Marathwada Mukti Sangram Din : ...अन् मराठवाडा भारतात विलीन झाला!

Marathwada Mukti Sangram Din : ...अन् मराठवाडा भारतात विलीन झाला!
Updated on

17 सप्टेंबर 1948 ला हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले, त्यापूर्वी सुमारे पावणे दोनशे वर्ष निजामाचे राज्य होते. या घराण्यात सात राजे झाले, शेवटचा राजा मीर उस्मान अली खां क्रूर आणि हिंदूद्वेष्टा होता. त्याच्या 1911 ते 1948 च्या काळात संस्थानातील जनता होरपळून निघाली.

निजाम हा मूलतः इंग्रजांचा मांडलिक राजा होता 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस एक तृतीयांश भारतावर 550 संस्थानिकांचे राज्य होते इंग्रजांना सर्व संस्थांना ना पूर्ण स्वातंत्र्य देऊन गेले त्यावेळेसची गंभीर परिस्थिती सांगताना महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण हे वसंत पोद्दार लिखित “हैदराबाद स्वातंत्र्यसंग्राम” या पुस्तकाच्या प्रस्तावनेत (सन 1981) लिहितात की, निजामशाही विरुद्ध स्वातंत्र्याचा लढा देणे म्हणजे साधीसुधी गोष्ट नव्हती, हे अगदी अलीकडेच घडलेल्या बांगलादेशाच्या मुक्तिसंग्रामाचा इतिहास डोळ्यासमोर ठेवला तर सुज्ञ वाचकांना समजू शकते.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर आझाद हैदराबाद हे एक स्वतंत्र दख्खनी राष्ट्र आहे आणि शेजारचे राष्ट्र म्हणून भारताशी आमचे सलोख्याचे संबंध राहतील, अशी निजाम मीर उस्मान अली खां यांनी बोलणी सुरू केली.

याच पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात माननीय यशवंतराव चव्हाण पुढे म्हणतात, जातीयवाद, भाषावाद, प्रांतवाद, याद्वारे राष्ट्रीय ऐक्याचा पाया पोखरण्याचे काम काही धर्मवेड्या स्वकीयांतर्फे व काही परदेशी शक्तींमार्फत केले जात आहे. परदेशी शक्तीविरुद्ध अशा बाबतीत लढणे एक वेळ सोपे असते परंतु स्वकीय विरुद्ध लढणे अत्यंत अवघड असल्याचे सांगून त्यांनी पंजाबमधील घटनेची सविस्तर माहिती या प्रसंगी दिली.

Marathwada Mukti Sangram Din : ...अन् मराठवाडा भारतात विलीन झाला!
Sanjay Raut News: "मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला हजर राहणार सांगितले होते पण..."; संजय राऊतांचा खुलासा

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा जवळील गुंजोटी हे गाव त्याकाळी तालुक्याचे ठिकाण होते येथील 23 डिसेंबर 1927 ची घटना पुढील प्रमाणे आहे-

बाहेरून मुरूम, वेळंब, तुगाव वगैरे गावचे दोन-तीनशे अरब पठाण गावातील रस्त्याने युद्धाचे नारे देत आले पण प्रत्येक घराचे दरवाजे बंद होते ज्यांना संपवायचे होते ते आर्य समाजी पुढारी ही भेटले नाहीत, त्यांचा मनस्ताप वाढला, आजचा दिवस वाया गेला म्हणून बेचैन होऊन ते गावात फिरू लागले. एकटा वेद प्रकाश, तलवार ही दुकानात राहिलेली, शत्रूचा जमाव तर प्रचंड, त्याला मृत्यूनेच चोहोबाजूंनी घेरले, पठाण इतेहादुल संघटनेचे लोक यांनी वेद प्रकाशचा निर्घृण खून पाडला. मुंडके धडावेगळे केले, प्रेत गवंडी गल्लीत एका घरापुढील खिळगाच्या बाजूला टाकले. (पहा पेज 94/95 हैदराबाद मुक्तिसंग्राम लेखक वसंत पोतदार)

माझी संघर्ष गाथा पंडित नरेंद्रजी आत्मचरित्र, अनुवादक नारायण कुलकर्णी, या पुस्तकाच्या प्रस्तावनेत राष्ट्रवादी पक्षाचे माजी खासदार आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे संस्थापक कुलगुरू डॉ. जनार्धन वाघमारे त्यावेळेसची परिस्थिती लिहितात, जाळपोळ व लुटालुतीला पारावरच उरला नाही, स्त्रियांची अब्रू लुटली गेली, मंदिरे पाडण्यात आली, प्राणघातक हल्ले तर रोजच होत होते. अत्याचाराला कसली सीमा राहिली नव्हती, सहन करण्याची सीमा संपली, लढण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही.. हैदराबाद संस्थानातील प्रत्येक गाव हे गड बनले.

