Teddy Day : राधा आणि साहिलच नवीन नवीन लग्न झालेलं; त्यांचं अरेंज मॅरेज होतं... पहिल्या रात्री साहिल खोलीत आला, राधा त्याच्या खोलीच्या बाल्कनीला खेटून उभी होती. अंगावर येणाऱ्या प्रत्येक वाऱ्याला स्वतःवर झेलत होती. साहिलने खोलीत बघितलं राधा त्याला दिसली नाही त्याचं लक्ष बाल्कनीत गेलं; राधा तिथे उभी होती. साहिल तिच्याकडे गेला आणि म्हणाला...
“ओ डॉक्टरीण बाई.. नाही म्हणजे स्वतः डॉक्टर आहात म्हटल्यावर आजारी पडण्याची मुभा असते असं नाही...”
“म्हणजे?” राधा गोंधळून म्हणाली
“म्हणजे.. अगं गार वारा सुटला आहे त्यात तू अशी स्लीव्हलेस ड्रेसमध्ये.. बाई अहो थंडी नाही का वाजणार?”
“असुदे ना जरा वेळ..."
"काय कौतुक आहे?
" अरे किती छान आहे हे? एकदम शांत.. आमच्या घरी मी अभ्यासाला बसले ना की बरोबर १२.३० वाजता सोसायटीच कुत्रं ओरडतं.. कारण समोरचे पाटील घरी येत असतात, पलीकडच्या सोसायटीमधला वॉचमन २ वाजता काठी ठोकत आणि शिट्टी वाजवत असतो; सकाळी ३ वाजता सोसायटीच्या गाड्या धुण्यासाठी माणूस खाली उतरतो आणि चार वाजेपासून पेपर वाल्यांची आणि दूध वाल्यांची गर्दी सुरू होते आणि ना घराजवळून रोड जवळ आहे ना त्यामुळे सतत येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे आवाज येत असतात. त्यामानाने हे म्हणजे..”
"अगं हो.. किती ते निरीक्षण..."
"खरं सांगू का मला ही अशीच शांतता खूप आवडते..."
"खरतर मलाही... म्हणून तर इकडे घर बघितलं... लोक म्हणतात जरा दूर आहे पण ठीके ना.."
"तुला माहिती आहे.. आई बाबांनाही खूप आवडेल इथे.. बाबांच्या ऑफिसमुळे, माझ्या शिक्षणामुळे आम्हीही गावात राहिलो..."
“असं? मग घेऊन येऊया त्यांना इकडे..”
“होका?.. आणि घरचे?”
“हे बघ माझ्या आई-बाबांना तरी काहीच प्रोब्लेम होणार नाही.. बाबा रिटायर झाले की घेऊन येऊ आपण त्यांना इकडे.."
"अरे पण असे कसे सगळे एकत्र राहणार ना?"
"का नाही? हे बघ 4 BHK च घर आहे, एक माझ्या आई बाबांची, एक तुझ्या आई बाबांची आणि एक आपली...”
“बरं..."
"बरं चला आता झोपायला..."
"हम्म.."
दोघे आत जातात, साहिल पाणी घेयला बाहेर जातो, राधा बेडवर जाऊन बसते... साहिल सोबत एक मोठा बॉक्स घेऊन येतो.
"मॅडम.. हे घ्या..."
"माझ्यासाठी?"
"उघडं लवकर"
राधा तो बॉक्स उघडते, त्यात एक सुंदर आणि मोठा टेडी असतो... राधा खूप खुश होते...
"Wow.. साहिल अरे माझ्याकडे सेम टेडी आहे असाच.. aww.. thank you so much.."
"Your welcome ma'am"
"अरे पण मी आता मांडव परतवणीला गेले तेव्हा आणला असता घरून.."
"हो पण त्याला अजून १० दिवस आहेत.. आधीच तुझी गेले ५ दिवस झोप होत नाहीये.. तुला या टेडीसोबत झोपायची सवय आहे ना?"
"तुला कसं माहिती?"
"काल तू मैत्रिणीशी बोलतांना ऐकलं मी..."
"नववीत होते तेव्हा पहिल्यांदा periods आलेले... सगळे तेव्हा गिफ्ट देतात ना त्यात मामाने गिफ्ट केलेलं... तेव्हा पासून याच्या सोबतच झोपते"
"मग वेडाबाई सांगायचं की..."
"ठीके रे..."
"Anyways, चल already १.३० वाजता आहेत.. झोपुयात?.."
"लगेच?"
"उद्या सकाळी ९ ची फ्लाईट आहे म्हटलं... फिरायला जायचं आहे ना?"
राधा जरा लाजत हसते आणि टेडी घेते, आपल्याजवळ ठेवते आणि साहिलला मिठी मारून झोपते...
साहिल पटकन बोलतो... "अरे वाह... दोन दोन टेडी..."
राधा शांतपणे उत्तर देते... "हक्काचे"
"बापरे! नी हा हक्क कोणी दिला?"
"हक्काच्या माणसाकडे हक्क मागावा लागत नाही..."
साहिल हसतो आणि "Good Night " म्हणतो..
~ लिना जोशी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.