शाहू महाराजांच्या सर्वांगीण कार्याची दखल अनेकांनी आपल्या लेखणीतून घेतली आहे. अनेक अभ्यासक,विचारवंत,लेखक, इतिहासतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ यांनी महाराजांचा इतिहास आपापल्या परीने अभ्यासांती उजेडात आणला.मात्र अक्षरओळख नसलेल्या खेड्यापाड्यातील लोकांनी मौखिक परंपरेतून शाहू महाराजांचा इतिहास जिवंत ठेवला आहे.शेतवडीत काम करणार्या कष्टकरी महिलाही आपल्या कृषिगीतातून महाराजांचे कार्यस्मरण करतात. विशेषतः महाराजांनी केलेल्या कार्याची आठवण आपल्या पारंपरिक कलाप्रकारातून या परिसरातील कित्येक गावांनी जपली आहे.
राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली या गावात दरवर्षी भैरवनाथाची मोठी यात्रा भरते.गाव वसल्यापासून दरवर्षी ही यात्रा भरते.शाहू महाराजांनी राधानगरी (पूर्वीचे वळीवडे) गाव स्थापन केल्यावर या बाजारपेठेला लागून जी छोटी मोठी गावे वसवली.त्यामध्ये हे गावही वसवले असल्याच्या काही खाणाखूणा सापडतात.या गावातील लोकांसाठी महाराजांनी विशेष सहकार्य केल्याचे दिसून येते.यात्रेदिवशी देवमंडपात गावातील काही निवडक गावकरी आणि खेळेमंडळी (अलुतेदार आणि बलुतेदार) एकत्र जमतात.देवाचा सबीना निघतो.गुलालाची उधळण होते.खेळेमंडळी हातात घुमकं हे वाद्य घेऊन लोकगीतांचे व भक्तीगीतांचे सादरीकरण करतात. यामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या आठवणी सांगणारी काही कवने आढळून येतात. २० ते २५ लोक समूहाने ही गीते सादर करतात.अत्यंत जल्लोषात टिपेचा सूर धरून सगळे गातात. लक्ष्मी धरण, साठमारी, हत्तीमहाल, सरकार, धाकटे महाराज यासारख्या अनेक संदर्भांचा उल्लेख या लोकगीतात आहे.
ही कवने कुणी रचली ? यांचा कर्ता कोण याबद्दल या लोकांना फारशी माहिती नाही. पण खूप पूर्वीपासून हे परंपरेने चालत आल्याचे ते सांगतात. आजूबाजूच्या काही गावातही अशा स्वरुपाची गीते गायली जातात. देवाच्या दारात शाहू महाराजांची कवने सादर होणे ही या परिसराची मोठी वैचारिक परंपरा ध्यानात घ्यावी लागेल.शाहू महाराजांनी या परिसरासाठी दिलेल्या योगदाना विषयीची ती कृतज्ञताच म्हणावी लागेल. अशा अनेक आठवणीतून खेड्यापाड्यात शाहू महाराजांचा विचार जपला जात आहे. त्यांच्या कार्याचे पुन:पुन्हा स्मरण केले जात आहे.पण या गावगाडयातील लोक म्हणजे अडाणी, निरक्षर म्हणून आपण इतिहासाचा अभ्यास करताना यांना दुर्लक्षित केले.पण या लोकांनी जपलेला इतिहास काळजीपूर्वक अभ्यासला तर समाजसुधारकांचे असंख्य दुर्लक्षित पैलू हाती येतील.या यात्रेत गावकरी मंडळी जे गीत गातात ते संक्षिप्त स्वरुपात असे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.