Marathwada Mukti Sangram Din : ...अन् मराठवाडा भारतात विलीन झाला!
Devendra Fadnavis : ''मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही'' ओबीसींच्या आंदोलनात फडणवीस बोलले

रक्त साक्षी भाई शामलाल, लेखक प्राध्यापक राजेंद्रजी जिग्यासू, या पुस्तकातील पेज 117, 118 वरील हा उतारा, परिस्थितीचे वर्णन करताना असे लिहिले की, सप्टेंबर 1948 पाकिस्तानी कंदील मासिकाचा अंक ध्यान देऊन वाचावा, यात सात चपाती या शीर्षकाच्या लेखात, निजामाच्या सात पिढ्यांच्या राज्य करण्याची देव गाथा देऊन लिहिले की, निजामाच्या आसफ जाही वंशाचे राज्य आज समाप्त झाले नाही तर त्याची पाळेमुळे 1939 मधील आर्य समाजाच्या सत्याग्रहाणे हलवून सोडली होती. हा लेख इतकी वर्षे झाली तरी आमच्या डोळ्यासमोरून जात नाही. श्यामलालजी यांच्या बलिदानानेच तो सत्याग्रह इतका प्रचंड रूप धारण केला होता.

दलित वर्गास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आवाहन, पाकिस्तान आणि हैदराबाद संस्थानातील स्थितीबाबत डॉक्टर आंबेडकर अतिशय जागृत आणि चिंतित होते. याविषयी डॉक्टर धनंजय कीर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चरित्र ग्रंथात पुढील प्रमाणे माहिती देतात, मुसलमानांची संख्या वाढावी म्हणून निजामाच्या हैदराबाद संस्थानांमध्ये देखील दलित समाजातील लोकांना मुसलमान धर्माची दीक्षा दिली जात आहे. ते पुढे असे म्हणतात, पाकिस्तान किंवा निजामाचे हैदराबाद संस्थान यातील मुसलमानावर किंवा मुस्लिम लीगवर विश्वास ठेवल्याने दलित समाजाचा घात होईल.

हैदराबादमधील दलित समाजाला त्यांनी केवळ जीव वाचविण्याच्या हेतूने इस्लाम धर्माच्या दिक्षेला बळी पडू नये. (लढा मुक्ती संग्रामाचा लेखक सागर शिंदे सांस्कृतिक वार्तापत्र 16 ते 31 ऑगस्ट 2023 मधून साभार)

उमरी बँकेवर दरोडा

30 जानेवारी 1948 या दिवशी नांदेड जिल्ह्यातील उमरी रेल्वे स्टेशन या मोठ्या बाजारपेठेत स्टेट बँक ऑफ हैदराबाद, या बँकेत सुमारे 20 लाख रुपये (त्याकाळचे) भर दिवसा लुटून नेले, यात दीडशे लोकांनी सहभाग घेतला, हे सर्व काम अत्यंत गुप्त रीतीने करण्यात आले, या लढ्याचे नेतृत्व अनंत भालेराव, साहेबराव देशमुख बारडकर, आबासाहेब देशमुख लहानकर, बाबुराव कुंटूरकर आदी नेत्यांनी केले. बँक लुटीच्या पैशातून क्रांतीकारकांना शस्त्रे विकत घेऊन पुरविण्यात आली.

नारायणराव पवार या क्रांतिवीराने मीर उस्मान अली खान निजामाच्या कारवर बॉम्ब टाकला, निजामाच्या सुदैवाने तो वाचला. परंतु नारायणराव पवार पकडले गेले, पोलिसांनी त्यांना तुझ्या सोबत्यांची नावे सांग म्हणून बेदम मारहाण केली, छळ सहन केला पण ते झुकले नाहीत. शेवटी त्यांना फाशीची शिक्षा जाहीर झाली, मात्र शिक्षा प्रत्यक्ष अंमलात येण्याआधीच संस्थान भारतात विलीन झाल्याने त्यांची फाशी रद्द झाली. सन २०११ मध्ये नारायणराव पवार यांचे निधन झाले .

- नारायण कुलकर्णी

मो. 88883 31104

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()