बहुआयामी व्यक्तिमत्त्व आचार्य अत्रे

आचार्य अत्रे हे कोण होते हा विचार करण्यापेक्षा ते काय नव्हते हा विचार करण जास्त कठिण आहे.
Acharya Atre
Acharya Atreesakal
Updated on

आचार्य अत्रे हे कोण होते हा विचार करण्यापेक्षा ते काय नव्हते हा विचार करण जास्त कठिण आहे.

आज आचार्य अत्रे यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने हा खास लेख..

आचार्य अत्रे यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 रोजी पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील कोडित खुर्द या गावी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील पेशाने लिपिक होते आणि काही काळासाठी सासवड नगरपालिकेचे सचिव होते आणि त्यांचे काका एमईएस वाघिरे हायस्कूल सासवड येथे शिक्षक होते. सासवडच्या एमईएस वाघिरे हायस्कूलमधून त्यांनी प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

1919 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी मॅट्रिक पूर्ण केले. पुणे विद्यापीठातून त्यांनी कला शाखेची पदवी पूर्ण केली. पदवीनंतर अत्रे यांनी शाळेत शिक्षक म्हणून काम केले. अत्रे यांनी 1928 मध्ये लंडन विद्यापीठातून टी.डी. (शिक्षक पदविका) केले. भारतात परत येण्यापूर्वी त्यांनी सिरिल बर्ट यांच्या हाताखाली प्रायोगिक मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि हॅरो येथे अध्यापन केले. अत्रे हे उत्तम क्रिकेटपटू सुद्धा होते.

आपल्या वाचनाविषयी अत्रे सांगतात...

माझ्या सुदैवाने मला त्या वेळी वाङ्‌‌मयाची आवड असणारे महादेव रामचंद्र सुभेदार नावाचे एक शिक्षक लाभले. ते हरीभाऊ आपटे यांच्या कादंबऱ्या मराठीच्या तासाला हप्त्याहप्त्याने सांगत. त्यामुळे माझ्या कल्पनाशक्तीची जोपासना होण्यास अतोनात मदत झाली. जे मिळेल ते वाचून, पाठांतर करून ठेवण्याची चांगली सवय जोपासली गेली. त्यामुळे आपल्या विचारांची शाळा सकस झाली. त्याचा फायदा काव्य लेखनासाठी झाला. काव्य समजण्यासाठी उपयोगी पडला. अत्रे यांची कवितेवर प्रचंड निष्ठा होती. आपल्या कविता छापून याव्यात; म्हणून ते सतत प्रयत्नशील राहिले होते. आपल्या कविता छापून येत नसल्या तरीही सर्व नियतकालिके, मासिके यांच्याकडे ते आपले लेखन पाठवत राहिले. अखेरीस 'श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा वध' या मथळ्याची कविता छापून आली आणि काव्य प्रकाशनाच्या मोहिमेस आरंभ झाला.

Acharya Atre
का..का..का..? सुशांत असं का केलंस?..अमिताभ बच्चन यांनी लिहिला ब्लाॅग...

अत्रे 'विडंबनकार कसे झालेत?'

याविषयी ते सांगतात 'मला 'बालकवी' व्हायचे होते. मला 'गोविंदाग्रज' व्हायचे होते. त्यासाठी माझी खटपट सुरू होती; पण हे सगळे राहिले बाजूला आणि 'देवाच्या आळंदीला पोहोचायच्या ऐवजी मी 'चोरा'च्या आळंदीला जाऊन पोहोचलो.' अत्रे म्हटले, की प्रथम आपल्या डोळ्यांसमोर येतात ती 'झेंडूची फुले'! महाराष्ट्रात त्याला प्रचंड लोकप्रियता लाभली. मराठी वाङ्‌‌मयाच्या क्षेत्रात त्यांनी या काव्य लेखनाला स्वतंत्र स्थान मिळवून दिले.

मानवी जीवनाविषयी अत्रे सांगतात की

जीवनातील सर्व दुःखे समूळ नाहीशी करणे हे काही माणसाच्या हातात नाही. मात्र, या दुःखांचा यातनामय उपसर्ग स्वतःला बिलकूल लावून न घेता ती हसण्यावारी घेणे किंवा ती हसून घालवणे आणि स्वतःच्या जीवनातील उत्साह आशा अन् आनंद शाबूत राखणे, एवढी एकच गोष्ट माणसाच्या हाती आहे.' विविध क्षेत्रांतील मुशाफिरी करतानाच अत्रेंनी शिक्षकी पेशा स्वीकारून ज्ञानदानही केले.

पत्रकार म्हणुन अत्रेच्या आयुष्यातील एक किस्सा

अत्रेंनी जेवनाच ताट बाजुला ठेवून फोनवरून सांगितला होता अग्रलेख... 24 जानेवारी 1965 ची गोष्ट. गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे, असा गोवा विधानसभेने एकमताने ठरवा मंजूर केला. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या सत्काराचा कार्यक्रम पणजीच्या आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला. हा सत्कार आचार्य अत्रेंच्या हस्ते ठेवण्यात आला. सभेनंतर आचार्य अत्रे मांडवीतल्या हॉटेलता मुक्कामी आले. जेवायला बसणार इतक्यात इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चील यांच्या निधनाची बातमी आली. त्यांनी भरल्या ताटाला नमस्कार केला आणि जेवण बाजूला ठेवलं. अत्रेंच्या सोबत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे होते. अत्रेंनी भावेंना 'मराठा'च्या कार्यालयात फोन करायला सांगितला आणि फोनवरून संपूर्ण अग्रलेख सांगितला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 जानेवारील 'मराठा'मध्ये आलेला 'सर विन्स्टन चर्चील' हाच तो अग्रलेख, जो पणजीहून फोनवरून सांगितला गेला होता.

असे होते अत्रे. अत्र्यांची शेवटची निवडणूक ठरली ती 1967 सालची. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावेंनी हा किस्सा वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात सांगितला होता. बहुआयामी व्यक्ती महत्त्व असलेले आचार्य अत्रे यांची 13 जून 1969 रोजी प्राण ज्योत मावळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.