Crime News: धक्कादायक! चोर समजून तरुणाला जमावाची बेदम मारहाण, पोलिस ठाण्यासमोरच मृत्यू

चोरीच्या संशयावरून जमावाने केली मारहाण;
crime
crimeesakal
Updated on

कामठी: दुसऱ्याच्या स्टॅंडवर दुचाकीला हलवीत असल्याचे पाहून जमावाने चोरीच्या संशयातून चाळीस वर्षीय व्यक्तीला मारहाण केली. तसेच त्याला जुने कामठी पोलिस ठाण्यात नेत असताना गेटसमोर पडून त्याचा मृत्यू झाला. मोहम्मद नासिर ऊर्फ गब्बर व. मोहम्मद रमजान अन्सारी रा. वारीसपुरा कामठी असे मृताचे नाव आहे.

येथील मोहम्मद नासिर ऊर्फ गब्बर व. मोहम्मद रमजान अन्सारी शनिवारी सायंकाळच्या सुमारास दुसऱ्याच्या स्टँडवर उभी असलेली दुचाकी पकडून हलविताना काहींना दिसून आला. यावरून चोरी करीत झाल्याचा संशय आल्याने जमावाने त्याला मारहाण केली.

crime
Mumbai Crime : तलवारीने कापले २१ केक; मुंबईत तरूणावर गुन्हा दाखल

त्याला पकडून पोलिस ठाण्यात नेण्यात आले. परंतु पोलिस ठाण्याच्या गेटसमोरच खाली पडला. लगेच पोलिसांनी शासकीय वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत्यू झाल्याचे सांगितले. हे कळताच खळबळ उडाली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदन गृहात पाठवला.

मागील काही दिवसात चोरीचे प्रमाण वाढल्याने नागरिक सावध झाले आहेत. त्यानुसार शनिवारी सायंकाळी साडे पाचदरम्यान नासिर फुटाना ओली चौकात एका उभ्या दुचाकीजवळ उभा राहून दुचाकीची छेडछाड करीत दिसला.

crime
Crime: नाली साफ करताना महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर तलवारीने हल्ला; एका कर्मचाऱ्याचे बोट कापले

चोर समजून जमावाने मारहाण केली. तसेच जुनी कामठी पोलिसाच्या स्वाधीन केले. मात्र स्वाधीन करताच अवघ्या काही वेळातच तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेत नासिर निर्दोष असून घटनेला जबाबदार कोण? हा चर्चेचा विषय आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध घेण्यात येत आहे. बातमी लिहिस्तोवर कुणावरही गुन्हा दाखल केला नव्हता. पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृताच्या पाठीमागे आई-वडील, पत्नी, तीन मुले असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.