वेडात मराठे वीर दौडले सात ; वाचा अंगावर शहारे आणणारा वीरांचा इतिहास 

prataprao gurjar anurag was the hero of the decisive victory
prataprao gurjar anurag was the hero of the decisive victory

महाराष्ट्राला निसर्ग सौंदर्याची मौल्यवान देणगी लाभली आहे. डोंगर माथ्यांनी नटलेल्या भूमीत अनेक संत, महात्मे, शूर-वीर होवून गेले. महाराष्ट्राला ख-या अर्थाने महान राष्ट्र बनविणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने व शेकडो मावळयांच्या बलिदानाने मराठा स्वराज्य उभारले गेले. महाराजांशी निष्ठा व स्वराज्य रक्षणाची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसात भिनली होती. शेकडो वीरांच्या शौर्याची साक्ष मातीचा कण आणि कण देत आहे. स्वराज्य रक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या वीरांच्या आठवणींशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नाही. 

निसर्ग सौंदर्याने मुक्‍त हस्ताने उधळण केलेल्या व इतिहासाची परंपरा लाभलेल्या कोल्हापूर जिल्हयातील अनेक ऐतिहासिक स्थळे आपला वेगळेपणचा ठसा उमठविल्या शिवाय राहत नाही. प्रत्येक स्थळावर निसर्गाची खूप मोठी कृपा लाभली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा अविभाज्य भाग म्हणजे गडहिंग्लज उपविभागातील नेसरी हे गाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील महाराष्ट्राचे शेवटचे टोक. नेसरी खिंडीत छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदारांनी आपल्या आत्म बलिदानाने इतिहास अजरामर केला आहे. त्यांच्या शौर्याची आठवण करून देणारी नेसरी पावनखिंड. सात वीरांचे स्मरण व्हावे म्हणून तत्कालीन आमदार तथा राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नातून शासनाने भव्य-दिव्य स्मारक उभारले आहे. 

प्रतापरावांच्या पराक्रमाची गाथा.......
प्रतापरावाचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्‍यातील ताम्हाणे तर्फ गोरेगाव होते. प्रतापरावांचे मूळ नाव कडतोजी असे होते. शिवरायांच्या सैन्यातील एक शिलेदार म्हणून काम करतच पराक्रमाच्या व जिद्‌दीच्या जोरावर स्वराज्याचे सरनोबत झाले. कडतोजींचा पराक्रम पाहून त्यांना " प्रतापराव " किताब देवून गौरवण्यात आले होते. रणझुंजार प्रतापरावाने वादळ वेगाने झंझावत कार्य करून गनिमांना जेरीस आणले होते.

नेसरीचा रणसंग्राम....
उमराणीच्या लढाईत प्रतापरावांच्याकडून अभय मिळालेला बेहेलोल खान पुन्हा शिवरायांच्या भूमीत धूमाकूळ घालून उपद्रव करू लागला होता. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जवळ येत असतानाच "बेहेलोल खान पुन्हा-पुन्हा स्वराज्यावर चालून येत आहे. वेळीच त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हास तोंड दाखवू नका'ं अशा आशयाचा खलिता महाराजांनी प्रतापरावांना पाठविला. खलिता हाती येताच प्रतापरावांचे रक्‍त सळसळू लागले. आपल्या प्राणापेक्षा प्रिय असणा-या महाराजांचा हुकूम पाळायचा या उेद्‌शाने मनात अनेक उलट-सुलट विचार करत प्रतापराव गुर्जर फक्‍त सहा शिलेदारांसह नेसरी खिंडीत शेकडो सैन्यासह तळ ठोकून बसलेल्या बेहेलोल खानाच्या सैन्यांवर तुटून पडले. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. मंगळवार ता. 24 फेब्रुवारी 1674 ला सात मर्दांनी स्वराज्य रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहूती देवून नेसरी खिंड पावन केली. प्रतापरावांच्या पराक्रमावर कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेले "वेडात मराठे वीर दौडले सात" हे गीत आज देखील कानी पडताच अंगातील रक्‍त संचारते. आणि प्रतापरावांचा इतिहास जीवंत होतो. त्यांच्या कार्याचे सतत स्मरण व्हावे यासाठी उभारलेल्या स्मारकाला शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला. देशाच्या कानाकोप-यातून अनेक इतिहास प्रेमी, पर्यटक व शालेय विद्यार्थ्यी या ऐतिहासिक स्थळाला भेट देत आहेत. दरवर्षी स्मारकस्थळी महाशिवरात्री दिवशी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

समाधी स्थळी काय पहाल.....
- समाधी स्थळाच्या मुख्य जागेवर भव्य व आकर्षक समाधी मंदिर.
- जवळच पूर्वाभिमूख शिवमंदिर, समोर क्रांती स्तंभ.
- बाजूला छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा.
- जवळच यात्री निवास. 
- समोर आकर्षक तटबंदी व पूर्वाभिमुख प्रवेशद्वार 
- पुरातण इतिहासाची साक्ष देणारा ओढा आहे.
- डोंगर-कपारीत उटलेले घोडयांच्या टापांचे ठसे. 
- नेसरी बसस्थानक परिसरात लक्षवेधी प्रतापरावांचा अश्‍वारूढ पुतळा.

समाधी स्थळी कसे जाल...
1. कोल्हापूर- गडहिंग्लज- नेसरी-प्रतापराव गुजर स्मारक 
2. सावंतवाडी- आजरा- नेसरी -प्रतापराव गुजर स्मारक 
3. गोवा -पणजी-दोडामार्ग-तिलारी नगर - चंदगड- नेसरी -प्रतापराव गुजर स्मारक 
4. बेळगाव- कोवाड - नेसरी -प्रतापराव गुजर स्मारक 
5. हुक्‍केरी - संकेश्‍वर - यमकनमर्डी- दडडी- नेसरी -प्रतापराव गुजर स्मारक 


त्या सात योद्धांची नावे….

१) विसाजी बल्लाळ.
२) दीपोजी राउतराव.
३) विट्ठल पिलाजी अत्रे.
४) कृष्णाजी भास्कर.
५) सिद्धि हिलाल.
६) विठोजी शिंदे
७) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव गुजर
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.