Chocolate Day: रोज रोजच्या कॉफीची सर का एकावेळच्या चॉकलेटला येते?

जे काही झालं ते विसरून नव्या दिवसात आपण दोघं सोबत आहोत या समाधानात ते दिवस सुरू करायचे, ही एकमेव गोष्ट जी आजवर कधीच चुकली नाही...
Chocolate Day Special Story
Chocolate Day Special Storyesakal
Updated on

Chocolate Day Special Story:

कितीही प्रेम प्रेम म्हटलं तरी दाखवल्यानेच का कळते

रोज रोजच्या कॉफीची सर का एकावेळीच्या चॉकलेटला येते?

Chocolate Day Special Story
Chocolate Day : चॉकलेट डे आणखी स्पेशल बनवा; स्वीट पार्टनरला पाठवा स्वीट संदेश

शनिवारची सकाळ होती जेव्हा पूर्ण शहर weekend मुळे जरा संथ सुरू होणार होतं, केळकर काका काकू आपल्या वेळेनुसारच उठून दिनचर्या करत होते, सकाळी ६.४५ ची वेळ होती, काका आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये पेपर वाचत बसले होते. मागे Carvaan वरती किशोरी अमोणकरांची गाणी सुरू होती. काकू नेहमीप्रमाणे कॉफी घेऊन आल्या..

Chocolate Day Special Story
Chocolate Day च्या दिवशी धुमाकूळ घालणारे मोरडे चॉकलेट पुण्याच्या एका छोट्या गावात सुरू झालेलं

काका काकूंची ही कॉफी डेट लग्नाच्या सहाव्या महिन्यापासून सुरू झाली जेव्हा हे दोघे आपलं गांव सोडून काकांच्या बदलीमुळे शहरात शिफ्ट झाले. केतकर काका आयकर विभागात होते, पुढे काकूंनीही एका शाळेत नोकरी सुरू केली आणि गणिताच्या प्राध्यापक आणि हायस्कूलच्या मुख्याध्यापिका बनून रिटायरमेन्ट घेतलेली.

Chocolate Day Special Story
World Chocolate Day 2024 : जगातलं सर्वात महाग चॉकलेट किती रूपयाचं माहितीय का?

आज लग्नाला जवळजवळ ४० वर्ष झाली असतील, मधल्या काळात अनेक गोष्टी घडल्या, काकूंचे बाळंतपण, काकांच्या बढत्या, मुलांच्या मौंजी, परीक्षा, नोकरी, लग्न, फॅमिली ट्रीप, चर्चा, वाद, भांडण.. नी बऱ्याच इतर गोष्टी... पण जे काही झालं ते विसरून नव्या दिवसात आपण दोघं सोबत आहोत या समाधानात ते दिवस सुरू करायचे, ही एकमेव गोष्ट जी आजवर कधीच चुकली नाही.

Chocolate Day Special Story
Chocolate Day 2023 : चॉकलेट डे च्या गोड गोड शुभेच्छा देणारे संदेश...

काकूंनी कॉफीचा ट्रे तिथल्या छोट्या स्टूलवर ठेवला आणि झाडांना पाणी देयला लागल्या, काकांनी आपल्या न्यूजपेपरच्या एका कोपऱ्याला अलगद दुमडलं आणि कॉफीच्या कपकडे बघितलं, तेवढ्यात काकू म्हणाल्या,

Chocolate Day Special Story
Health Tips : डार्क चॉकलेट खाणे चांगलं की वाईट?

“अहो, तुमची शेवंतू बघितली का किती बहरली आहे आज? फुलं तोडण्याआधी मला फोटो काढून द्या ह.. मी whatsapp ला status ठेवेल..”

“हम्म.. म्हणजे कौतुक तुझ्या whatsapp status च तर माझ्या शेवंतूच नाही”

“तसं नाही हो”

“चला, कॉफी वाट बघतेय”

Chocolate Day Special Story
Chocolate Day 2024: चॉकलेट डे स्पेशलआपल्या प्रियजनांसाठी होम मेड टेस्टी चॉकलेट कसे तयार करायचे?

आपल्या हातातली पाण्याची बादली काकूंनी बाजूला ठेवली आणि आपल्या मऊ सुंदर कॉटनच्या साडीच्या कंबरेला खोचलेल्या पदराला ते हात पुसले नी येऊन बसल्या. काकांनीही आपला पेपर बाजूला ठेवला आणि ट्रेकडे बघितलं, आज काकूंचा कॉफीचा कप अर्धाच भरलेला होता, काकांनी आपल्या कपातली कॉफी काकूंच्या कपात ओतत दोन्ही कप समान केले, तशा काकू एकदम म्हणाल्या,

Chocolate Day Special Story
Swiggy Tweet Viral : सॅनिटरी पॅडसोबत तुम्हालाही मिळेल का चॉकलेट? स्विगीचं ट्वीट व्हायरल, हे वाचाच

“अहो अहो, नको.. मलाच अॅसिडिटी होईल म्हणून म्हटलं आज कमी घेऊ”

त्यावर काका जरा तोऱ्यातच म्हणाले, “व्वा ग व्वा.. नाही म्हणजे स्वतःच्या अॅसिडिटीची तेवढी काळजी का? चांगलंय”

काकू जरा गडबडल्या आणि म्हणाल्या, “तसं नाही हो पण,”

तेवढ्यात काकांनी आपला चेहरा सौम्य करत सांगितलं, “अगं मीच काल दूध आणायला विसरलो ना.. मग याची शिक्षा तू का एकटीने भोगावी?”

काकूंनी काकांकडे बघितलं अन् त्या हसल्या. काकांनी आपल्या खिशातून एक छानसी कॅडबरी काकूंच्या हातात दिली; काकू जरा लाजल्याच... काकांनी Carvaan चा आवाज वाढवला नी संपूर्ण शांत वातावरणात किशोरीबाईंच्या “सहेला रे...” ची जादू पसरली..

~ लिना जोशी.

Chocolate Day Special Story
Chocolate Day : तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी घरच्या घरी बनवा Chocolate Bouquet

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.