Nagpur University: सांगा, चौकशी करायची की नाही? पोलिसच देणार विद्यापीठाला पत्र, बोगस पदव्यांबाबत करणार विचारणा

Nagpur University
Nagpur Universityesakal
Updated on

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नावावर बोगस पदवीच्या आधारे इराकमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या २७ विद्यार्थ्यांच्या प्रकरणात चौकशीसाठी विद्यापीठाने अद्यापही पुढाकार घेतलेला दिसून येत नाही.

त्यातून पोलिसांकडूनच आता त्याची दखल घेत विद्यापीठाला पत्र देत, चौकशी करायची की नाही विचारणा करण्यात येणार आहे.

विद्यापीठाचा लोगो, नाव आणि कुलगुरूंची स्वाक्षरी असलेल्या २७ पदव्या आणि प्रमाणपत्रे बोगस असल्याची बाब इराक येथील दुतावासाच्या निदर्शनास आली.

Nagpur University
MBBS Student: देशात राहून विदेशात एमबीबीएस शिक्षणाचे आमिष; भारतात बोगस संस्थामध्ये प्रवेश देणारे 'रॅकेट'समोर

यामध्ये येथील तीन महाविद्यालयातील फार्मसी, अभियांत्रिकी आणि एक मायक्रोबायोलॉजी अभ्यासक्रमाच्या पदव्यांचा समावेश होता. त्यातून दुतावासाने येथील तीन महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची माहिती घेत, विद्यापीठाकडून पदवींची तपासणी करून घेतली.

त्यात २७ विद्यार्थ्यांच्या पदव्या बोगस असल्याची गंभीर बाब उघडकीस आली. दरम्यान याबाबत माहिती घेण्याकरिता दुतावासाचे समन्वयक मुंबईहून नागपुरात आले. त्यांनीही कुलगुरूंशी चर्चा केली. याची माहिती घेत, त्यांनी दुतावासाला कळविले.

त्यातून थेट इराकमध्ये या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आता पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून त्यांच्यामार्फत विद्यापीठाला एक पत्र देत, तक्रार देण्याबाबत विचारणा करण्यात येणार आहे.

याबाबत परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांना विचारणा केली असता, त्यांनी यास दुजोरा दिली.

नेमके वाचवायचे कुणाला?

विद्यापीठाद्वारे बोगस पदवी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतल्या जात नसल्याचा आरोप सिनेट सदस्य ॲड. मनमोहन वाजयेपी यांनी केला आहे. त्यातून नेमके कुणाला वाचविण्यासाठी विद्यापीठ पोलिसांकडे जात नाही असा सवाल त्यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, या प्रकारात आता विद्यापीठाकडून होत असलेल्या दुर्लक्षितपणामुळे यात कुणी अधिकारी तर सहभागी नाही ना? अशी शंका आता विद्यापीठ वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान अधिकाऱ्यांना संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Nagpur University
MBBS Student : 'माफ करा.. मी डॉक्टर होऊ शकले नाही'; 9 व्या मजल्यावरून उडी मारुन मेडिकल विद्यार्थिनीची आत्महत्या

…यापूर्वी इतर विभागाकडे तक्रार

केंद्रीय उच्चशिक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाला माहिती दिली. मात्र, यामध्ये विद्यापीठाचा लोगो आणि कुलगुरूंची स्वाक्षरी वापरल्याने त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार करीत चौकशी करण्याची मागणी करणे अपेक्षित होते.

मात्र, अद्याप विद्यापीठाने तक्रार केली नाही. मात्र, शनिवारी अंबाझरी पोलिसांकडे या प्रकरणाची माहिती देत, अंग काढून घेण्यात आल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.