संग्रामपूर : तालुक्यातील पातुडाँ बु येथे आवैद्य रित्या गोवंश जनावराची कत्तल करणाऱ्या 5 आरोपी ना अटक करण्यात आली असून ही कारवाई पातुडाँ बु येथे तामगाव पोलीस ने दि 30 जून च्या सकाळी 4 वाजता केली.
तामगाव पोलीस स्टेशन चे पो उ नि जीवन सोनवणे,चालक आखरे हे पातुडाँ बु येथे दि 30 जून रोजी पेट्रोलिंग करत असताना त्यांना त्यांच्या मुखबिर कडून खबर मिळाली की पातुडाँ बु येथील काजीपूरा उर्दू शाळेच्या जवळ सर्वजनिक जागेत काही व्यक्ती अवैद्यरित्या गोवश ची कत्तल करत आहेत.सादर ची माहिती वरिष्ठ अधिकारी देऊन त्याच्या आदेशाने पो उ नि जीवन सोनवणे,पो का गणेश डोके,पो का सुदाम राठोड,पो का उमेश पवार,पो का पौर्णिमा साबे,पो का म्हात्रे,चालक आखरे,चालक सेवानंद हिवराळे,दोन पंच याना सोबत घेऊन सकाळी 4:30 वाजता पातुडाँ बु येथील काजीपुरा उर्दू शाळेच्या सार्वजनिक जागेवर जाऊन दुरून पंच समक्ष यांच्या सोबत पाहणी केली असता तिथे चार ते पाच लोक गोवंश जनावराची कत्तल करून त्याचे मास व चामडी बाजूला पडली होती.
पो उ नि जीवन सोनवणे व पंच यांची खात्री पडल्यावर त्यांनी घटनास्थळी गाठले व पोलीस यंच्या सहकार्याने त्या ठिकाणी रेड केली असता त्या ठिकाणी गोवंश जनावराची कत्तल करताना शेख रेहान शेख मलंग वय 19 वर्ष,तस्लिम कुरेशी अन्वीर उर्फ अमीर कुरेशी वय 20 वर्ष,शेख इस्तीगफार शेख अमीर वय 22 वर्ष,शेख सलीम शेख अमीर वय 24 वर्ष,शेख वजीर शेख शेख अमीर वय 24 वर्ष सर्व रा काजीपुरा पातुडाँ बु याना जागीच पकडण्यात आले व त्याच्या कडून गोवंश जातीचे जनावरे चे मास व हत्यार जप्त करण्यात आले. या वेळी 58000 रु चा माल जप्त करण्यात आला.सदर पकडलेल्या इसमाना प्राधिकृत परवाना बाबत विचारणा केली असता त्यांनी कुठलाही परवाना नसून आवैद्य रित्या कत्तल करीत असल्याचे सांगितले.सदर मुद्देमाल पैकी पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडुन सी ए तपासणी कामी संपलं काढण्यात आले.उर्वरीत मुद्देमाल हा नगर पंचायत संग्रामपूर यांनी दिलेल्या जागेवर सुरक्षितते च्या दृष्टिकोनातून पुरविण्यात आले त्या नंतर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन तामगाव येथे अपराध क्र 219/2024 कलम 270,429,34 भादवी सहकलम 5, 5 क, 9 आणि 9 अ,महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास दयाराम कूसुबे यांच्या कडे देण्यात आले सदर गुन्ह्यात पो का प्रमोद मूळे व पो का विकास गव्हाड यांनी मदत केली.
त्या अगोदर सदर गुन्ह्यातील आरोपींना कत्तल करण्यात आलेल्या जनावर बाबत विचारणा केली असता त्यांनी पुरावेयुक्त कुठलेही माहिती न देता गुन्ह्यात सहकार्य केले नाही तसेच गावात दोन समाजात भांडण होऊन दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा घडू नये म्हणून या कारणाने आरोपींना अटक करून हवालात मध्ये बंद करण्यात आले. सदर धडक कारवाई सुनील कडासने जी पो अधिक्षक,अशोक थोरात अप्पर पो अधिक्षक खामगाव,डी एस गवळी उपविभागीय पो अधिकारी मलकापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पो स्टे तामगाव यांच्या आदेशानुसार सदर कारवाई करण्यात आली.
गोवंश मासाची तेल व डालड्याच्या डब्यात तस्करी
पातुडाँ बु येथे दि 30 जून रोजी तामगाव पोलीस स्टेशन ने काजीपुरा भागात धाड टाकली असता तिथे गोवंश मसाची कत्तल करताना व विक्री करताना त्यांना काही नागरिक आढळले त्या वेळी गोवंश चे मास व चरबी तेलाच्या व डालड्याच्या डब्यात भरलेले होते या मुळे या परिसरात बऱ्याच दिवस पासून प्रतिबंधीत गोवंश ची कत्तल करून विक्री व तस्करी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.