Napoleon Bonaparte : जग जिंकणारा नेपोलियन प्रेमाच्या युद्धात मात्र हरला होता!

जगजेत्या नेपोलियनचं प्रेयसीला लिहलेलं प्रेमपत्र, नाजूक प्रेमाची हळवी कथा..
Napoleon Bonaparte love story Biography Facts Death history
Napoleon Bonaparte love story Biography Facts Death historysakal
Summary

जगजेत्या नेपोलियनचं प्रेयसीला लिहलेलं प्रेमपत्र, नाजूक प्रेमाची हळवी कथा..

- चेतन झडपे

Napoleon Bonaparte : द ग्रेट नेपोलियन बोनापार्ट हा फ्रान्सचा एक महान राजा होता. आपल्या आयुष्यातील अनेक लढाया त्याने जिंकल्या होत्या. जगभरातले अनेकानेक प्रदेश त्याने काबीज केले. अनेक भूभाग त्याने आपल्या अंकीत केले. जग जिंकायचा बाणा त्याने अंगी बिनवला.

खऱ्या अर्थाने नेपोलियन हा जगजेत्ता होता. जगाला आपल्या टाचेखाली आणणारा जग जिंकणारा राजा महान राजा. पण हा जग जिंकणारा राजा प्रेमाच्या यु्द्धात मात्र सपशेल हरला होता. जग जिंकणारा राजाला मात्र आपल्या प्रेयसीला जिंकता आलं नव्हतं.

नेपोलियन फ्रान्सच्या सैन्यात कार्यरत असताना आपल्या पराक्रमाची चुणूक दाखवत, यशाची एकेक पायरी सर करत होता. नेपोलियने विविध लढाया, मोहिमा जिंकत आपली कर्तबगारी सिद्ध केली होती. या असामान्य कर्तबगारीसाठी नेपोलियनची नेमणूक पॅरिसच्या लष्करी प्रशासक व फ्रान्सच्या सैन्याअंतर्गत कमांडर म्हणून नेमणूक झाली. यामुळे नेपोलियनवर इटलीच्या मोहिमेचे नेतृत्व बहाल करण्यात आले.

मात्र याच दरम्यान विविध लढाया जिंकणारा राजा नेपोलियन प्रेमासारख्या नाजूक-हळव्या गोष्टीत गुंतला होता. फ्रान्समधील मार्से या प्रांतातील एका श्रीमंत धनिकाची मुलगी डेझीरी क्लेरी हिच्यावर नेपोलियनचे प्रेम जडले होते. तिच्याशी लग्न करावं असं नेपोलियन स्वप्न रंगवत असे.

डेझीरी ही नेपोलियनच्या थोरल्या भावाची मेहुणीच होती. यावेळी फ्रान्सच्या सैन्यविभागाकडून अर्धे वेतन मिळत असत. पण, डेझीरीच्या बापाने या प्रेमाला कडाडून विरोध केला. आपल्या प्रेमाला तिच्या बापाची मान्यता न मिळाल्याने पॅरिसला निघून गेला.

यानंतर नेपोलियनने आपल्यापेक्षा सहा वर्षे जास्त वय असलेल्या जोझेफिनशी लग्न केले. जोझेफिनशी काडीमोड घेतल्यानंतर मेरी ल्युसीशी लग्न केले. या दोन्ही राण्यांसोबत नेपोलियन फार काळ राहू शकला नाही. मात्र नेपोलियनची दोन लग्ने झाली तरी तो कधी डेझीरी विसरू शकला नाही. डेझीरीचं स्वीडनच्या एका राजपुत्राशी लग्न झालं, मात्र डेझीरी जिथे कुठे राहील, तिथे ती आनंदात असावी असे नेपोलियनची भावना होती.

Napoleon Bonaparte love story Biography Facts Death history
Dr Babasaheb Ambedkar : बाबासाहेबांना अखेरच्या काळात व्हायोलिन शिकावसं का वाटलं असेल?

नेपोलियन डेझीरीशी विलग झाल्यानंतर त्याने तिच्या नावे एक पत्र लिहलं. हे पत्र, या पत्रातल्या भावना डेझीरीपर्यंत कधी पोहचल्या की नाही याची कल्पना नाही. पण नेपोलियने डेझीरीला लिहलेलं पत्र प्रसिद्ध आहे. नेपोलियन लिहतो,

प्रिय डेझीरी,

"मी खूप दुःखी अंतःकरणाने अविग्नॉनला आलो आहे. कारण मला इतके दिवस तुझ्यापासून विलग राहावे लागले. मला हा प्रवास खूप कठीण वाटला. माझ्या प्रेयसीला अनेकदा तिच्या प्रियकराची आठवण येईल आणि तिने वचन दिल्याप्रमाणे ती नेहमीच त्याच्यावर प्रेम करत राहील. केवळ या आशेने माझे दु:ख कमी होऊ शकते आणि माझी स्थिती थोडी तरी बरी होऊ शकते.

Napoleon Bonaparte love story Biography Facts Death history
Aryabhata ISRO : भारताच्या पहिल्या उपग्रहाचा खर्च किती होता? नाव कसं ठरलं? वाचा 'आर्यभट्ट'ची चित्तरकथा!

मी पॅरिसला पोहोचण्यापूर्वी तुझे कोणतेही पत्र मला मिळू शकणार नाही. मात्र हीच गोष्ट मला अधिक वेगाने तिथे पोहचण्यास प्रेरणा देईल. तुझी आस माझा शोध घेण्यासाठी तेथे प्रतीक्षा करत असेल. ड्युरन्समधील पुरामुळे मला या ठिकाणी लवकर पोहोचता आले नाही. मी उद्या संध्याकाळपर्यंत लायन्सला पोहोचेन. माझ्या प्रिय. अलविदा, माझी राणी. मला कधीही विसरू नकोस. नेहमी त्याच्यावर प्रेम करत राहा, जो आयुष्यभारासाठी तुझा आहे."

नेपोलियन बोनापार्ट

जगजेत्त्या राजाची ही हळवी कहाणीजगातले एक एक प्रदेश जिंकणारा, वेगवेगळ्या मैदानी-सागरी लढाया जिंकणारा, जग जिंकणारा नेपोलियनला प्रेयसीला जिंकता आलं नव्हतं. त्याने कदाचित प्रेयसीला जिंकलं नसेल. पण त्याने जगाप्रमाणे प्रेम जिंकलं होतं. नक्कीच जिंकलं होतं. कारण हळवा माणूस कदाचित प्रेमात जिंकत नसेल, पण प्रेमाला जिंकलेला असतो. नेहमीच. कायमचं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com