Mahatma Gandhi Jayanti : साधी टोपी सुद्धा क्रांती करून गेली.. 'इन्फ्लुएन्सर बाप्पू'

गांधी त्यांच्या काळातले एक सॉलिड इन्फ्लुएन्सर होते एवढं मात्र खरंच आहे.
Mahatma Gandhi Jayanti
Mahatma Gandhi Jayanti ESAKAL
Updated on

गांधी काय होते, कसे होते हे आजच्या दिवशी सगळेच सांगतील. पण गांधी त्यांच्या काळातले एक सॉलिड इन्फ्लुएन्सर  होते एवढं मात्र खरंच आहे.

आता इन्फ्लुएन्सर म्हटल्यावर आपल्याला आठवतात ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर.... त्यांना फुटकळ वगैरे अजिबात म्हणणार नाहीये कारण त्यांचीसुद्धा एक ताकद असतेच. पण गांधीजींचा इन्फ्लुएन्स वेगळाच होता. शिवाय त्यांनी जी साधनं वापरली ती पण निराळीच होती.

 पटकन पाहिल्यावर ‘यात काय एवढं?’ किंवा ‘याच्याने काय होणारे?’ असं काहीतरी वाटेल अशी. तरीही त्या साध्या, शेळपट वाटणाऱ्या गोष्टींनी इतिहास घडवला.

Mahatma Gandhi Jayanti
Gandhi Jayanti 2023 : महात्मा गांधींकडूनही प्रत्येक पैशाचा हिशोब घेणारे जे. सी. कुमारप्पा कोण होते?

पहिलं उदा. टोपीचं. खरंतर आपल्याकडे पूर्वीपासून फेट्याचं कौतुक. फेटा मानाचा. शेतकऱ्याचा असेल तर तो कष्टाचा.त्यात आयुष्यभराचे कष्टही असत आणि काहीवेळा भरभक्कम रोकडसुद्धा असू शके. पण गांधींच्या अनुयायांनी वापरली ती, गांधी टोपी.

गंमत म्हणजे गांधीजींनी स्वत: ती टोपी घातल्याचे फोटो दिसतात का हो?

तर बहुतेक नाहीच. किमान मलातरी दिसलेला नाही. अर्थात नसेलच असं म्हणणार नाही. एखादा दुर्मीळ फोटो असूसुद्धा शकतो.  तर सांगायचा मुद्दा असा की ही गांधी टोपी खुद्द गांधीजींनी न घालताच भलतीच फेमस  झाली. नुसती 'fashion' म्हणून नव्हे तर 'passion' म्हणूनसुद्धा.

Mahatma Gandhi Jayanti
Mahatma Gandhi Jayanti : नक्की कसे आले महात्मा गांधी आपल्या नोटेवर? वाचा इतिहास

आता परत आजच्या काळात येऊ, अण्णांनी केलेलं लोकपाल आंदोलन आठवतं आहे का, आम आदमी पक्षाचा उदय होण्याचा काळ. त्यावेळीसुद्धा ही टोपी त्या लढ्यातलं एक शस्त्र म्हणून वापरली गेली. सोशल मीडियाच्या विश्वात ज्याला टूल वगैरे म्हणतात तेच ते.

आता त्या आंदोलनाचं पुढे काय झालं, कुणाला फायदा मिळाला, कुणाचा विजय झाला वगैरेमध्ये पडू नकोयात. मुद्दा हा की जवळपास ५०-६० वर्षांनंतरही टोपीने तशी जादू केलीच.

गांधीजींचं दुसरं आयुध म्हणजे काठी. झाडाची वाळलेली काठी. गावात वगैरे तुम्ही पाहिलं असेल, गुरं हाकायला, जराशी आधाराला बरी म्हणून काठी असते माणसांच्या हातात.

 अर्थात काठी काही शस्त्र नसतं. शस्त्रासारखं काहीतरी जुजबी आपलं... दुसरा काठीचा उपयोग शोधलात तर धुणं वाळत घालायला आणि चक्क मारायला.  पण गांधीजींनी यातला कोणताच उपयोग केला नाही. त्यांची काठी टोपीएवढी पसरली नाही उर्फ व्हायरल झाली नाही पण या काठीने स्वराज्याच्या लढ्याला एक भक्कम आधार दिला.

सत्याग्रहाबद्दल मी लिहीण्यासारखं काहीच नाही... कारण अनेक दिग्गजांनी त्यावर लिहीलं आहे. माणूस मोठा होता...माणूस होता त्यामुळे चुका, त्रुटी असायच्याच. पण धडे घ्यायचे तर प्रेमाचे घ्यावेत, द्वेषाचे नव्हेत एवढं मला गांधीवादातून कळलं.

अर्थात अजूनही ‘एका गालावर मारलं की दुसरा पुढे करायचा हे पटत नाहीच.’ पण तरी... प्रत्येक ठिकाणी ‘जशास तसे’ नाही केलं तरी चालतं, एवढं समजू लागलं आहे. कारण ते म्हणतात ना, choose your battle इतकंच!!!!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.