मुंबई : राज्यात कोरोनामुळे लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जात असताना अशा लॉकडाउन असलेल्या परिस्थितीत डीएचएफएलचे कपिल वाधवान हे कुटुंब आणि इतरांसह २३ जण सुटीसाठी महाबळेश्वरला गेल्याचं समोर आलं. पाचगणी पोलिसांनी कपिल वाधवान यांच्यासह २३ जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर त्यांना प्रवास करु द्यावा, अशा आशयाचं गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या स्वाक्षरीचं पत्र समोर आलं आहे. हे प्रकरण माध्यमात आल्यानंतर विरोधकांनी प्रश्न उपस्थित करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर गृहमंत्र्यांनी कारवाई केली आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी दिल्याचं उघड झालं आहे. यावरून विरोधी पक्षानं सरकारला धारेवर धरताच सरकारनं अमिताभ गुप्ता यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही कारवाई केली आहे.
हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करणारं पहिलं ट्विट केलं. त्यात वाधवान यांच्यासह २३ जण महाबळेश्वरला कसे पोहोचले याची चौकशी केली जाईल, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर चार तासांनी गृहमंत्री देशमुख यांनी दुसरं ट्विट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेप्रमाणे गृहविभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना तातडीनं सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांच्याविरोधात चौकशी केली जाणार असून, चौकशी होईपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील, असं देशमुख यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.