शेतकरी मंडईची उभारणी शक्‍य ?

new farmers vegetable market
new farmers vegetable market

जगावर कोरोना विषाणूचे संकट आल्यानंतर संसर्ग रोखण्यासाठी देशात 16 मार्चपासून लॉकडाऊन सूरू करण्यात आला. अत्यावशक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद झाले. गर्दी टाळण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न करण्यात आले. तरीही लोक भाजीमंडईत गर्दी करू लागले. त्यामुळे मंडई मैदानात भरवण्यात आली. त्याचाही फारसा परिणाम झाला नाही. रस्त्यावर विशिष्ठ अंतरावर चौकोन आखून देऊन भाजी विक्रीचा प्रयत्न झाला. तरही गर्दी हटेना तेंव्हा भाजी मंडई बंद करण्याचा निर्णय प्रशासना घ्यावा लागला. त्यामुळे शेतमाल विक्रीची मोठी पंचायत झाली. गर्दी टाळण्यासाठी मंडई बंद करण्यात आल्या. परिणामी शेतमाल विक्रीची यंत्रणा कोलमडली. त्याच बरोबर भाजीपाला विकून उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. शेतमाल नाशवंत असल्याने त्याची तोडणी व विक्री ठराविक वेळेत करावी लागते. त्यास वेळ लागला तर सगळे गणित बिघडते. असे गणित बिघडू लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल बांधावर टाकून दिला. अनेकांनी शहरात विविध संघटनांच्या माध्यमातून मोफत वाटला. कांहीनी उभ्या पिकावर ट्रॅक्‍टर फिरवला.

अचानक आलेल्या संकटामुळे गोंधळून गेलेल्यांची ही अवस्था झाली. मात्र माणसाची जगण्याची धडपड, चिकाटी कायम असते. अनेकदा संकटातून संधी निर्माण होत असतात. अशीच संधी निर्माण करण्याचे काम छोट्या भाजी विक्रेत्यांनी केले आहे.
त्यांनी भाजी मंडई बंद झाल्याने पर्यायी जागी भाजी विक्रीची धडपड सूरू केली. यातूनच शहरात विविध उपनगरांत विविध ठिकाणी भाजीचे स्टॉल लावले. अनेकांना वाटत होते की, इथे भाजी विक्री होणारच नाही. त्याठिकाणी दोन दिवस चार दिवस उलटल्यानंतर हळूहळू ग्राहक येऊ लागले. आणि कोरोना विरोधात लढतांना व्यवसायात जम बसू लागला आहे. एका दोघांच्या प्रयत्नामुळे प्रभागात भाजी मार्केटची जागा कोठे उपलब्ध होऊ शकते. हेही अनेकांना समजले. आज प्रभागात जागोजागी भाजी विक्री सुरू झाली आहे. शिवाय अनेक जण हातगाडीतून सायकल वरून गल्लोगल्ली फिरून भाजी विक्री करत आहेत. त्यामुळे त्याच्या उदरनिर्वाहाबरोबरच शेतमाल विक्रीचा व लोकांच्या भाजीपाल्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. शिवाय गर्दी होत नसल्याने शासनाचा कोरोना विरोधात लढ्याचा हेतूही साध्य होत आहे.

कांही दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या आत्मा योजनेतून शेतकरी बाजाराच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यत भाजीपाला विक्रीचा प्रयोग झाला. मात्र त्यात सातत्य नसल्याने ग्राहकांच्या गरजांचा पेक्षा उपलब्ध माल विकण्याचा प्रयत्न झाल्याने काही दिवसात हा बाजार बंद पडला. त्यामध्ये शेतकऱ्यांची चिकाटी कमी पडल्याचे दिसून आले. कारण शासनच्या मदतीने सुरू झालेला बाजार यशस्वी चालवण्यासाठी थोड्या कल्पकतेची व चिकाटीची गरज होती. या पार्श्‍वभूमिवर छोट्या भाजी विक्रेत्यांचा प्रयत्न अधिक अशस्वी झाल्याचे दिसून येते. किंबहूना या विक्रेत्यांच्या प्रयत्नातून छोट्या शेतकऱ्यांनी प्रेरणा घेऊन आपल्या परिसरात, असे नवीन भाजी मार्केट निर्माण करण्याची गरज आहे. असे प्रयत्न झाल्यास शेतकरी मंडईची उभारणी शक्‍य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.