Crime: अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतिकडून पत्नीची दगडाने ठेचून हत्या

दिलावरपूर येथील घटना : अनैतिक संबंधाचा संशय
Crime
Crimeesakal
Updated on

अमरावती: पत्नीचे दुसऱ्यासोबत संबंध असल्याचा संशय घेऊन झोपेत असलेल्या पत्नीचा चेहरा दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर रात्रभर पत्नीचा मृतदेह घरातच पडून होता. गुरुवारी (ता. ६) सकाळी ही घटना उघडकीस आली. चांदूररेल्वे तालुक्यातील दिलावरपूर परिसरात ही घटना घडली.

मृत महिलेचे नाव शिल्पा शैलेंद्र मानवटकर (वय ३६) असे असल्याचे पोलिस निरीक्षक पंकज दाभाडे यांनी सांगितले. शिल्पाचे पती शैलेंद्र रामराव मानवटकर हे काही दिवसांपासून आजारी आहे.

Crime
Laxman Mane : 'RSS कडून फोडाफोडीचं राजकारण, त्या 9 आमदारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला'

गत काही महिन्यांपासून शिल्पाचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय शैलेंद्र यांना होता. त्यावरून या दाम्पत्यामध्ये सतत वादविवाद, भांडणे सुरू होती.

घटनेच्या वेळी काल बुधवारी रात्री सहा वर्षांची मुलगी व पत्नी शिल्पा या दोघी झोपल्या होत्या. मध्यरात्रीनंतर शैलेंद्रने उठून पत्नीच्या चेहऱ्यावर व डोक्यात दगड आणि फरशी घातली. त्यात शिल्पाचा जागीच मृत्यू झाला.

रात्रभर पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात घरातच पडून होता. आज गुरुवारी (ता. ६) दिवस उजाडल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

नितीन नंदू घोडेस्वार (रा. मांजरखेड कसबा) यांच्या तक्रारीवरून चांदूररेल्वे पोलिसांनी संशयित पती शैलेंद्र मानवटकर विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून रात्री त्याला अटक केली.

Crime
Crime: नात्याला काळीमा फासणारी घटना! ७० वर्षीय आजोबाचा अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार

गुन्हा लपविण्याचा प्रयत्न

आज दिवस उजाडल्यानंतर शैलेंद्रने आपल्या नातेवाईक व इतर लोकांना फोन करून सांगितले की, घरात रात्रीला कुणीतरी शिरले व त्यांनीच पत्नी शिल्पाला मारल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

परंतु पोलिसांना संशय असल्यामुळे त्यांनी उलटतपासणी केली असता शैलेंद्र यांनी पत्नीच्या हत्येची कबुली दिली. असे चांदूररेल्वेचे पोलिस निरीक्षक पंकज दाभाडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.