम्र खटावकर, प्रतीक्षा कराळे या विद्यार्थ्यांचा अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या या विशेष चित्रफितीत सहभाग आहे. त्याशिवाय राज्यातील इतर काही विशेष मुलांच्या शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचाही या चित्रफितीमध्ये समावेश आहे.

Independence Day Amitabh Bachchan
Loksabha Election : माढ्याचा पुढील खासदार काँग्रेस पक्षाचाच असेल; माजी मुख्यमंत्र्यांचं थेट भाजपलाच चॅलेंज

या राष्ट्रगीताच्या अनावरण सोहळ्यानंतर काही दिवसांनी ही चित्रफीत सर्वत्र उपलब्ध झाली. विविध सेवाभावी संस्था, थिएटरमध्ये राष्ट्रगीतासाठी ही चित्रफीत वापरून विकलांग आणि विशेष मुलांच्या एकूणच प्रश्‍नांबाबत जागर मांडण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसादही मिळतो आहे. विशेष म्हणजे, केवळ भारतातच नव्हे तर जगभरात भारतीय राष्ट्रगीतासाठी ही चित्रफीत वापरली जाते.

विशेष मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी...

विशेष मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही विविध उपक्रमांद्वारे सातत्याने प्रयत्न करत असतो. सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीत हासुद्धा त्यातीलच एक अनोखा उपक्रम होता. मुंबईतील राजकमल स्टुडिओत सलग दिवसभर या चित्रफितीचे शूटिंग झाले होते आणि हे होत असताना ही विशेष मुले आणि त्यांच्या पालकांनाही त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले होते.

या चित्रफितीचे चित्रीकरण सुरू असताना बिग बी अमिताभ बच्चन यांची तयारी कशी असते, साध्या साध्या गोष्टी व्‍यवस्थित होण्याठीही ते किती कष्ट घेतात, हे सर्वांनाच जवळून पाहता आले. बच्चन यांच्या या गुणवैशिष्ट्यांमुळेच त्यांचे भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील स्थान का अविभाज्य आहे, याचाही उलगडा यानिमित्ताने सर्वांना झाला.

Independence Day Amitabh Bachchan
Shivsena Politics : एकनाथ शिंदे सुद्धा 'मातोश्री'वर माफी मागायला आल्यास..; राऊतांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलं मोठं विधान

या माध्यमातून कोल्हापूरची ही विशेष मुलं केवळ जगभर गेली नाहीत तर जगभरात त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबरीने विशेष मुलांच्या प्रश्नांचा जागर मांडला आहे. ही चित्रफीत पाहिल्यानंतर आजही अनेकांचे शाळेत फोन येतात आणि उजाडल्यापासून मावळेपर्यंत विशेष मुलांचा दिवस कसा असतो.

प्रत्येक गोष्ट करताना ते काय विचार करत असतील, एखादी गोष्ट समजावून सांगितल्यानंतर त्यांचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आणि प्रत्यक्षात त्यांच्याकडून होणारी तशी कृती आणि आपल्या विशेष पाल्याचा हा प्रवास पाहणारे पालक, त्यांच्या सकारात्मक बाबीनंतर मिळणारा पाल्यांचा प्रतिसाद, आनंदाश्रूंच्या भावभावनांनी त्यांचे अभिमानाने फुललेले चेहरे, आपल्या पाल्याने नवनवीन गोष्टी कराव्‍यात यासाठी वाढलेला त्यांचा हुरूप आणि पाल्यांचा वाटणारा ‘विशेष’ अभिमान...

Independence Day Amitabh Bachchan
Independence Day : मला नेहमीच कोल्हापूरकरांचा अभिमान वाटत राहिलाय; असं का म्हणाले अजितदादा?

या सर्व गोष्टी मनाच्या गाभाऱ्यात तरंगत राहतात. नैसर्गिक न्यूनतेवर वेगवेगळ्या गोष्टी करत अथक प्रयत्नांनी विशेष मुलांनी केलेली मात पाहून मन अतीव समाधानाने भरून येते. एकूणच या विशेष मुलांचे सर्वत्र होणारे कौतुक पाहून संस्थेची धडपड सार्थकी लागत असल्याचे संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष पवन खेबूडकर सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()