दुचाकीचालकांचं भांडण, माजी कबड्डीपटूला भोकसले

रामसिंघ यांनी बिहार येथे २००३ साली झालेल्या १५ व्या सब-ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं.
Man Stab
Man Stab sakal
Updated on

मुंबईतील प्रभादेवी या ठिकाणी दोन दुचाकीचालकांचं अरुंद गल्लीतून पुढे जाण्यावरुन झालेला वादाचं पर्यावसान माजी कबड्डीपटूच्या हत्येत झालं. मृत राम गणेश सिंह (वय ३२) यांचा भाचा राज सिंघ आणि आरोपी मनिष पाटील (वय ३६) अरुंद गल्लीत समोरासमोर आले आणि त्यांच्यात वाद झाला.आरोपीने भाच्याला वाचवायला आलेल्या रामसिंहला भोकसलं. हि घटना मागील आठवड्यात घडलीय.

मनिष पाटील हा जिम ट्रेनर कामावरुन परतत होता. तर राज सिंघ काही कामानिमित्त बाहेर पडला होता. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार वाणी चाळीकडे जाणारा रस्ता हा प्रचंड अरुंद असल्याने एकावेळी एकच गाडी पुढे जाऊ शकते. आरोपी मनिष पाटील हा अतिशय वेगाने गाडी पळवत होता. त्याने थेट राजसिंघ यांच्या गाडीवर गाडी नेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

WANI CHAWL
WANI CHAWLSAKAL

दादर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेश मुगतराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादावादी झाल्यानंतर आरोपी मनिष पाटील याने राज सिंघला , "तू इथेच थांब तुला धडा शिकवितो' अशी धमकी दिली. घाबरलेल्या राजसिंघने मामा राम सिंघ जे दादरमध्येच बाउंसर म्हणुन काम करतात , त्यांना बोलावून घेतले. राम सिंघ पोहोचताच मनिष पाटील हा धारदार किचन चैन चाकू घेऊन आला आणि तो राज सिंघवर हल्ला करण्यासाठी पुढे होताच रामसिंघने त्याला अडवले. मात्र त्यांच्या पोटात जोराने वार झाला. तसंच त्याने राजसिंघ याच्यावर देखील वार केले. त्यानंतर आरोपी पळून गेला. काही लोकांनी रामसिंघ आणि भाच्याला हॉस्पीटलमध्ये पोहोचवलं. मात्र रामसिंघच्या यकृताला मोठी जखम झाल्याने दुसऱ्या दिवशीचं त्यांचा मृत्यू झाला.

रामसिंघ यांनी बिहार येथे २००३ साली झालेल्या १५ व्या सब-ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्टाचं प्रतिनिधित्व केलं होतं.रामसिंहचा भाऊ शंकर याने सांगितलं रामचं तीन महिन्यापूर्वीच एका महिला पोलिस कॉन्स्टेबलबरोबर लग्न झालं होतं. त्यांच्या पत्नीला नुकताच पोलिस वसाहतीत घर मिळालं होतं. तिथे शिफ्ट होण्याचा ते विचार करत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()