Online Ticket Scam : ऑनलाईन तिकीट कॅन्सल करणे पडले महागात ; बसला ४ लाखांचा फटका

instagram scam
instagram scamsakal
Updated on

IRCTC Scam : एका 78 वर्षीय वृद्ध व्यक्तीला रेल्वे टिकीट रद्द करणे चांगले महागात पडले आहे. रेल्वे टिकीट रद्द करतानासाठी रांगेत उभे न राहता ऑनलाईन तिकीट रद्द करण्याचे संबंधित वृद्धाचे ठरवले. मात्र यामध्ये त्याचे तब्बल चार लाख रुपयाचे नुकसान झाले.

मिळालेल्या माहिती नुसार वृद्धाने आपले रेल्वे तिकीट रद्द करण्यासाठी आय आरसीटीसीची वेबसाईट शोधली. मात्र भलत्याच वेबसाईटवर क्लिक केले. यावेळी रेल्वे टिकीट रद्द करण्यासाठी स्वतःला कर्मचारी म्हणून घेणाऱ्या व्यक्तीने वृद्धाला तिकीट रद्द कसे करावे याच्या सूचना देण्यात आल्या.

instagram scam
Maharashtra Politics : मुंबईत शिंदे गटातील गटबाजी आली समोर; पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत!

दिलेल्या सूचनेनुसार वृद्ध व्यक्तीने सर्व सूचनांचे पालन केले. स्क्रीनवर निळ्या रंगाचा लोगो दिसला. आणि या फसवणुकीला सुरुवात झाली.(Latest Marathi News)

instagram scam
Peru Alien News : सात फुटांच्या एलियनने गावकऱ्यांवर केला हल्ला, बंदूकीच्या गोळ्यांनाही देत नाही दाद; प्रत्यक्षदर्शींचा दावा!

या व्यक्तीने आपल्या बँक तपशील, एटीएम कार्ड इत्यादी सर्व माहिती समोरच्या व्यक्तीला शेअर केली. यावेळी समोरच्या व्यक्तीने वृद्ध व्यक्तीच्या फोन मध्ये व्हायरस इन्स्टॉल केला. त्यानंतर मोबाईल रिमोटॲप मोबाईलमध्ये इंस्टॉल केला. यावेळीा वृद्ध व्यक्तीच्या मोबाईलवरील डेटा बँक डिटेल आणि ओटीपी त्याला मिळाले.

instagram scam
Mumbai Traffic News : अंधेरीजवळील पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; पण लवकरच...

त्यानंतर वृद्ध व्यक्तीला बँक खात्यातून एक संदेश आला, ज्यामध्ये 4,05,919 रुपये कपात झाल्याची माहिती होती. त्याने पोलिसांत तक्रार केली आणि घोटाळेबाजांनी बिहार किंवा पश्चिम बंगालमधून फोन केल्याचे समोर आले. सायबर सेल पोलिसांनी सांगितले की, घोटाळेबाजांनी रेस्ट डेस्क नावाच्या अॅपद्वारे वृद्धाच्या मोबाइलमध्ये प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.