- राजाराम सूर्यवंशी
१९२४ मध्ये साने गुरुजी एम.ए. झाल्यानंतर वयाच्या पंचवीसाव्या वर्षी 'खानदेश एज्युकेशन सोसायटी'च्या अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले .अगदी सुरवाती सूरवातीला बाळवट दिसणारे, किंचित बावरलेले,
गुपचुप वर्गात प्रवेश करणारे, खाली मान घालून चालणारे आणि कोणाशीहि न बोलणारे हे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आणि इतर शिक्षकांच्या थट्टेचा आणि उपहासाचा विषय न झाला तरच नवल होते. पण ,मात्र साने गुरुजींनी आपल्या गोड स्वभावाच्या आणि वात्सल्यपूर्ण प्रेमाचा वर्षाव विद्यार्थ्यांवर करण्यास सूरुवात करताच सारे विद्यार्थी साने गुरुजींच्या ज्ञानाने, गोड वक्तृत्वाने आणि प्रेमाने भारावून गेलेत.
आपल्या हळव्या ,कोमल आणि भावनाप्रधान स्वभावाने केवळ त्या शाळेतीलच नव्हे तर तर सर्व खानदेशाची मने त्यांनी जिंकली होती, आणि एका वर्षाच्या आत 'साने गुरुजी ' हे नाव जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या तोंडी खेळू लागले होते. खानदेश एज्युकेशन सोसायटीला ते भुषण वाटू लागले होते.
साने गुरुजी त्याकाळात विद्यार्थी छात्रालयात रहात असत.वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून मुलांना जेवू घालत असत. विद्यार्थी आजारी पडले तर औषदपाणी व सेवा स्वतः करीत असत.धुतल्या तांदळ्यासारखे स्वच्छ असे त्यांचे चारित्र्य बघून विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्या बद्दल बेसूमारे आपुलकी वाटत असे.
विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव प्राप्त करुन देण्यासाठी साने गुरुजींनी तेथेच 'विद्यार्थी' नावाचे हस्तलिखित काढले होते .पुढे याच हस्तलिखिताचे विद्यार्थी मासिकात रुपांतर केले होते. तो काळ म्हणजे गांधीपर्व .महात्मा गांधींनी दांडी यात्रा सुरु केली होती.
साने गुरुजी सारखा कोमल ह्रदयी परंतु दृढनिश्चयी भारतीयाने अंमळनेरच्या प्रताप हायस्कूलची शिक्षकाची नोकरी सोडून स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली होती.आपल्या अमोघ वक्तृत्वाने खानदेशात गुरुजींनी नवचैतन्य निर्माण केले होते.
परिणामी ब्रिटिशांची वक्रदृष्टी त्यांच्यावर पडली व ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्यांना एरंडोल येथून अटक करुन प्रथम धुळे जेलमध्ये व नंतर त्रिचनापल्लीच्या तुरुंगात पाठवले. गांधी-आर्यवीन करारानंतर त्यांची सुटका झाली.
परंतु त्यांनी खानदेश हेच आपले कार्यक्षेत्र बनवले.आणि अंमळनेर-धुळे येथील मील कामगार व शेतकऱ्यांची संघटना बांधण्यास सुरुवात केली. पुढे सानेगुरुजींना धुळे येथेच विनोबा भावे यांचा सहवास लाभला .ते विनोबांची प्रवचने सुंदर अक्षरात लिहून लागले.
ब्रिटीशांचा ससेमीरा कायम त्यांच्या पाठीमागे असे.अशावेळी ते धुळ्यातच अज्ञातवासात विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी बनून राहिले .' भारतीय संस्कृती ' हा ग्रंथ त्यांनी धुळ्याच्या अज्ञातवासाच्या काळात लिहिला आहे .
१९३७ चा कालखंड आला.या काळात साने गुरुजींनी 'राष्ट्र सेवा दल' ही संघटना जाॕइन केली.व त्याच बरोबर धुळे-अंमळनेरच्या गिरणी कामगारांमध्ये त्यांनी अभुतपूर्व लढाऊबाणा निर्माण केला.परिणामी त्यांचे हितशत्रु त्यांना कम्युनिस्ट म्हणून हिणवू लागले .
दरम्यान अंमळनेरची प्रताप मिल बंद पडली व कामगारांवर उपासमारीची पाळी आली. तेव्हा तापी नदीत जलसमाधी घेण्याची घोषणा गुरुजींनी केली . प्रशासनावर दबाव आणला आणि कामगारांना न्याय मिळवून दिला.
पुढे १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरु झाले . त्यानंतर बाबासाहेब व गांधींमध्ये पुणे करार झाला. त्यावेळी गांधींनी ' पुढील बारा वर्षात अस्पृश्यता नष्ट करीन ' अशी प्रतिज्ञा केली होती .१९४५पर्यंत साने गुरुजींनी गांधींच्या प्रतिज्ञापूर्तीची वाट पाहिली व गांधींची ही घोषणा हवेतच विरली असे दिसताच सेनापती बापटांना सोबत घेऊन महाराष्ट्रातील सर्व मंदिरे अस्पृश्यांना खुली व्हावीत यासाठी आपले कार्यक्षेत्र असलेल्या खानदेशला अलवीदा करुन महाराष्ट्रभर दौरा सूरु केले.
मुंबईत वास्तव्य बसवले. व गांधी हत्येनंतर राष्ट्रसेवा दलाच्या विद्यार्यांच्या साहाय्याने १५आॕगास्ट १९४८रोजी साधना मुद्रणालयाची स्थापना करुन 'साधना' साप्ताहिक सुरु केले . साने गुरुजींच्या हातून घडलेली ही एक ऐतिहासिक घटना होती .
साने गुरुजींच्या पवित्र हाताने लावलेले हे अक्षर रोपटे आज ७५ वर्षांचे झाले आहे.मुद्रण व छापील मासिकांच्या प्रांतातील हा ही एक विक्रम आहे.
त्यानंतर साने गुरुजींचा खानदेशाशी असलेला प्रत्यक्ष संबंध येथे तुटला व साने गुरुजी अखिल महाराष्ट्राचे आवडते नेते बनले .
अशाप्रकारे "शाळा शिक्षक ते राष्ट्रीय शिक्षक " असा साने गुरुजींच्या जीवनाचा जो प्रवास झाला , त्याची सुरवात खानदेशापासून झाली होती , म्हणून साने गुरुजींच्या आयुष्यात खानदेशाला विशेष महत्व होते .
खरा तो एकची धर्म ! जगाला प्रेम अर्पावे !
हे प्रेम साने गुरुजींवर खानदेशाने मुक्तहस्ताने उधळले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.