कोरोना व्हायरसमुळे सध्या जगभरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाबाबतच्या घटना, घडामोडी जाणून घेण्यासाठी जगभरातून इंटरनेट सर्चिंग वाढले आहे. कोरोनाबाबतच्या बातम्या, माहिती, व्हिडिओ शोधून ते व्हॉट्स ऍपसह विविध सोशल मीडिया साधनांवर शेअर केल्या गेल्या आहेत. कोरोनामुळे जगभरातील देशांनी लॉकडाउन जाहीर केल्यानंतर लोकांना घरातच राहावे लागले. या काळात व्हॉट्स ऍप, फेसबुकसारख्या सोशल मीडिया साधनांचा वापर हा प्रचंड प्रमाणात वाढला. कोरोनाबाबतची माहिती, घटना, घडामोडी व्हायरल होण्याचे प्रमाणही अतिशय झपाट्याने वाढले. यातून चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती, घडामोडींचे सर्वाधिक शेअरींग होऊ लागले.
जगभरात व्हॉट्स ऍपचाच वापर सर्वाधिक होत असल्याने मालकी असलेल्या फेसबुक कंपनीने वेळीच उपाययोजना केली.
प्रचंड वेगाने व्हायरल मेसेज फॉरवर्ड करण्यावर व्हॉट्स ऍपने प्रतिबंध घातला आणि याचाच सकारात्मक परिणाम आता पाहावयास मिळाला आहे. एकच मेसेज सातत्याने मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड होत होते. यातून चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती वेगाने पसरू लागली, यावर प्रतिबंध घालण्यात आला. एकावेळी पाच जणांऐवजी केवळ एकालाच, अथवा एकाच ग्रुपवर मेसेज फॉरवर्ड करण्याची मुभा देण्यात आली. त्यामुळे कोरोनाबाबतच्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या, माहिती फॉरवर्ड करण्याला ब्रेक लागला. याबाबत व्हॉट्स ऍपकडून केलेल्या दाव्यानुसार कोरोनाबाबतचे मेसेज फॉरवर्ड करण्याच्या प्रमाणात 70 टक्के घट झाली आहे. ही एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल.
मेसेज फॉरवर्ड करण्याच्या मर्यादेबाबत व्हॉट्स ऍपकडून महिन्यापूर्वी एक अपडेट जारी करण्यात आले आणि त्यानंतर लागलीच याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली. म्हणजे व्हॉट्स ऍपने झटपट आणि अतिशय नियोजनपूर्वक ही उपाययोजना अमलात आणली, त्यामुळे कोरोनाबाबत मेसेज फॉरवर्ड करण्याचे प्रमाण जितक्या वेगाने वाढले होते, तितक्याच वेगाने ते खालीही आले.असे असलेतरी युजर्सकडून अन्य पर्यायांचाही वापर केला गेला, जसे मेसेज हे कॉपी करून पेस्ट करणे, व्हिडिओ डाउनलोड करून पुन्हा शेअर करणे, यावर व्हॉट्स ऍपला काही करता आले नाही; मात्र या पर्यायांचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण हे खूपच अत्यल्प असल्याने त्याचे परिणाम जाणवले नाहीत.खरेतर व्हॉट्स ऍपसह सोशल मीडियावर एखादी माहिती इतक्या वेगाने पसरते की, ती रोखणे केवळ अशक्य असते. मात्र, व्हॉट्स ऍप, फेसबुकसह सोशल मीडियावरून वाऱ्याचे वेगाने पसरणारे मेसेज पसरणे खूपच कमी झाले असल्याचे दिसत आहे, हे व्हॉट्स ऍपने केलेल्या उपाययोजनेचे हे यश म्हणावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.