Womens Day Special : ओ ताई, दिन-बिन झाला, आता कामाला लागा!

ओ ताई या आता जमिनीवर, झाला तुमचा महिला दिन. वाक्य कानावर पडलं आणि तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली
womens day special
womens day special esakal
Updated on

- पूजा कदम-कारंडे

Womens day special blog : ओ ताई या आता जमिनीवर…झाला तुमचा महिला दिन. वाक्य कानावर पडलं आणि तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्यानंतर तिने त्याला शिव्यांची लाखोली वाहिली. आजचा कानावर पडलेला किस्सा. मला यावर लिहावंसं वाटलं.

8 मार्च जागतिक महिला दिन. महिलांच्या हक्काचा दिवस. होय ना? हक्काचा आहे की नाही हे तुम्ही ठरवलं आहे. पण तसे सगळेच दिवस तिच्या हक्काचे असतात. हे मी नाही हा.. असा सांगणारा एक फोटो व्हायरल होताना पहिला. महिला दिन साजरा झाला. झालाच म्हणायचा! कारण दरवर्षी होतो तसा या वर्षीही झाला. मागील वर्षी व्हायरल झालेले शुभेच्छा आणि फोटो या ही वर्षी व्हायरल झाले. काही लोकांनी आपल्या मैत्रिणी, आई, बहीण, पत्नी यांचे फोटो स्टेटसला ठेऊन, ते सोशल मीडियावर शेअर करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

womens day special
Women's Day 2023: 'कुणी नसलं तरी चालेल..तुझी तू रहा..', जागतिक महिला दिनी मधुराणीची खास पोस्ट चर्चेत

भरपूर मिळणाऱ्या शुभेच्छा आणि लोकांनी आपले ठेवलेले फोटो यावर महिला वर्गही खुश होता. महिला दिनाच्या दुसऱ्याच दिवशी अगदी सकाळीच एक पोस्ट पाहिली. कोणी लिहिलेली माहिती नाही. पण महिला दिनी मिळालेल्या शुभेच्छाचा त्यात समचार घेण्यात आला होता. इतके गोड गोड संदेश आणि शुभेच्छानी या महिलेच्या मोबाईलला मुंग्या लागल्या होत्या म्हणे. असो त्या मुंग्या जातील तेव्हा जातील. पण माझा सांगायचा मुद्दा इतकाच की, एखादा दिवस साजरा करणं जस सोशल झालं आहे तसेच तो साजरा केल्यावर त्याच्यावर नकारात्मक प्रतिसाद किंवा मत व्यक्य करणं हेही गरजेचं बनलं आहे का?

womens day special
Womens Day Special: अदितीने दाखवला दुष्काळग्रस्त परिस्थितीशी दोन हात करण्याचा लातूर पॅटर्न!

आनंदात महिला दिन साजरा झाला अनेकांनी तो शुभेच्छानी भरून टाकला. असे असताना पुन्हा त्यावर टीका का केली जाते? टीका करणाऱ्यात महिला ही आहेत याचेच वाईट वाटत.

वरील संवाद जेव्हा मी ऐकला तेव्हा एकच प्रश्न मनात आला. आमचा आदर आणि कौतुक फक्त एकच दिवस का? आदर देण्याच्या बाबतीत तर सगळेच दिवस सारखे असायला हवेत. आता यावर काही पुरुषप्रधान ‘लोक’ म्हणतील की, तुम्हाला एखादा दिवस तर भेटतो आम्हाला तो ही नाही भेटत. आहे का तुमच्यात हिम्मत पुरुष दिन साजरा करायची.

womens day special
Womens Day Special : एकल महिलांच्या जीवनाला उभारी! कोरोना काळात विधवा झालेल्यांचे पुनर्वसन

त्यांना मी सांगेन की, हो नक्कीच जर सर्वांनी ठरवलं तर आम्ही पुरुष दिन साजरा नक्की करू? मी तर आनंदाने करेन. कसेय ना? समाजाने पूर्वीपासूनच महिलांना झुकत माप दिलं आहे. महिलांना त्यांच्या जगण्यासाठीही लढा द्यावा लागला आहे. पूर्वी ‘सती’ प्रथा होती ती बंद व्हावी म्हणून अनेक महिला चळवळीत लढल्या. त्यानंतर शिक्षण, अधिकार, हक्क, यासाठी लढावं लागलं. तस पुरुषांच्या बाबतीत कधीच नव्हतं.

womens day special
Womens Day Special : वयाच्या 22 व्या वर्षी गर्भाशय काढले जाते आणि ती बनते परमनंट ऊसतोड मजूर!

पुरुष म्हणजे घरचा कर्ता माणूस तो म्हणेल तीच पूर्व दिशा. आधी वडिलांच ऐका, मग पती आणि मग मुलगा. या तिघांवरच अवलंबून होती आणि आजही तिला ठेवलं जातं. तिला सांगितलं जातं. बाई ग तू घरातून समाजातून वेगळी होऊन नाही राहू शकत. आधी घरातले आणि मग समाजातील लोक तुला जिवंतपणी मरण यातना देतील. विषय थोडा भरकटलाय, आपण मुद्द्यावर येऊया.

womens day special
Womens Day Special : तुस्सी ग्रेट हो पल्लवी! कोल्हापूरमध्ये शिक्षण, कतारमध्ये पेट्रोलियम इंजिनिअर अन् हॉलिवूडमधील स्टंटवुमन!

पुरुष महिलांचा आदर करत नाहीत ही आजच्या काळातील खरी महिला दिन साजरी करायची गरज आहे. महिला एक उपभोग्य वस्तू असं आजही मानलं जातं. म्हणून त्या एक दिवशी तिच कौतुक करायच. ऑफिसमध्ये महिलांना चॉकलेट अन फुलं वाटायची. शुभेच्छा द्यायच्या हे रोज करा अस आमचं म्हणणं मुळीच नाही. पण तुमच्या आई अथवा मैत्रिणीशी बोलताना असलेला आदर प्रत्येक महिलेला देता आला पाहिजे तरच तो खरा महिला दिन होईल.

womens day special
Women's Day 2023: 'काही पुरुषांना 8 मार्चची आठवण करुन देण्यासाठी..',महिला दिनी गाजतेय मिलिंद गवळीची पोस्ट

वर्षभर तुम्ही तुमच्या बहिणीला, पत्नीला, आईला या ना त्या कारणाने मदत केलीच असेल. ती इतर महिलांना ही करावीत अस मला वाटत. एखाद्या दिवशीच गोड बोलणं आता बंद करा. एक दिवस सणवार अन इतर दिवशी दुष्काळ अशी अवस्था होऊ नये अस मला वाटत. लोकांनी कोणावर टीका करायची हे त्यांना ठरवू द्यात. तुम्ही बदलाची सुरुवात तुमच्यापासून करा.

womens day special
Women's Day 2023: महिला दिनी हेमांगीनं केला पुरुषांना सलाम..दोन महापुरुषांचे स्मरण करत म्हणाली,'यांच्यामुळेच..'

व्हॅलेंटाईन डेला बायकोला दिले असेल ना गुलाबाचे फुल. असेच एक दिवस तिच्यासाठी आठवणीने गजरा घेऊन जा. आईशी प्रेमाचे दोन शब्द बोला. आणि हो दर रखीपोर्णिमेला हक्काने गिफ्ट मागून घेण्याऱ्या बहिणीला फोन करून तर बघा. कारण दोन शब्द प्रेमाचे कोणत्याही महागड्या गिफ्ट पेक्षाही खूप मौल्यवान असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()