Crime News : "मुलींचे अपहरण, ४-५ लाखात सौदा, मग..." ; मानवी तस्कराचा धक्कादायक जबाब

Crime News
Crime News
Updated on

नवी दिल्ली : शकरपूर क्राइम ब्रँच पोलिसांनी संजय नावाच्या आंतरराज्य मानवी तस्कराला अटक केली आहे. त्याच्या अटकेवर २५ हजार रुपयांचे बक्षीस होते. यांची एक टोळी देखील सक्रिय आहे. ही टोळी रेल्वे स्थानकांवर आणि आसपासच्या तरुणींना फूस लावून लग्नासाठी ४-५ लाख रुपयांना विकायची.

मानवी तस्कर संजय उर्फ ​​मिंटू मिर्धा (३५ रा. विजय नगर, गाझियाबाद) याला पकडण्यासाठी पोलिसांनी मोठी फिल्डींग लावली होती. आरोपी बिहारच्या पूर्णिया येथील रहिवासी आहे. मानवी तस्करीच्या तीन गुन्ह्यांमध्ये तो वाँटेड होता. (Crime News)

२०१७ मध्ये अज्ञात व्यक्तिने १४ वर्षीय मुलीचे अपहपण केले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान नीरज नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती.  या प्रकरणी आरोपी अनुज, अनुजची पत्नी बबलू, संजय उर्फ ​​मिंटू मिर्धा यांनाही अटक करण्यात आली होती. 

Crime News
Zomato Shares : झोमॅटोच्या शेअर्समध्ये येणार तेजी, फक्त 89 रुपयांमध्ये देणार चांगल्या क्वालिटीचे जेवण

याशिवाय आरोपी अनुजच्या घरातून आणखी दोन अल्पवयीन मुली जप्त करण्यात आल्या होत्या. टोळीचे सदस्य संजय, अनुज व त्याची पत्नी, बबलू आणि राजू यांनी लैंगिक शोषणासाठी या मुलींची तस्करी केली होती. अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, वेश्याव्यवसाय, बळजबरीने बालविवाहासाठी देशातील विविध ठिकाणच्या या मुलींना पाठवले जात असे. यावेळी संजयला अटक करण्यात आली होती. 

आरोपी संजयची न्यायालयाने मे २०२२ रोजी जामिनावर सुटका केली असली तरी बाहेर आल्यानंतर तो फरार झाला होता. त्यानंतर त्याने पुन्हा मानवी तस्करी करण्यास सुरूवात केली. तरुणींना फूस लावून तो पळवत असे. दरम्यान पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

Crime News
Hindu Rashtra : भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याची ताकद कोणाच्या बापात नाही; मौलाना रझांचं थेट आव्हान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.