Blog: बलात्कारी 'मोहन' निपजतात तरी कुठून?

Blog: बलात्कारी 'मोहन' निपजतात तरी कुठून?
Updated on

मागच्या पंधरा दिवसात हादरवून टाकणाऱ्या तीन घटना घडल्या. मुंबईत ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार आणि गुप्तांगात सळई घालून अत्याचार. नंतर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुणे स्टेशन येथून फूस लावून १४ वर्षीय मुलीवर २ दिवस आळीपाळीने सामूहिक बलात्कार... पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वर आई वडिलांसोबत झोपलेल्या ६ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून नंतर तिच्यावर बलात्कार... पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरातल्या ह्या तिन्ही घटना... तिन्ही घटनांमध्ये आरोपी पकडले गेले आहेत.

Blog: बलात्कारी 'मोहन' निपजतात तरी कुठून?
पुण्यातून परतल्यानंतर १२ पोलिसांना कोरोना, नागपूर पोलिसांत खळबळ

बातम्या येतायत. सामुहिक संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. पण फक्त अशी प्रकरणे समोर आल्यावरच चर्चा करायची का हा महत्त्वाचा प्रश्न दुर्लक्षिला जात आहे.

कायदा कडक व्हावा, सगळीकडे सीसीटीव्ही हवेत, पोलिसांना तातडीने फोन जावा अशा मागण्या ह्या आधीच्या प्रकरणांच्या वेळी समोर आल्या होत्या. वरील तिन्ही प्रकरणांत ह्या गोष्टी होत्या. म्हणजे पुणे स्टेशन वर जागोजागी सीसीटीव्ही आहेत. (त्यावरूनच नंतर आरोपीना पकडलं गेलं) एका प्रकरणात तर पुणे स्टेशनचे दोन कर्मचारी ही आरोपी आहेत. त्यांना तरी निदान सीसीटीव्ही बद्दल माहीत असेलच असं धरून चालू. एवढं असूनही असे क्रूरकर्म करण्याची हिम्मत होत असेल तर मुद्दा कायदा सुव्यवस्था, सुरक्षेच्या जास्तीत जास्त सोयी, तत्पर मदत ह्यापलिकडे गेला आहे असे समजावे.

ह्या गोष्टी खचितच खूप महत्त्वाच्या आहेत. मुली आणि महिलांना घरात आणि घराबाहेर सुरक्षित वातावरण मिळावे ही सरकार यंत्रणेची जबाबदारी आहे.

पण मानसिकता बदलाचं काय? कितीही कडक कायदे केले आणि कितीही चोख सुरक्षा ठेवली तरी पितृसत्ताक व्यवस्थेतून येणारी बाईला भोगण्याची , शोषण करण्याची मानसिकता बदलावी म्हणून व्हायला पाहिजे तेवढे प्रयत्न होत नाहीयेत असच म्हणावं लागेल. आपल्याला शिक्षा होऊ शकते, आपल्याला कुणीतरी बघू शकत हे माहीत असूनही सार्वजनिक जागांवर महिलांवर बलात्कार होत असतील तर शोषक पुरुषी मानसिकता काय सुव्यवस्थेला जुमानत नाहीये असा याचा अर्थ होतो. घरात आणि घराबाहेर रोज हजारो स्त्रिया शारीरिक , लैंगिक आणि मानसिक अत्याचाराच्या बळी ठरतात. त्यातल्या सर्वांची गाऱ्हाणी काही व्यवस्थेपर्यंत पोहचत नाहीत. (पोहचू नयेत अशी सामाजिक रचना आहे)

मग अशी थोडीफार प्रकरणे समोर दिसतात. सोशल मीडियामुळे सोशल outrage तयार व्हायला मदत होते. मग सगळे हे कसं चुकीचं वगैरे म्हणतात. फाशीच्या शिक्षेची मागणी करतात. काही दिवसांनी outrage ची तीव्रता कमी व्हायला लागते. ज्यांनी बलात्कार्याला फाशी व्हावी अशा मागणीचे पोस्टर what'sapp status ला ठेवणारे नंतर फेसबुक ला कमेंट बॉक्स मध्ये एकमेकाची आई बहीण काढतात, एखाद्या अभिनेत्रीच्या फोटोखाली तिच्या कपड्यांवरून तिला गलिच्छ भाषेत ट्रोल करतात, किंवा गल्लीच्या कोपऱ्यावर बसून येणाऱ्या मुलीच्या छताडाकडे वासनेने बघतात, किंवा घरात बायकोला मारतात किंवा बस मध्ये संधी भेटली म्हणून लगेच बाईच्या अंगाशी खेटतात, बाईच्या शिरिराला objectify करणारी गाणे बनवतात ऐकतात.

Blog: बलात्कारी 'मोहन' निपजतात तरी कुठून?
US Open जिंकणाऱ्या १८ वर्षांच्या एमाबद्दल काही खास गोष्टी...

पुरुषसत्ताक व्यवस्थेचे बळी आणि वाहक आपण सगळे बलात्कारी मानसिकता रुजविण्यात, वाढविण्यात आपल्या नकळत हातभार लावत असतो. बलात्कारी असाच तयार होत नसतो. बलात्कार करणारी व्यक्ती काही बाहेरून आलेली व्यक्ती नाहीये. ती ह्या समाजाचा घटक आहे. आणि ते बलात्कार करत असतील, शोषण करत असतील तर समाज म्हणून आपण सर्वजण हरतोय.

धार्मिक सामाजिक लैंगिक उतरंडीचा आपला ईतिहास अन् वर्तमान ही आहे. भारतीय संविधानाची स्वातंत्र्य समतेची मूल्ये समजून घेण्यास रुजविण्यास आपण कमी पडतोय, हे आधी मान्य करावे लागेल.

समाज म्हणून जेव्हा majority समाजाला ' तेरा पिछा करू तो टोकनेका नही' यासारखी गाणी खटकतील तेव्हा कुठे आपली समाजातील बलात्कारी मानसिकतेशी लढायची सुरुवात होईल. नाहीतर आहेच तोपर्यंत फक्त बलात्कार झाला की म्हणून २-४ दिवस हळहळण आणि सोशल outrage चा भाग होणं... आपल्या तिन्ही मैत्रीणीना न्याय मिळावा यासाठी लढताना , इथल्या पुरुषी मानसिकतेशी अजून ताकदीने लढूयात...

- श्वेता सीमा विनोद

(लेखिका 'आपल्याला काय त्याचं?' या कादंबरीच्या लेखिका आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()