हॉटेलमध्ये पाण्याची बचत आवश्यक
पुणे : आज अनेक हॉटेलमध्ये गेल्यावर वेटर पाण्याने भरलेले ग्लास समोर आणून ठेवतात. अनेकजण त्यातील थोडे पाणी पिऊन उरलेले तसेच टाकून देतात. या ऐवजी टेबलावर जारमध्ये पाणी भरून मोकळे ग्लास ठेवावेत. ज्याला जितके पाहिजे तेवढेच पाणी घेऊन उर्वरित पाण्याची बचत करू शकतो. पाण्याचा मौल्यवान थेंब वाचवण्यासाठी ही छोटीशी कृती योग्य आहे.
- प्रकाश मेढेकर
नांदेड जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन
सिंहगड रोड : नांदेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केला.
याप्रसंगी नांदेड ग्रामपंचायतचे सदस्य व नांदेड सिटीचे संचालक सुजित कारले, मुख्याध्यापक रमेश बागूल यांनी आपले कलागुण सादर केले. या कार्यक्रमात शिक्षिका श्रद्धा नाडकर्णी यांना स्वर्गीय निर्मलाताई घुले प्रतिष्ठानच्या वतीने एम ए तील विशेष नैपुण्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात पंचायत समिती हवेलीच्या सभापती फुलाबाई कदम, जि. प. सदस्य जयश्री पोकळे, निर्मलाताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष रूपेश घुले, नांदेडच्या सरपंच मनीषा देडगे, दयासम्राट फाउंडेशनच्या अध्यक्षा विद्या हांडे देशमुख, उपाध्यक्षा प्रेरणा सोनकवडे, ग्रामपंचायतचे सदस्य सुहास देडगे, सुजित कारले, अजित वाल्हेकर, ग्रामविकास अधिकारी झोळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौदागर वाघमारे, सदस्य प्रकाश देडगे, अनिल राठोड, सोनाली सिल्लोडे आदी उपस्थित होते. केंद्रप्रमुख सुधीर चटणे, मुख्याध्यापक बागूल, शिक्षक मनीषा जगताप, वर्षा खाडे, मंजिरी डाहाळे, ललिता गुलदगड, जया आठवले, मनीषा ससाणे व श्रद्धा नाडकर्णी यांनी सहकार्य केले.
- प्रेरणा सोनकवडे
हॉस्पिटल, कार्यालयांमध्ये
शिवभोजन थाळी उपलब्ध व्हावी
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच दहा रुपयांत काही ठिकाणी शिवभोजन चालू केले आहे. हे शिवभोजन सर्व रेल्वे स्टेशन, एसटी स्टॅंड, शासकीय कार्यालय आणि रुग्णालयात दहा रुपयांमध्ये उपलब्ध व्हावे. याची दखल राज्य सरकारने घ्यावी.
- संदीप गुंड
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.