महाराष्ट्र काँग्रेसचा लढवय्या नेता- नाना पटोले

जादूची कांडी फिरवली आणि माणूस प्रसिद्ध झाला असं कधीच होत नाही. त्यासाठी त्या माणसाने प्रचंड संघर्ष केलेला असतो, आयुष्य खर्ची घातलेलं असतं, कष्ट उपसलेले असतात, पराभवातून मार्ग काढलेला असतो. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांचाही संघर्ष असाच आहे.
maharashtra best political leader from congress nana patole inspiring story you need to know
maharashtra best political leader from congress nana patole inspiring story you need to knowsakal
Updated on

जादूची कांडी फिरवली आणि माणूस प्रसिद्ध झाला असं कधीच होत नाही. त्यासाठी त्या माणसाने प्रचंड संघर्ष केलेला असतो, आयुष्य खर्ची घातलेलं असतं, कष्ट उपसलेले असतात, पराभवातून मार्ग काढलेला असतो. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांचाही संघर्ष असाच आहे.

वडिलांच्या 'खाकी' आणि खादी'ला असलेल्या विरोधाला न जुमानता त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. त्यांनी राजकारण आणि समाजकार्य या दोन्हींची उत्तम सांगड घालत आपला प्रवास सुरूच ठेवला आहे.

 नाना पटोले खरेतर आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे आणि राजकीय डावपेचांमुळे नेहमीच चर्चेत असतात. पण त्यांनी आपल्या मतदारसंघात सर्वांगीण विकास घडवून आणला आणि त्यामुळेच त्यांची प्रसिद्धी जास्त झाली असे स्थानिक लोकांचे मत आहे.

 नाना पटोले यांनी 'छावा' युवक संघटनेच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारणाला सुरूवात केली. विद्यार्थी असल्यापासूनच त्यांची राजकीय आणि समाजसेवेची घौडदौड सुरू झाली. पुढे ते जिल्हापरिषद सदस्य झाले, दोन वेळा आमदार, खासदार व विधानसभा अध्यक्ष झाले आणि आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

 “करितो जो कष्ट। तोचि एकनिष्ठ।” असे म्हटले जाते. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी “महाराष्ट्र काँग्रेसचा लढवय्या व महाराष्ट्राचा मास लीडर”  म्हणून  नाना पटोले यांचा वारंवार गौरव केला आहे.

 नानाभाऊ जनतेच्या समस्यांबाबत कायमच विद्रोही भूमिकेत दिसून येतात. “जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्याही आव्हानांचा सामना करायला मी तयार आहे,” असे ते म्हणतात. विरोध करताना ते सत्तेत किती ताकदीचा पक्ष किंवा नेता  आहे याचा विचार करत नाहीत. जनतेसाठी ते कोणालाही आव्हान द्यायला तयार असतात.

अशीच एक ऐतिहासिक घटना भारतीय राजकारणात घडल्याचे अनेकांना आठवत असेल. भाजप सत्तेत येण्यापूर्वी नाना पटोले भाजपात कार्यरत होते. भारतीय जनता पक्ष २०१४ मध्ये सत्तेत आला आणि २०१६ साली नवीन जीएसटी धोरण लागू झाले.

त्यावर शेतीच्या कच्च्या मालावरदेखील जीएसटी लागू झाला. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या शेतकऱ्यांना बियाणे, खते व शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू परवडत नव्हत्या. याचा परिणाम म्हणून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढू लागले.

नवीन जीएसटी धोरण लागू झाला तेव्हाही नानाभाऊ त्याच्या विरोधात होते. पण नंतर प्रश्न शेतकऱ्यांच्या जीवाचा होता. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचाही प्रयत्न केला. सरकार त्यावर काहीच करत नव्हते. शिवाय इतर मागासवर्गीयांच्या प्रश्नांवरही सरकार ढिम्म हलत नव्हते.

यावरून नाराज झालेल्या नाना पटोलेंनी लोकसभेत शेतकरी व इतर मागासवर्गीयांच्या प्रश्नांवरून सरकारवर हल्लाबोल केला आणि ८ डिसेंबर २०१७ रोजी त्यांनी याच मुद्द्यावरून लोकसभा सदस्यत्वाचा व भारतीय जनता पक्षातून राजीनामा देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

 हा भारतीय राजकारणातील ऐतिहासिक क्षण ठरला, कारण विरोधी पक्षातून राजीनामा देऊन सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्यात काही नावीन्य नाही. पण जनतेच्या प्रश्नांवरून सत्ताधारी पक्षातील पदाचा आणि लोकसभा सदस्यत्वाचा त्याग करून विरोधी पक्षात प्रवेश करणे हे फक्त नानांनी करून दाखवले. त्यातून त्यांची अन्यायाला प्रखर विरोध करण्याची वृत्ती सहज दिसून येते.

पुढे २०१८ मध्ये नाना पटोले यांची किसान काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २०२१ साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नाना पटोले यांचे काँग्रेस पक्षासाठीतले योगदान आणि त्यांचे कार्य पाहता ते काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते का आहेत हे दिसून येते. 

नानाभाऊंना पक्षांतरानंतर असंख्य टीकाकारांना सामोरं जावं लागलं. पण त्यांच्या निडर व्यक्तिमत्त्वामुळे या टीकेला ते घाबरले नाहीत. ते त्याला धीटपणे सामोरे गेले आणि आपले काम सुरूच ठेवले. "बाहेर बसून चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही, अन्यायाविरूद्ध आवाज उठावायचा असेल, तर आपण स्वतः त्या क्षेत्रात जाऊन ते क्षेत्र सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे," असे नानाभाऊ नेहमी सांगतात.

'निवडणुकांमध्ये पराभवाचे खापर साधारणपणे प्रदेशाध्यक्षावर फोडण्याची परंपरा आहे. त्या प्रमाणे पक्षाच्या विजयाचं श्रेय देखील प्रदेशाध्यक्षाला मिळायला हवं, हे नाना पटोलेंनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील इतर नेते आणि नाना पटोले यांच्या राजकीय कारकिर्दीचा तुलनात्मक अभ्यास केला, तर नाना पटोलेच उजवे ठरतात.

"हजारो वर्षापांसूनची देशाची संस्कृती टिकवण्यासाठी व लोकशाहीच्या सर्वांगीण विकासाकरता काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आतापर्यंत सातत्यने प्रयत्न केले आहेत," असे नाना पटोले म्हणतात. त्याचसोबत ते हेही सांगतात की, "विकास एका दिवसात होत नाही. त्याला चिरंतन प्रयत्नांची व सततच्या पाठपुराव्याची गरज असते आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी माझा शेवटचा श्वासही तयार असेल."

 Facebook link Nana Patole

https://www.facebook.com/nanapatoleinc?mibextid=ZbWKwL

 Instagram link Nana Patole

https://www.instagram.com/nanapatoleinc?igsh=MTJiYm56c21veTV5NA==

 Twitter link Nana Patole

https://x.com/NANA_PATOLE?t=N2H_xQP8h6AMQVFp-bsD3Q&s=09

 YouTube link Nana Patole

https://www.youtube.com/@nanapatoleinc

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.