लेकलाइफ सोसायटीसमोर  पथदिव्यांची आवश्‍यकता 

लेकलाइफ सोसायटीसमोर  पथदिव्यांची आवश्‍यकता 
Updated on

लेकलाइफ सोसायटीसमोर 
पथदिव्यांची आवश्‍यकता 

जांभूळवाडी : शनिनगर ते दरी पुलापर्यंत महापालिकेच्या हद्दीपर्यंत पथदिवे उभारले जाणार होते; मात्र विवा सरोवरनंतर जुन्या शिवसमर्थ शाळेपर्यंतच पथदिवे लागले 
आहेत. पुढील लेकलाइफ सोसायटी ते दरी पुलापर्यंत अजून पथदिवे उभारण्याची मागणी होती; मंजुरीसुद्धा मिळाल्याचे समजले आहे. त्वरित या ठिकाणी पथदिवे 
उभारावेत. 
- चंद्रकांत गुरव 

पीएमपीएलचे बेशिस्त वाहनचालक 
औंध : येथील सयाजीराव गायकवाड उद्योगभवन समोरील थांब्यावरून 15 मिनिटात 10 बस पास आल्या परंतु एकाही बसचालकाने बसथांब्यावर बस न थांबवता अत्यंत वर्दळीच्या अशा मुख्य मार्गावरच प्रवाशांची चढ उतार केली. यामुळे या परिसरात अपघात तर संभवतात शिवाय वाहतुकीलाही अडथळा होतो. 
पीएमपी प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी. 
-अजय पपोलमवार 



महापालिका भवनाजवळ वाहतूक कोंडी 
पुणे : मेट्रोच्या कामामुळे महापालिका भवनाजवळ कायम वाहतूक कोंडी होते. बेशिस्त बसचालक आणि कसरत करणारे पादचारी, त्यातून मार्ग काढत जाणारी 
वाहतूक मोठ्या अपघातला आमंत्रण देत आहे. कोणाची आहुती गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे. त्याची पीएमपीकडे तक्रार केली असता बसथांबा स्थलांतरीत केल्याचे उत्तर मिळाले. मंगला थिएटरकडून येतानाच पुलाखालील चौक अपघाताचा सापळा बनला आहे. 
- राहुल रणदिवे 

महापालिकेकडून तक्रारीची दखल 
धायरी : काही दिवसांपूर्वी मी एक ऑनलाइन तक्रार महापालिकेकडे केली होती. धायरी रस्त्यावर बेनकर वस्ती चौकात पथ दिव्यांचा अंधुक प्रकाश होता. अंधारामुळे 
लहान मोठे अपघात वारंवार होत होते. काल मला अभियंत्यांनी फोन करून अधिक माहिती घेतली. आज सकाळी येथे एक जोड दिवा तत्काळ 
लावला. महापालिकेचे आभार. 
-सचिन जाधव 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.