आत्मनिर्भर भारताची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली ती देश प्रगती करीत असताना स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी. विदेशी कपडे वापरण्यापेक्षा चरख्यावर सूत कापून भारतीयांनी सुती कपडे वापरावे, या महात्मा गांधी यांच्या संकल्पनेमागे आत्मनिर्भतेचाच संदेश होता, तो त्या काळातील `स्वदेशी’ मोहिमेचा भाग होता.
1915 मध्ये साबरमती आश्रमाची स्थापना झाल्यानंतर महात्मा गांधी यांनी चरखा वापरण्यास सुरूवात केली. एका विणकाराची पत्नी गंगाबेन व महात्मा गांधी यांची 1917 मध्ये भेट झाली. तिनं चरखा कसा वापरायचा, याचे प्रशिक्षण आश्रमातील महिलांना देण्यास सुरूवात केली. ब्रिटिशांविरूद् चाललेल्या स्वातंत्र्य संग्रामाचा तो एक भाग होता.