Crime News: कपडा व्यापाऱ्याची सव्वा दोन कोटींची फसवणूक करणाऱ्या १२ जणांवर गुन्हा!

crime news
crime newssakal
Updated on

Crime News: ठाण्यातील माजिवडा येथील कपडा व्यापाऱ्याकडून १२ जणांनी आपसात संगनमत करून कपड्याचा माल घेऊन त्याला खोट्या सह्यांचे धनादेश देऊन सव्वादोन कोटींची फसवणूक केल्याची घटना भिवंडीतून उघड झाली आहे. या फसवणूकप्रकरणी १२ जणांच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सौरभ कुमार अग्रवाल, जॉन टेलर डे, मयांक तिवारी, सुप्रिया मुन्शी, मुकेश शर्मा, ऋची त्रिपाठी, ऋषिकांत पासवान, विक्रांत कुमार, दास राजदीप सुप्रम, सजीत नारायणण, अंकुश मिश्रा, गगणदीप सैनी अशी गुन्हा दाखल झालेल्या १२ जणांची नावे आहेत.

crime news
Nashik Crime: तडीपार केलेले सराईतही शहरात मोकाट

सर्व आरोपींनी आपसात संगनमत करून श्रीराम किसनस्वरूप गोयल या कपडा व्यापाऱ्याकडून दोन कोटी २५ लाख ३९ हजार ६२६ रुपये किमतीच्या कपड्याच्या मालाची खरेदी केला. ९ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबरदरम्यान कशेळी येथील राजलक्ष्मी कमर्शियल कॉम्प्लेक्समधून ‘टॉपमेन इंटरनॅशनल’ या कंपनीचा माल ते घेऊन गेले होते. व्यवहाराच्या

वेळी या सर्वांनी आपसात संगनमत करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे नसतानाही श्रीराम गोयल यांना सव्वादोन कोटींचा खोट्या सह्यांचा धनादेश देऊन त्यांची फसवणूक केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच श्रीरामने गुरुवारी (ता. १९) नारपोली पोलीस ठाणे गाठून १२ जणांविरोधात फिर्याद नोंदवल्याने पोलिसांनी सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रोहन शेलार करीत आहेत.

crime news
Nashik Crime : सारूळ परिसरातील खाणींवर महसूलचे पथक; 2 वाहने जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.